Maharashtra HSC Exam Hall Ticket 2022

Maharashtra HSC Exam Hall Ticket 2022 – The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education is going to release Maharashtra HSC Hall Ticket 2022. Candidates who are going to appear in 10th 12th Examination in March April 2022 must check their Maharashtra Board Admit Card 2022. Without Maha HSC Hall Ticket 2022 you will not be allowed to enter and write your Examination.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता बारावीच्या मार्च- एप्रिल २०२२ परीक्षेचे ऑनलाइन हॉलतिकीट सर्व विद्यार्थ्यांना येत्या बुधवारी ९ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १ वाजल्यापासून कॉलेज लॉगइनमध्ये उपलब्ध होणार आहे. महाविद्यालयांनी हॉलतिकीट डाऊनलोड करून प्रिंट घेऊन विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत होणार आहे तर लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

हॉलतिकीट www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कॉलेज लॉगइन मध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास कॉलेजांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधायचा आहे.

हॉलतिकीट देण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी घ्यायची आहे.

बारावी 

  • तोंडी परीक्षा – 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022
  • लेखी परीक्षा – 4 मार्च 2022 ते 30 मार्च 2022

विषय व माध्यमबदल असल्यास…

प्रवेश पत्रात विषय व माध्यमात बदल झालेला असल्यास ती चूक महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन दुरुस्त करून घ्यायची आहे. मात्र, फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव यासंदर्भातील दुरुस्ती कॉलेजांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे.

विद्यार्थ्याचा फोटो सदोष असल्यात त्यावर विद्यार्थ्याचा योग्य फोटो चिकटवून संबंधित प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे.

बारावीच्या लेखी परीक्षाची सुरूवात ही ४ मार्च रोजी होऊन त्या ३० मार्चपर्यंत चालणार आहेत, तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च कालावधी होणार आहेत या परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षांचे हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाकडून तयारी केली जात असून त्यासाठी लवकरच माहिती जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

१० वी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी अंतर्गत मूल्यमापन विशेष मार्गदर्शक सूचना 

१२ वी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी प्रकल्प व तत्सम परीक्षा मार्गदर्शक सूचना

मार्च /एप्रिल २०२२ १२वी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत (hall ticket)

१० वी/१२वी मार्च/एप्रिल-२२ परीक्षांसंदर्भात नियंत्रण कक्ष व helpline सुविधा 

Circular regarding HSC Mar/Apr 2022 Exam. Time table partial changes. 

HSC Mar-Apr 2022 Exam. revised time table for 7TH & 8th March 22.

HSC/SSC MAR 20222 PRIVATE CANDIDATE EXTENDED DATE

HSC SSC MAR 2022 ABOUT EDIT OPTION 

१० वी व १२ वी मार्च/एप्रिल २०२२ आवेदनपत्र विलंब शुल्काबाबत 

Maharashtra HSC Hall Ticket 2022 डाउनलोड कसे करायचे ?

बारावी बोर्डाचे ऑनलाइन हॉल तिकीट www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान हॉलतिकीट मिळवताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधायचा असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी कोणतेही शुल्क न घेता सदर हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment