दहावी परीक्षेची प्रवेशपत्रे १८ फेब्रुवारीला दुपारी १ वाजेपासून इथे उपलब्ध होणार
Maha SSC Board Hall Ticket 2022 – In order to get the admission papers for class X examination on time, the state board will provide holistic tickets to the schools online from 1 pm on February 18 in the school login on the board’s website. Know More details about Maha SSC Board Hall Ticket 2022, Maha SSC Board Admit Card Download 2022 link
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सरावासाठी क्वेश्चन बँक उपलब्ध – Maharashtra SSC, HSC Prashnapedhi 2022 – maa.ac.in
दहावीची परीक्षा ( 10th Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी आहे. १५ मार्च २०२२ पासून सुरू होणार्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉलतिकिट १८ फेब्रुवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून शाळांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.
२१ हजार ३४९ केंद्र –
मार्च-एप्रिल २०२२ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचे (दहावी) वेळापत्रक जाहीर झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व विद्यार्थ्यांना सहज परीक्षा देता यावी यासाठी राज्य मंडळाने ( Maharashtra State Board ) राज्यभरात ‘शाळा तेथे केंद्र’ या धर्तीवर तब्बल २१ हजार ३४९ केंद्र उपलब्ध केले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी परीक्षेची प्रवेशपत्रे वेळेवर मिळावे यासाठी राज्य मंडळाकडून १८ फेब्रुवारीला दुपारी १ वाजेपासून शाळांना ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळावर शाळांच्या लॉगिनमध्ये हॉलतिकिट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शाळांना देण्यात आलेल्या लॉग-इन आयडी व पासवर्डच्या आधारे शाळा ही प्रवेशपत्रे डाउनलोड करू शकतील.
शाळांना सूचना – Important Instruction
- प्रवेशपत्र प्रिटींगचे कोणतेही शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येऊ नये, प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असल्यास त्याची दुरुस्ती शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायाची आहे.
- प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ यासंदर्भातील दुरुस्त्या शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे.
- हॉलतिकिट विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास शाळांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यास द्यायाचे आहे.
- फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.
अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या आहेत
-
१० वी मार्च/एप्रिल २०२२ ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत
-
१० वी मुख्याध्यापकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना लेखी परीक्षा
-
१० वी मुख्याध्यापकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना प्रात्य. तोंडी इ. परीक्षा
-
१० वी परीक्षार्थीसाठी विशेष मार्गदर्शक सूचना लेखी परीक्षा
Maha SSC Board Admit Card Download 2022 link
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents