Maharashtra Anganwadi Bharti 2023

एकात्मिक बाळ विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अकोला – वाशीम अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Maharashtra Anganwadi Bharti 2023 Integrated Child Development Services Scheme, Child Development Project Officer (Civil) Akola – Washim has invited application for the posts of “Anganwadi helper”. There are total of 17 vacancies are available. Application will start from 03rd of July 2023. Also, last date to apply is 14th of July 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Akola – Washim Job 2023

Maharashtra Anganwadi Recruitment 2023: एकात्मिक बाळ विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अकोला – वाशीम द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “अंगणवाडी मदतनीस” पदाच्या १७ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ०३ जुलै २०२३ पासून सुरु होईल. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Integrated Child Development Services Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस
पद संख्या १७ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
वेतन – रु. ५५००/-
अर्ज सुरु होण्याची तारीख – ०३ जुलै २०२३
शेवटची तारीख –  १४ जुलै २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता नगर पंचायत, नगर परिषद कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) अकोला – वाशीम
अधिकृत वेबसाईट – washim.gov.in

Eligibility Criteria For Anganwadi helper Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
अंगणवाडी मदतनीस 17 12th Pass

How to Apply For Child Development Project Officer Vacancy 2023

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी उमॆद्वारणनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज ०३ जुलै २०२३ पासून सुरु होतील.
 • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२३ आहे.
 • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For washim.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

 

 

 

 

 

Anganwadi Sevika Bharti 2022: Anganwadi workers and helpers should be recognized as government employees. Until then, they should get a minimum salary of Rs 26,000, a pension, and graduation was demanded in the meeting. A meeting of Anganwadi workers and helpers was held at Situ Bhavan. Sitaram Thombre, District President of CITU was in the chair. On this occasion, the Vice President of All India CITU and President of Maharashtra CITU Dr. D. L. Guided by Karad.

Anganwadi Sevika Bharti Update 

Anganwadi workers and helpers should be recognized as government employees. Until then, they should get a minimum salary of Rs 26,000, pension, and graduation which was demanded in the meeting. District President of Anganwadi Workers Sulakshana Thombre and General Secretary Kalpana Shinde also expressed their views. A large number of Anganwadi workers and helpers including Sunita Mogal, Lata Lavale, Surekha Pawar, Gauri Vaidya, Ambabai Gumbade, Kusum Khokare, Sunita Kambli, Leela Bhoye, Vaishali Ghumre, etc. were present on this occasion. Sunita Mogul thanked.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी. तोपर्यंत त्यांना २६ हजार रुपये किमान वेतन मिळावे, पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळावी, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सिटू भवन येथे मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सिटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे होते. यावेळी अखिल भारतीय सीटूचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र सिटूचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी मार्गदर्शन केले.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी. तोपर्यंत त्यांना २६ हजार रुपये किमान वेतन मिळावे, पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळावी, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली. अंगणवाडी सेविकांच्या जिल्हाध्यक्ष सुलक्षणा ठोंबरे, सरचिटणीस कल्पना शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सुनीता मोगल, लता लावले, सुरेखा पवार, गौरी वैद्य, अंबाबाई गुंबाडे, कुसुम खोकरे, सुनीता कांबळी, लीला भोये, वैशाली घुमरे, आदीसह अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुनीता मोगल यांनी आभार मानले.

 


अंगणवाडी सेविका व मदतनिसांना एकरकमी लाभ !!

Anganwadi Sevika Bharti 2022 – Anganwadi Workers, Mini Anganwadi Workers and Mini Helpers in the state will get a benefit of Rs. Rs 100 crore.Today, Chief Minister Uddhav Thackeray has approved to distribute this fund of Rs 100 crore.This decision of the Chief Minister will provide funds to the Anganwadi Workers, Mini Anganwadi Workers and Mini Helpers in the state for their lump sum benefits under retirement, resignation, dismissal or post-death insurance scheme. This decision will benefit thousands of Anganwadi workers and helpers.

राज्यातील अंगणवाडी सेविका (Anganwadi Workers), मिनी अंगणवाडी सेविका आणि मिनी मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेसाठी शंभर कोटींचा निधी मिळणार आहे. हा शंभर कोटींचा निधी वितरीत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मिनी मदतनीस यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे  किंवा मृत्युनंतर देण्यात येणाऱ्या विमा योजनेंतर्गत एकरकमी लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा लाभ हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना होणार आहे.

एकरकमी लाभाचे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळास हप्ता देण्यासाठी हा निधी मिळावा असा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने सादर केला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत मान्यता दिली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे असे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहणार आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया कधी ?

Anganwadi Sevika Bharti 2022 – As per the order of the state government, the process of filling up the vacancies of Anganwadi workers and helpers has been started in Ramtek taluka. Applications for these posts were to be handed over to Gram Sevaks by Monday (21st). However, Gramsevak from Pusada Rehabilitation No. 1 (Tal. Ramtek) has not come to the office for six days. Therefore, the question of who should be handed over the application was raised in front of the aspirants and the recruitment process was hampered.

राज्य सरकारच्या आदेशान्वये रामटेक तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी करावयाचे अर्ज सोमवार (दि. २१) पर्यंत ग्रामसेवकांकडे सोपवायचे होते. मात्र, पुसदा पुनर्वसन क्रमांक-१ (ता. रामटेक) येथील ग्रामसेवक सहा दिवसांपासून कार्यालयात आले नाही. त्यामुळे अर्ज सोपवायचे कुणाकडे असा प्रश्न इच्छुकांसमोर निर्माण झालेल्याने येथील भरती प्रक्रिया वांध्यात आली.

Anganwadi Sevika Bharti 2022


कोल्हापूर अंगणवाडी भरती 2022 -प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षक, या रिक्त पदांसाठी !!

Anganwadi Sevika Bharti 2022 – Kolhapur Anganwadi Recruitment 2022 : Good news for those looking for the latest government jobs in Maharashtra. The Government of Maharashtra has issued various employment notifications for the purpose of providing more job opportunities to the eligible persons. As per our latest information, Kolhapur Anganwadi vacancies will be released in 2022 to fill district wise Anganwadi posts. Candidates who are waiting for a job in Kolhapur can avail this opportunity and apply online, on the official website you can apply for Kolhapur Anganwadi Recruitment 2022, Anganwadi Sevika Bharti 2022

महिला आणि बाल विकास मंत्रालय, महाराष्ट्र सरकार कोल्हापूर अंगणवाडी भरती 2022 प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षक, या रिक्त पदांसाठी प्रसिद्ध करणार आहे. कार्यकर्ता, मदतनीस आमच्या ताज्या माहितीनुसार कोल्हापूर अंगणवाडी रिक्त जागा 2022 मध्ये जिल्हानिहाय अंगणवाडी पदे भरण्यासाठी मुक्त केली जाईल. जे उमेदवार कोल्हापुरात नोकरीच्या प्रतीक्षेत होते, ते या संधीचा उपयोग करू शकतात आणि ऑनलाइन अर्ज करू शकतात, ज्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही कोल्हापूर अंगणवाडी भरती 2022 साठी अर्ज करू शकता

कोल्हापूर अंगणवाडी भरती 2022 साठी पात्रता निकष – Kolhapur Anganwadi Bharti Eligibility 2022

1.उमेदवार भारतीय राष्ट्रीयत्वाचा असावा.

2.उमेदवार महाराष्ट्र राज्याचा असावा आणि त्याने स्थानिक/गैर-स्थानिक दर्जाच्या आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत.

शैक्षणिक पात्रता-  Eductaional Details

अंगणवाडी मदतनीस:

 • उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड/शाळेतून इयत्ता वी उत्तीर्ण केलेली असावी
 • उमेदवाराने  मान्यताप्राप्त बोर्ड/शाळेतून 10वी उत्तीर्ण केलेली असावी.

पर्यवेक्षक:

 • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

प्रकल्प अधिकारी: 

 • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ज कसा करावा- कोल्हापूर अंगणवाडी ऑनलाइन अर्ज 2022 | How To Apply For Anganwadi Sevika Bharti 2022

ICDS महाराष्ट्र हे अर्ज https://womenchild.maharashtra.gov.in/ जिल्हानिहाय अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातील. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न पाहता उमेदवारांना अगोदरच अर्ज करण्याची सक्त सूचना देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यासाठी पात्रता निकष आणि इतर आवश्यकता पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी अर्जाचा वापरकर्ता मार्गदर्शक डाउनलोड केला पाहिजे आणि तो काळजीपूर्वक वाचा. नोंदणी प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे, पहिल्या टप्प्यात इच्छुकांनी अर्ज शुल्क भरावे लागेल तर दुसऱ्या टप्प्यात उमेदवार अर्ज भरून सबमिट करू शकेल. उमेदवाराने अर्जाची प्रिंटआउट घ्यावी आणि भविष्यातील संदर्भासाठी संग्रहित करावी.

