Krishi Sahayak Bharti 2021

कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायकाची अनेक पदे रिक्त

Krishi Sahayak Bharti 2021 – Many posts are vacant in the office of Taluka Agriculture Officer. There are 24 sanctioned posts of Agricultural Assistants, there are 13 posts and 9 posts are vacant. There are no agricultural assistants in the nine headquarters villages

Krishi Sahayak Bharti 2021

तालुका कृषी अधिकारी पद रिक्त असून मंडळ अधिकारी किशोर सोनटक्के यांच्याकडे प्रभार आहे. कृषी सहायकाची २४ मंजूर पदे असताना १३ पदे असून ९ पदे रिक्त आहेत. इंझोरी, भुली, गव्हा, कारपा, पाळोदी, रुई, फूलउमरी, उमरी खुर्द, वाईगौळ ह्या नऊ मुख्यालय गावी कृषी सहायक नाही. इतर कृषी सहायक यांच्याकडे या मुख्यालयी गावातील प्रभार आहे. कृषी विभागाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाथ्य’ांच्या जमिनीवर फळबाग लागवड योजना, यांत्रिकीकरण, स्प्रिंकलर, मोफत बियाणे वाटप, मातीपरीक्षण, अतिवृष्टीचे पंचनामे, शेतकरी मार्गदर्शन, आदी कामे रिक्त पदामुळे प्रभावित झाली आहेत. याकडे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन रिक्त पदे भरावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

……

गेल्या अनेक दिवसांपासून तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पदे रिक्त आहेत. आवश्यक मनुष्यबळ असेल तर काम करणे सोपे होते. रिक्त पदाचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला कळविला आहे.

– किशोर सोनटक्के़

Leave a Comment