MahaDBT Online Application Form 2022

डीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ व नूतनीकरण करण्यास ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

MahaDBT Online Application Form 2022 –  Social Justice Minister Dhananjay Munde has announced an extension till January 31 to apply for the benefits of scholarships, tuition fees, examination fees etc. through the Maha DBT Portal. In addition, students who have applied in the year 2020-21 but have errors have also been given an extension till January 31 to rectify the errors or to amend the application. Know More details about MahaDBT Online Application Form 2022 , MahaDBT Online Registration 2022, MahaDBT Application Form 2022 at below

MahaDBT Scholarship 2022 Registration Date, Online Application Form

महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

त्याचबरोबर २०२० – २१ या वर्षात अर्ज केलेले मात्र त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना देखील त्रुटींची पूर्तता करणे किंवा अर्जात दुरुस्ती करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Documents Required for MahaDBT Scholarship 2022

  • Caste certificate
  • Income certificate / Income Declaration
  • Caste Validity Certificate
  • HSC or SSC mark sheet
  • Gap certificate
  • If applicable father/Guardians death certificate
  • Ration Card
  • Leaving Certificate
  • Declaration certificate of parents/guardians about the number of children beneficiaries

नूतनीकरणास ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील सुमारे ४.७० लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरून वरील सवलतींचा लाभ घेत असतात. यावर्षी यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास १२ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. काही कोर्सेसचे सीईटीचे राऊंड अजूनही सुरू आहेत, त्यामुळे दिनांक १२ जानेवारीपर्यंत केवळ १.१६ लाख विद्यार्थीच डीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकले आहेत. याचाच विचार करून, पात्र असलेले लाभार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी लाभांपासून वंचित राहू नयेत यासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास किंवा मागील वर्षीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारीच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.

???? अर्ज करा


मुदतवाढ – ‘महाडीबीटी’ शिष्यवृत्तीसाठी भरा ऑनलाइन अर्ज !

MahaDBT Online Application Form 2021-2022 : The MahaDBT portal for online application of schemes has been launched from December 3. Accordingly, all the colleges should instruct the students from their level to fill up the application form online in the Fresh and Renewal MahaDBT system for Scheduled Castes, Deprived Castes, Nomadic Tribes, Other Backward Classes and Special Backward Classes. Read further details about MahaDBT Online Application Form 2021-2022 at below:

Application Acceptance (New/Renewal) for A.Y.20-21 has been Extended to 15th July 2021. Last date for Application Re-Apply of A.Y. 19-20 is 15th July 2021.

New Update – राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे उच्च शिक्षणासाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलद्वारे देण्यात येणाऱ्या १४ वेगवेगळ्या शिष्यवृत्तींच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २०२०-२१ च्या शैक्षणिक वर्षासाठी आता १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार असून २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी असल्यास त्यांनाही १५ जुलैपर्यंत पुन्हा अर्ज करण्यासाठी संधी देण्यात आली आहे.

How To Apply For MahaDBT Online?

१. mahaDBT पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन आयडी, पासवर्ड तयार करा.

२. पोर्टलवर लॉग इन व्हा.

३. तुमचे प्रोफाइल तयार करा.

४. ज्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहात त्यासाठी अर्ज करा.

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना mahadbtmahait.gov.in (महाडीबीटी) या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याचे आवाहन मुंबई शहरचे समाजकल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केले आहे.

पुन्हा अर्ज करणाऱ्यांसाठी…

१. लॉग इन करा.

२. त्रुटी असलेला अर्ज दिसेल.

३. त्यामध्ये दुरुस्ती करून पुन्हा एकदा ‘सबमिट’ करा.

मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरीता शिष्यवृत्ती

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरीता शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता इ. योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता महाडिबीटी पोर्टल ३ डिसेंबर पासून सुरू झालेले आहे. त्या अनुषंगाने सर्व महाविद्यालयांनी अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नविन प्रवेशित (Fresh) व नुतनीकरण (Renewal) महाडीबीटी प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याकरीता विद्यार्थ्यांना आपल्या स्तरावरुन सूचना द्याव्यात.

महाडीबीटी पोर्टल – 

महाविद्यालयांनी त्यांचे स्तरावर प्राप्त अर्जाची पडताळणी करुन परिपूर्ण पात्र अर्ज जिल्हा समाज कल्याण लॉगीनला विहीत मुदतीत ऑनलाईन पद्धतीने पाठवावेत. सन २०११-१२ ते २०१७-१८ या कालावधीमधील अन्वेषण प्रस्तावामधील आवश्यक प्रपत्र ‘क’ महाविद्यालयांनी दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजीपर्यंत या कार्यालयास सादर करावेत व ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. सन २०१८-१९ व २०१९-२० या वर्षामधील महाडीबीटी पोर्टलवरील बऱ्याच विद्यार्थ्यांचे आधार नंबर बँकेमधील विद्यार्थ्यांच्या खात्याशी NPCI लिंक नसल्याने विद्यार्थ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग झालेले नाही अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ त्यांचा आधार नंबर त्यांचे बँक खात्यासोबत NPCI लिंक करून महाडीबीटी प्रणाली मधील त्यांचे खाते अपडेट करावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर समाधान इंगळे यानी केले आहे.