The application process is given below step by step

1. Candidate has to visit official website https://womenchild.maharashtra.gov.in

2. Download recruitment notification pdf, read full details of vacancies ..

3. If you are sure that you are fully qualified, you can participate in the recruitment

.4. Click on the application. A new screen will open after that


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांच्या भरती प्रक्रियेला राज्य सरकारने चौथ्यांदा स्थगिती दिली; जाणून घ्या काय कारण आहे ?

Anganwadi Sevika Bharti 2021 – The recruitment of Anganwadi workers and helpers has been postponed for the fourth time by the state government. The postponement has again created confusion over filling vacancies. A total of 6,384 posts of maids and helpers have been vacant in the last five years. This includes about two hundred and fifty seats in Pune district. Know Latest Update on Anganwadi Sevika Bharti 2021  at below

अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांच्या भरती प्रक्रियेला राज्य सरकारने चौथ्यांदा स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे रिक्त असलेली पदे भरण्याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.

मागील पाच वर्षांपासून राज्यातील सेविका आणि मदतनिसांची मिळून ६ हजार ३८४ जागा रिक्त आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सुमारे अडीचशे जागांचा समावेश आहे.

राज्यातील एकूण रिक्त जागांमध्ये अंगणवाडीसेविकांच्या ३ हजार ४३६, मिनी अंगणवाडीसेविकांच्या १ हजार ११७ आणि मदतनिसांच्या १ हजार ८३१ जागा आहेत. या सर्व जागा २०१६ पासून रिक्त असल्याचे राज्याच्या महिला व बालविकास विभागातून सांगण्यात आले.

या जागा भरण्यासाठी २०१७ मध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. या आदेशानुसार ही भरती प्रक्रिया सुरु झाली होती. त्यानंतर ते मध्येच स्थगित केली होती. त्यानंतर दरवर्षी या भरतीला परवानगी देण्यात आली आणि प्रक्रिया सुरु होताच, ती स्थगित करण्यात आली. या स्थगितीसाठी कधी अर्थ विभागाने परवानगी नाकारल्याचे तर, कधी निधी नसल्याचे कारण दिले. मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाचे कारण देत या भरतीला स्थगिती दिली होती.

ही स्थगिती पुन्हा १ सप्टेंबर २०२१ ला उठवत, काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता पुण्यासह अन्य जिल्ह्यांतील निम्मी रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. तसा आदेश जिल्हा परिषदांना दिला होता. या आदेशानुसार जिल्हा परिषदांनी ही प्रक्रिया सुरु केली होती. परंतु या भरतीलाही आता सरकारने स्थगिती दिली आहे.

राज्यातील नंदूरबार, गडचिरोली, उस्मानाबाद, वाशीम, आणि गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, पालघर व अमरावती या जिल्ह्यांमधील काही तालुक्यांतील सर्व रिक्त पदे भरण्यास आणि या जिल्ह्यांव्यतिरिक्त अन्य सर्व जिल्ह्यांमधील ५० टक्के पदे भरण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता.

पुणे जिल्ह्यात सुमारे अडीचशे जागा रिक्त

पुणे जिल्ह्यात अंगणवाडी व मिनी अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांच्या मिळून २३९ जागा रिक्त आहेत. यामध्ये १८९ अंगणवाडीसेविका आणि ५० मदतनिसांच्या जागांचा समावेश आहे. सरकारच्या भरती आदेशानुसार अंगणवाडीसेविकांच्या ९५ जागा आणि मदतनिसांच्या २५ जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला होता. जिल्ह्यात एकूण ४ हजार २४६ अंगणवाड्या आणि ४५२ मिनी अंगणवाड्या आहेत. या दोन्ही अंगणवाड्यांसाठी मिळून अंगणवाडीसेविकांची एकूण ४ हजार ६९८ पदे तर, मदतनिसांची ३ हजार ८३९ पदे आहेत.


