Maha TET Exam Postponed 2021 – Maharashtra State Examination Council, Pune, recently issued a public notice announcing the postponement of the MAHA TET 2021 examination. Previously, the Maharashtra Teacher Eligibility Test (MAHA TET) 2021 examination was going to be conducted on October 30, 2021. However, the exam has now been postponed by almost three weeks and shall be held on November 21, 2021
शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणारी टीईटी परीक्षेची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आतापर्यंत तीन वेळा परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. राज्यात 30 ऑक्टोबर 2021 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार होती. मात्र 30 ऑक्टोबर रोजी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक असल्याने परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता 21 नोव्हेंबर 2021 रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे तारीख बदलली
याआधी 10 ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा नियोजित होती. मात्र त्या दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने परीक्षेच्या तारखेत बदल करुन 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचे ठरले. मात्र या दिवशी देगलूर-बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणूक असल्याने परीक्षेची तारीख पुन्हा बदलली असून आता 21 नोव्हेंबर रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र उमेदवारांमध्ये यामुळे नाराजीचे वातावरण आहे. टीईटी परीक्षेला राज्यातून 3 लाख 30 हजार 642 उमेदवार बसणार आहेत. यासाठी 5 हजार परीक्षा केंद्राचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे. राज्यभरात होणारी ही परीक्षा आता 21 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे सुधारीत वेळापत्रक संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे.
Maha TET Exam Postponed 2021 – The date of Maharashtra Teacher Eligibility Test i.e. Maha TET examination conducted by Maharashtra State Examination Council Pune has now been changed. Now the exam will be held on October 30. The TET dates have been changed as the health department’s Group D exam will be held on October 31. Yesterday, Health Minister Rajesh Tope had told Varsha Gaikwad to discuss changing the dates of the exams. Earlier, the exam was scheduled to be held on October 10. However, it was decided to postpone the TET exam with the permission of the state government
राज्य सरकारचा (Maharashtra Government) गोंधळी कारभार सुरु आहे. राज्य सरकारच्या परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या टीईटीच्या (Maharashtra Teacher Eligibility Test 2021) परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता ही परीक्षा 30 ऑक्टोबरला पार पडणार आहे. आरोग्य विभागाच्या ड श्रेणीसाठीची परीक्षा ही 31 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे हा टीईटीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Teacher Eligibility Test 2021 held be on 30 october due to health department exam on 31 october)
याआधी टीईटीच्या परीक्षेचं आयोजन हे 10 ऑक्टोबरला करण्याच्या हिशोबाने हालचाली सुरु होत्या. मात्र त्याच तारखेला काही विद्यार्थ्यांची यूपीएससीची (UPSC) परीक्षा होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना टीईटीच्या परीक्षेला मुकावं लागू नये, यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला.
असं आहे टीईटीचं वेळापत्रक
टीईटी – I, सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, 30 ऑक्टोबर 2021
टीईटी – II, दुपारी 2 ते 4.30, 30 ऑक्टोबर 2021
प्रवेशपत्र कुठे मिळणार?
टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर https://mahatet.in/ प्रवेशपत्र उपलब्ध होईल.
टीईटी परीक्षेचं वेळापत्रक
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ 30/10/2021 वेळ स. 10:30 ते दु 13:00
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ 30/10/2021 वेळ दु. 14:00 ते सायं. 16:30
पात्रता
टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
पेपर 1 मध्ये कोणत्या अभ्यासक्रमावर प्रश्न
बालविकास आणि पेडॉगॉजी, मराठी आणि इंग्रजी भाषा , गणित यावर टीईटी परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 मध्ये प्रश्न विचारले जातात.
पेपर क्रमांक 2 मध्ये कोणत्या अभ्यासक्रमावर प्रश्न
बालविकास आणि पेडॉगॉजी. इंग्रजी आणि मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्रे या विषयांवर आधारीत प्रश्न पेपर क्रमांक दोन मध्ये विचारले जातात.
टीईटी परीक्षेमध्ये 60 टक्केंहून अधिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण उत्तीर्ण केले जातं. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी गुणांची मर्यादा 55 टक्के निश्चित करण्यात आली आहे.
Maha TET Exam Postponed 2021 – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीनं घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टीईटी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचं आयोजन 10 ऑक्टोबरला करण्यात येणार होतं. मात्र, काही विद्यार्थ्यांच्या त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असल्यानं राज्य सरकारच्या परवानगीनं टीईटी परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता टीईटी परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं यासंदर्भात सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे.
10 ऑक्टोबरला घेण्यात येणारी टीईटी परीक्षा लांबणीवर टाकली गेली आहे. आता 31 ऑक्टोबरला परीक्षा होणार असल्यानं प्रवेशपत्र देखील आता उशिरानं मिळणार आहेत. 14 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान प्रवेशपत्र मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
टीईटी परीक्षचे दोन पेपर
साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात
शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर
प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. 1 ली ते इ. 5 वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. 6 वी ते इ. 8 वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.
प्रवेशपत्र कुठे मिळणार?
टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर https://mahatet.in/ प्रवेशपत्र उपलब्ध होईल.
टीईटी परीक्षेचं वेळापत्रक
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ 31/10/2021 वेळ स. 10:30 ते दु 13:00
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ 31/10/2021 वेळ दु. 14:00 ते सायं. 16:30
पात्रता
टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
पेपर 1 मध्ये कोणत्या अभ्यासक्रमावर प्रश्न
बालविकास आणि पेडॉगॉजी, मराठी आणि इंग्रजी भाषा , गणित यावर टीईटी परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 मध्ये प्रश्न विचारले जातात.
पेपर क्रमांक 2 मध्ये कोणत्या अभ्यासक्रमावर प्रश्न
बालविकास आणि पेडॉगॉजी. इंग्रजी आणि मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्रे या विषयांवर आधारीत प्रश्न पेपर क्रमांक दोन मध्ये विचारले जातात.
टीईटी परीक्षेमध्ये 60 टक्केंहून अधिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण उत्तीर्ण केले जातं. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी गुणांची मर्यादा 55 टक्के निश्चित करण्यात आली आहे.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents