Advertisement

Maharashtra Foreign Scholarship Scheme

Maharashtra Foreign Scholarship Scheme – The Tribal Development Department implements various schemes for tribal students. Among them, scholarships are given to tribal students for the purpose of higher education abroad. The Commissioner of Tribal Development has appealed for immediate application for the scholarship of the Department of Tribal Development in view of the situation arising out of the corona outbreak.

आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकी आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने शिष्यवृत्ती दिली जाते . कोरोना प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता आदिवासी विकास विभागाच्या शिष्यवृत्तीसाठी तात्काळ अर्ज सादर करण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी केले आहे.

परदेशातील विविध विद्यापीठात अनेक नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. याच हेतूने आदिवासी विकास विभागाकडून परदेशातील विद्यापीठांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, अशा दहा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी आदिवासी विकास विभाग त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे. तथापि, ज्या परदेशी विद्यापीठांचे जागतिक रँकिंग ३०० पर्यंत आहे, त्याच विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याना सदर शिष्यवृत्ती देय असणार आहे, अशी माहिती आदिवासी विकास विभाग आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिली. या शिष्यवृत्तीमध्ये आदिवासी विकास विभाग परदेशातील ज्या विद्यापीठात विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला आहे, त्या विद्यापीठास ऑनलाईन प्रणालीद्वारे विद्यापीठाच्या खात्यावर ट्युशन फी आणि परीक्षा फी जमा करण्यात येणार असून, विद्यार्थ्याचा निर्वाह भत्ता विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. निर्वाह भत्त्यामध्ये निवास आणि भोजन खर्च याचा समावेश असेल. याव्यतिरिक्त विमानप्रवास खर्च ,व्हिजा फी, स्थानिक प्रवास भत्ता, विमा आणि संगणक अथवा लॅपटॉप यांचा खर्च विद्यार्थ्याने स्वत: करावयाचा आहे. असेही आदिवासी विकास विभाग आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी कळविले आहे.

हे विद्यार्थी पात्र ठरतील

– विद्यार्थ्याचे वय जास्तीत जास्त ३५ असावे.
– नोकरी करीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही वयोमर्यादा ४० असेल.
– ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६.०० लक्ष इतकी असेल.
– परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक TOEFL किंवा IELTS या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष विचार यात केला जाईल.
– भूमिहीन आदिवासी कुटुंबातील , दुर्गम भागातील व आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यास प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी प्राधान्य असणार आहे.

अर्ज प्रकिया :

– सर्व अपर आयुक्त कार्यालये आणि सर्व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये तसेच https://tribal.maharashtra.gov.in येथे अर्जाचा नमुना उपलब्ध.
– विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये येथे दिलेल्या मुदतीच्या आत जमा करावीत.

अशी होईल निवड प्रक्रिया

– संबंधित विद्यार्थ्याने विहित नमुन्यात अर्ज दिलेल्या कालावधीत संबंधित प्रकल्प अधिकारी यांचेकडे सादर करावी.
– प्रकल्प स्तरावर अर्जाची योग्य छाननी होऊन सदर अर्ज अपर आयुक्त यांचेमार्फत आदिवासी विकास आयुक्तालयास सादर होईल.
– यानंतर आयुक्तालय स्तरावर गठीत केलेल्या निवड समितीद्वारे विद्यार्थी निवड होईल.
– सर्व आवश्यक शैक्षणिक प्रक्रिया, व्हिसा या पूर्ण होतील.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आमचा विभाग सतत प्रयत्नशील असतो. या शिष्यवृत्तीमुळे आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील ज्ञानाची कवाडे खुली होतील. याचसोबत उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्याचे मी आवाहन करतो.


आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती – या अभ्यासक्रमांसाठी मिळेल लाभ 

Maharashtra Foreign Scholarship Scheme – आदिवासी विकास विभाग शासन निर्णय नुसार शासनाने राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या खालील प्रमाणे 10 विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना 2005-2006 या वर्षापासून मंजूर करण्यात आलेली आहे.

