Maharashtra TET Syllabus And Exam Pattern 2021

MAHA TET Syllabus 2021: Syllabus & Exam Pattern For Paper 1 & 2

Maharashtra TET Syllabus And Exam Pattern 2021 -The candidates willing to appear for the Teachers Eligibility Test of Maharashtra is eagerly waiting for Maha TET Syllabus and Exam Pattern. As MAHA TET Exam Pattern and Syllabus PDF 2021 is released on the official website. Candidates can visit official site or they can download Maha TET Syllabus 2021 PDF from below. Under Maha TET Exam 2021, Paper 1 is held for Class 1 to 5 while Paper 2 is held for Class 6 to 8. Check brief information on Maharashtra TET Syllabus And Exam Pattern 2021 at below

Maharashtra TET Syllabus And Exam Pattern 2021

पेपर (१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर)

१) भाषा-१ व २) भाषा-२

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.

भाषा-१ मराठी इंग्रजी उर्दु बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-२ इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी

इ. १ ली ते ५ वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील

३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.

या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत सध्या राज्यात सुरु असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील.

४) गणित :-

गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मुलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

गणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.

५) परिसर अभ्यास :-

परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मुलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. १ ली व इ. २ री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता १ ली ते ५ वी च्या अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ :-

  • प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
  • प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
  • संबंधित विषयांची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इ. १ ली ते १० वी ची पाठ्यपुस्तके
पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)
१) भाषा-१ व २) भाषा-२

पाठ्यक्रमाची (Syllabus) व्याप्ती :-

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.

भाषा-१ मराठी इंग्रजी उर्दु बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-२ इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी

इ. ६ वी ते ८ वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील.

३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.

या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.

४ अ) गणित व विज्ञान विषय गट :-

गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मुलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठ्यक्रम लागू राहील.

४ ब) सामाजिक शास्त्रे विषय गट :-

सामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ :-

  • प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी व पाठ्यक्रम
  • प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
  • प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इ. १ ली वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके
  • प्रचलित बी.एड्. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

MAHA TET Exam Pattern 2021

शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.

  • प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. १ ली ते इ. ५ वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
  • उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. ६ वी ते इ. ८ वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
  • प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर)

  • एकूण गुण १५०
  • कालावधी-२ तास ३० मिनिटे
अ.क्र. विषय (सर्व विषय अनिवार्य) गुण प्रश्न संख्या प्रश्न स्वरुप
बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र ३० ३० बहुपर्यायी
भाषा-१ ३० ३० बहुपर्यायी
भाषा-२ ३० ३० बहुपर्यायी
गणित ३० ३० बहुपर्यायी
परिसर अभ्यास ३० ३० बहुपर्यायी
एकूण १५० १५०

पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी)

अ. क्र. माध्यम पेपर सांकेतांक विभाग १ विभाग २ विभाग ३ विभाग ४ विभाग ५
भाषा (३० गुण) भाषा (३० गुण) बालमानसशास्र व अध्यापनशास्र (३० गुण) गणित (३० गुण) परिसर अभ्यास (३० गुण)
प्रश्न क्र.१ ते ३० प्रश्न क्र.३१ ते ६० प्रश्न क्र.६१ ते ९० प्रश्न क्र.९१ ते १२० प्रश्न क्र.१२१ ते १५०
मराठी १०१ इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
इंग्रजी २०१ इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
उर्दु ३०१ इंग्रजी किंवा मराठी उर्दु उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी
हिंदी ४०१ इंग्रजी किंवा मराठी हिंदी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
बंगाली ५०१ इंग्रजी किंवा मराठी बंगाली मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
कन्नड ६०१ इंग्रजी किंवा मराठी कन्नड मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
तेलुगु ७०१ इंग्रजी किंवा मराठी तेलुगु मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
गुजराती ८०१ इंग्रजी किंवा मराठी गुजराती मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
सिंधी ९०१ इंग्रजी किंवा मराठी सिंधी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी

पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)

  • एकूण गुण १५०
  • कालावधी-२ तास ३० मिनिटे
अ.क्र. विषय (सर्व विषय अनिवार्य) गुण प्रश्न संख्या प्रश्न स्वरुप
बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र ३० ३० बहुपर्यायी
भाषा-१ ३० ३० बहुपर्यायी
भाषा-२ ३० ३० बहुपर्यायी
अ) गणित व विज्ञान
किंवा
ब) सामाजिक शास्त्रे
६० ६० बहुपर्यायी
एकूण १५० १५०

पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी)

अ. क्र. माध्यम पेपर सांकेतांक विभाग १ विभाग २ विभाग ३ विभाग ४
भाषा (३० गुण) भाषा (३० गुण) बालमानसशास्र व अध्यापनशास्र (३० गुण) गणित व विज्ञान (६० गुण) सामाजिक शास्र (६० गुण)
प्रश्न क्र.१ ते ३० प्रश्न क्र.३१ ते ६० प्रश्न क्र.६१ ते ९० प्रश्न क्र.९१ ते १५० प्रश्न क्र.९१ ते १५०
मराठी १०२ इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
इंग्रजी २०२ इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
उर्दु ३०२ इंग्रजी किंवा मराठी उर्दु उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी
हिंदी ४०२ इंग्रजी किंवा मराठी हिंदी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
बंगाली ५०२ इंग्रजी किंवा मराठी बंगाली मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
कन्नड ६०२ इंग्रजी किंवा मराठी कन्नड मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
तेलुगु ७०२ इंग्रजी किंवा मराठी तेलुगु मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
गुजराती ८०२ इंग्रजी किंवा मराठी गुजराती मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
सिंधी ९०२ इंग्रजी किंवा मराठी सिंधी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी

पेपर II मधील अ.क्र १ ते ३ विषय अनिवार्य आहेत. गणित व विज्ञान शिक्षकांसाठी विषय ४ मधील “अ” आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय ४ मधील “ब” व इतर शिक्षकांसाठी विषय क्र ४ मधील “अ” किंवा “ब” पैकी कोणताही एक विषय निवडता येईल.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०२१ चे वेळापत्रक-Maha TET Schedule 2021

अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ०३/०८/२०२१ ते २५/०८/२०२१ वेळ २३:५९ वाजेपर्यंत
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. २५/०९/२०२१ ते १०/१०/२०२१
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ १०/१०/२०२१ वेळ स. १०:३० ते दु १३:००
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ १०/१०/२०२१ वेळ दु. १४:०० ते सायं. १६:३०

Download  Maha TET Syllabus PDF 2021

Maharashtra TET Online Form 2021

Leave a Comment