खुशखबर !! राज्यातील अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांची रिक्त पदे भरण्यास परवानगी

Anganwadi Sevika Bharti 2021 – राज्यातील अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांची रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने आता परवानगी दिली आहे. यामुळे सुमारे तीन वर्षांच्या खंडानंतर ही रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता पुण्यासह अन्य जिल्ह्यांतील निम्मीच रिक्त पदे भरण्याचा आदेश सरकारने जिल्हा परिषदांना दिला आहे. या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या १८९ रिक्त जागांपैकी केवळ ९५ जागा भरता येणार आहेत.

याशिवाय जिल्ह्यातील मदतनिसांच्या ५० जागा रिक्त असून, त्यापैकी २५ जागा भरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. सद्यःस्थितीत राज्यात ३ हजार ४३६ पदे रिक्त आहेत. मिनी अंगणवाडीसेविकांची १ हजार ११७ तर मदतनिसांची १ हजार ८३१ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी नंदूरबार, गडचिरोली, उस्मानाबाद, वाशीम, आणि गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, पालघर व अमरावती या जिल्ह्यांमधील काही तालुक्यांतील सर्व रिक्त पदे भरली जाणार आहेत. या जिल्ह्यांव्यतिरिक्त अन्य सर्व जिल्ह्यांमधील ५० टक्के पदे भरली जाणार आहेत.

पुणे जिल्ह्यात एकूण ४ हजार २४६ अंगणवाड्या आणि ४५२ मिनी अंगणवाड्या आहेत. या दोन्ही अंगणवाड्यांसाठी मिळून अंगणवाडीसेविकांची एकूण ४ हजार ६९८ पदे आहेत. जिल्ह्यातील मदतनिसांची एकूण पदे ही सुमारे चार हजारांच्या आसपास आहेत.


खुशखबर !! अंगणवाडीसेविका, मदतनीसांच्या ३९७ जागांसाठी भरती

Anganwadi Sevika Bharti 2021 – Integrated Child Development Services projects in the district under Women and Child Welfare Department is going to recruit 397 vacancies in 23 ICDS Projects. Applications have been invited from aspiring candidates for the vacant posts of 131 Anganwadi Workers, 217 Helpers and Mini Anganwadi Workers. This year, for the first time, the age limit of candidates has been increased by two years.

महिला व बालकल्याण विभागांतर्गत जिल्यातील 23 एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पांमधील रिक्त 397 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यात अंगणवाडी सेविका 131, मदतनिस 217 व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या रिक्त 49 जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यंदा प्रथमच उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली आहे.

अनेक वर्षांपासून अंगणवाडीतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया रखडली होती. मात्र, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पदभरतीला हिरावा झेंडा दाखवला. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी उमेदवारांच्या वयोमर्यादा 30 वरुन 40 करण्याची मागणी केली होती. परंतु, राज्य सरकारने ही वयोमर्यादा 32 पर्यंत वाढवली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण 23 प्रकल्पांमधील रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

सुरगाणा-१, रावळगाव आणि मालेगाव या प्रकल्पांमध्ये एकही जागा रिक्त नसल्याने येथे ही प्रक्रिया राबवण्यात येत नाही. जाहिरातीमध्ये उमेदवारांना अटी व शर्तींची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही 21 ते 32 या वयोगटातील असावी. तसेच स्थानिक रहिवाशी असल्याचा गाव नमुना नं.8 चा उतारा जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.

अंगवाडी सेविका व मिनी सेविका होण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, मदतनीस या पदासाठी इ.सातवी उत्तीर्णतेची अट आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांना मागास असल्याचा दाखला जोडणे अनिवार्य असेल. लहान कुटुंबातील असल्याचा दाखला जोडावा लागेल. तसेच जाहिरातीमध्ये नमूद अटी व शर्तींची पूर्तता करुन उमेदवारांना अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमुळे अंगणवाडीतर्फे राबवण्यात येणारे उपक्रम यशस्वी करण्यास मदत होईल. तसेच गरोदर माता व बालकांना योग्य आहार पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शासनाच्या नियमांप्रमाणे भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिलेल्या आहेत. यात कोठेही गडबड झाल्यास संबंधित अधिकार्‍यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल. प्रत्येक आठवड्याला आढावा बैठक घेवून प्रक्रियेवर लक्ष ठेवले जात आहे.
– दीपक चाटे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जि.प.