MahaDBT Online Application Form 2021-2022 – पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) (PMC DBT Online Application 2021)  कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींना लाभ, अनुदान आणि सेवा पुरविण्यासाठी पीएमसी डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) आणि सेवा हे संकेतस्थळ विकसित केले आहे. 10 वी व १२ वि उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेअंतर्गत पुढील शिक्षाणासाठी अर्थ सहाय्य देण्याचे कार्यान्वित आहे. त्याकरिता इच्छुक उमेदवारांनी २९ फेब्रुवारी २०२१ पर्यंत आपले अर्ज सादर करावे …

PMC Direct Benefit Transfer (DBT) 

DBT Pune social development department Schemes Online Application 2021

Particulars Details
Name of the Portal PMC Direct Benefit Transfer (DBT)
Other Name of Scholarship Direct Benefit Transfer
Session 2020-2021
Registration Process  for PMC Direct Benefit Transfer (DBT)  Online
Beneficiaries include Students belonging from reserved category in Maharashtra
Official PMC Direct Benefit Transfer (DBT)  Login Web Portal www.dbt.punecorporation.org
Scholarship Granted by Government of Maharashtra

 

 

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसंदर्भात माहितीसाठी- येथे क्लिक करा 


MahaDBT Online Application Form 2021-2022 – The Maharashtra State government has come up with a portal Mahadbt Scholarship to all of the students of the Maharashtra state who are not able to pay their fee. Also, this portal has been designed so that the students no longer have to visit the government office to avail the benefit of the different scholarship which are available for them. There are different scholarships present for different types of students and different types of categories and religion of the student. Online Registartion for MahaDBT 2021 has been started and Government urges to apply till 31st January 2021. More details about MahaDBT Online Application Form 2021-2022 are as given below

महाडीबीटी लॉगिन – महत्वाची ठळक वैशिष्ट्ये( Aaple Sarkar DBT Portal Scholarship Schemes Details)

Particulars Details
Name of the Portal MahaDBT (Maharashtra Direct Benefit Transfer)
Other Name of Scholarship Direct Benefit Transfer
Session 2020-2021
Registration Process Online
Beneficiaries include Students belonging from reserved category in Maharashtra
Official MahaDBT Login Web Portal https://mahadbtmahait.gov.in/login/login
Scholarship Granted by Government of Maharashtra

सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी (MAHADBT) पोर्टल दि. ०३ डिसेंबर  २०२० पासून कार्यान्वित झाले असून, https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काच्या प्रलंबित अर्जाबाबत

महाडिबीटी  संगणक प्रणाली सन २०१९-२० मधील विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे, अर्ज अद्ययावत करणे तसेच विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज पुढील कार्यवाहीसाठी फॉरवर्ड करणे इत्यादी करिता महाडिबीटी संगणक प्रणाली दि.०३.१२.२०२० पासून सुरु करण्यात आली  आहे. सबब सर्व महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, महाविद्यालय स्तरावरील सर्व प्रलंबित अर्ज दिलेल्या कालावधीत पडताळणी करुन त्यावर योग्य ती कार्यवाही करावी. तसेच सन २०१९-२० या वर्षातील महाडिबीटी संगणक प्रणालीमध्ये  प्रलंबित राहिल्यास आपोआप नामंजूर करण्यात येतील. याची नोंद घ्यावी. कालमर्यादत प्रलंबित अर्जावर योग्य ती कार्यवाही करावी.

या अनुषंगाने उपराक्त सूचनांचे पालन न केल्यास व शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या बँक खात्यावर जमा न झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थ्याची असेल व याबाबत सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी राहणार नाही. याची सर्व प्राचार्य व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाविद्यालयांसाठी विशेष सूचना

आपल्या महाविद्यालयातील / विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधी (UR.GS.SR) यांना आपल्या स्तरावरुन उपरोक्त सूचना विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना त्वरित कळविण्यात याव्यात. आपल्या स्तरावरुन  जाहीर आवाहन महाविद्यालयाच्या मुख्य सूचना फलक तसेच आवश्यकता असल्यास परिपत्राकाद्वारे प्रसिद्धी करण्यात यावेत, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी कळविले आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसंदर्भात माहितीसाठी- येथे क्लिक करा 

Leave a Comment