1. एम.बी.ए. स्तर: पदव्युत्तर शिष्यवृत्ती संख्या: पदवी-0 पदव्युत्तर-2 एकुण लाभार्थी-2 2. वैद्यकीय अभ्यासक्रम स्तर: पदवी/पदव्युत्तर शिष्यवृत्ती संख्या: पदवी-1 पदव्युत्तर-1 एकुण लाभार्थी-2 3. बी. टेक (इंजिनिअरिंग) स्तर: पदवी/पदव्युत्तर शिष्यवृत्ती संख्या: पदवी-1 पदव्युत्तर-1 एकुण लाभार्थी-2 4. विज्ञान स्तर: पदवी/पदव्युत्तर शिष्यवृत्ती संख्या: पदवी-0 पदव्युत्तर-1 एकुण लाभार्थी-1 5. कृषी स्तर: पदवी/पदव्युत्तर शिष्यवृत्ती संख्या: पदवी-0 पदव्युत्तर-1 एकुण लाभार्थी-1 6. इतर विषयाचे अभ्यासक्रम स्तर: पदवी/पदव्युत्तर शिष्यवृत्ती संख्या: पदवी-0 पदव्युत्तर-2 एकुण लाभार्थी-2

Maharashtra Foreign Scholarship Scheme

पात्रता 

  • विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा व महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याचे कमाल वय 35 वर्षे असावे, तथापि नोकरी करित असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 40 वर्षे राहील, परंतु नोकरीत नसलेल्या उमेदवारास निवडीच्या वेळी प्राधान्य राहील.
  • सदर शिष्यवृत्ती आदिवासी कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस (मुलगा/मुलगी) आणि एका अभ्यासक्रमासाठीच अनुज्ञेय होईल.
  • ज्या परदेशी विद्यापीठांचे जागतिक रॅंकिंग ( Latest QS world ranking) 300 पर्यंत आहे, अशाच विद्यापीठात प्रवेश मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतील.

आवश्यक कागदपत्रे

  • विद्यार्थ्याचे अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र
  • सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेला उपन्नाचा दाखला (उत्पन्नाची मर्यादा रु 6.00 लक्ष)
  • परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे त्या विद्यापीठाचे पत्र व संबंधित विद्यापीठाच्या प्रॉस्पेक्टस् ची प्रत
  • परदेशातील ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. त्या अभ्यासक्रमाशी संबंधित असलेल्या/शाखेतील /विभागातील दोन विद्यकनिष्ठ/फॅकल्टी यांचे शिफारसपत्र
  • अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्कासह येणाऱ्या एकूण खर्चाचे संस्थेचे प्रमाणपत्र
  • विद्यार्थ्याचे आधारकार्ड


आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्तीचा लाभ

Maharashtra Foreign Scholarship Scheme -There is great news for students pursuing higher education in reputed universities abroad. Now it has been decided to partially change the rules of the foreign scholarship scheme under the Department of Social Justice.. Look at below information to know the changes in Maharashtra Foreign Scholarship Scheme

परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 

सामाजिक न्याय विभागांतर्गत परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या नियमात अंशतः बदल करण्यात आला असून, यानुसार आता योजनेचे लाभार्थी म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव लाभ नाकारल्यास निवड सूचीतील प्रतीक्षा यादीतील पुढील पात्र विद्यार्थ्याला परदेश शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकेल. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच  निर्गमित करण्यात आला आहे.

परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्चशिक्षण घेत असलेल्या ७५ विद्यार्थ्यांना विशेष निवड प्रक्रियेद्वारे या योजनेचा लाभ देण्यात येतो. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचीदेखील याच प्रकारची शिष्यवृत्ती योजना आहे. बऱ्याचदा विद्यार्थी दोन्हीही योजनांच्या लाभासाठी अर्ज करतात. परंतु, निवड झाल्यानंतर नियमानुसार त्यांना कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येतो.

राज्य सरकारच्या योजनेसाठी अंतिम निवड झालेल्या एखाद्या विद्यार्थ्याने ऐनवेळी अशा कारणांनी लाभ नाकारल्यास ती जागा रिक्त राहत असे, पर्यायाने काही विद्यार्थी पात्र असूनही योजनेच्या लाभांपासून वंचित राहत असत.

सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात रिक्त झालेल्या जागांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड करावी अशी मागणी करत काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु नियमावलीत तशी तरतूद नसल्याने न्यायालयाने प्रकरण निकाली काढले.

परदेश शिष्यवृत्ती योजनेचा कोटा आता १००% पूर्ण होणार

मात्र, विद्यार्थ्यांचे हित व मागणीचा विचार करत सामाजिक न्यायमंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी सदर योजनेच्या नियमात अंशतः बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता एखाद्या विद्यार्थ्याने अंतिम निवड झाल्यानंतर जर योजनेचा लाभ नाकारला तर त्याजागी निवड सूचीतील प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारास क्यूएसवर्ल्ड रॅकींगनुसार गुणानुक्रमे या योजनेचा लाभ देण्यात येईल व योजनेचा कोटा १००% पूर्ण करण्यात येईल.

Leave a Comment