 


Anganwadi Sevika Bharti 2021 –  Good News For Female Candidates Searching for Job in Anaganwadi ! As The Women and Child Development Department of the Zilla Parishad will soon start the recruitment process for the vacant posts of Anganwadi Workers, Mini Workers and Helpers. For this, the age limit of candidates has been increased to 32 after two years.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे लवकरच अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून 32 करण्यात आली आहे. याविषयी महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांनी 6 मे 2021 रोजी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांना यासंदर्भात निवेदन दिले होते.

अंगणवाडी सेविका, मिनी सेविका, मदतनीस पदावर भरतीसाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे अशी आहे. आदिवासी ग्रामीण भागात अनेक विधवा, परितक्ता महिलांचे वयोमान ३० वर्षापेक्षा जास्त असल्याचे आढळून आलेले आहे. नोकरीच्या संधीपासून वंचित राहतात. नाशिक जिल्ह्यातही अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस रिक्तपदाची भरती प्रक्रिया राबविणेबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. ही भरती प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी सरळसेवा नियुक्तीच्या वयोमर्यादामध्ये वाढ करावी, अशी मागणी सभापती अश्विनी आहेर यांनी केली होती. त्यानुसार 23 जून 21 रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी वयोमर्यादेत 2 वर्षे वाढ केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना न्याय मिळेल, असे सभापती आहेर यांनी सांगितले.


Anganwadi Sevika Bharti 2021 – In Nashik District, Permission has been given For 225 Anganwadi Centres under ZP and Mahila Bal Vikas. There is almost 1300+ Vacant Posts Of Anganwadi Helper, Anganwadi Sevika and Mini Anganwadi Sevika. These vacant posts is going to be filled soon by WCD Nashik as per the meeting held on. Read below details Of Anganwadi Sevika Bharti 2021 at below:

Mini Anganwadi Sevika Bharti 2021– जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अंगणवाडी बांधकामासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले असून, जिल्ह्यात लवकरच नव्याने २२५ अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अश्‍विनी आहेर यांनी ही माहिती दिली.

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीमध्ये नवीन २२५ अंगणवाड्यांना मंजुरी-Anganwadi Workers Bharti 2021

जिल्ह्यात आदिवासी व बिगरआदिवासी क्षेत्रात पाच हजारांहून अधिक अंगणवाड्या आहेत. मात्र यातील अनेक अंगणवाड्या उघड्यावर किंवा समाजमंदिरात भरतात. अशा अंगणवाड्यांना हक्काची इमारत मिळावी म्हणून जिल्हा नियोजन समितीत अंगणवाडी बांधकामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

त्यानंतर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीमध्ये जिलE0ह्यात २२५ नवीन अंगणवाडी केंद्र इमारत बांधकामांना मंजुरी देण्यात आली. त्यानुसार आदिवासी क्षेत्रामध्ये नवीन १५९, तर बिगरअदिवासी क्षेत्रात ६६ अंगणवाडी केंद्राच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली. गणेश अहिरे, कविता धाकराव, रेखा पवार, स%5नीता सानप, कमल आहेर, गितांजली पवार-गोळे, शोभा बरके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे या वेळी उपस्थित होते.

अंगणवाडीत १,३२८ पदे रिक्त (Anganwadi Sevika Recruitment 2021)

जिल्ह्यात अंगणवाडीसेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडीसेविका मिळून एक हजार ३२८ पदे रिक्त आहेत.

 1. अंगणवाडी सेविकांची २४१
 2. अंगणवाडी मदतनीस- ९६४ व
 3. मिनी अंगणवाडी सेविकांची २३ रिक्त पदे आहेत

भरतीप्रक्रिया राबविण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार अंगणवाडीसेविका- मदतनीस भरतीप्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेशही श्रीमती आहेर यांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.

8 thoughts on “Maharashtra Anganwadi Bharti 2023”

 1. सर माझं Agreeculture final झालेलं आहे सर मी अपंग आहे मला नौकरीची खूप गरज आहे

  Reply
 2. सर मला अंगणवाडी सेविका काम करायला आवडेल मी T.Y.B.A आहे

  Reply
 3. Aanganwadi sevikeche age limit vadhvave karan ata krona mule tya ladies che vay vadht aahe tyna echha suddha aahe job karaychi mg korona mule vayamule tyanchi sandhi nko jayla please sahkary karA

  Reply

Leave a Comment