Advertisement

Maharashtra Job Fair 2021-State Level Rojagar Registration 2021

२५ हजार पदे – बेरोजगार उमेदवारांसाठी 12 ते 17 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन

Maharashtra Job Fair 2021 – Minister of State for Skill Development and Entrepreneurship Nawab Malik and Minister of State Shambhuraje Desai have organized a state level Maharojgar Melava with the noble concept of providing employment to unemployed youth in the state. Any needy unemployed candidate in the state can participate in this fair. Under Maha State Level Job Fair about 25 Thousand +Posts get Filled.  For this, you can download the Mahasvayam app and register for the meet. Registration is free. Through Skill Development, Employment and Entrepreneurship. An online state level job fair has been organized for educated unemployed candidates from 12 to 17 December 2021.

Maharashtra Job Fair 2021 

NOTE : To see the vacancies in your district Candidates can click on Advertisement Link Given Below. Now you can see  “Nothing Selected” under Search by employer district, Here you have to just click on CLEAR.. After that you will be able to see your Ditrict wise Maha Job Fair Vacancies

Under This State Level Maha Rojgar Melava 2021, there is a total of 25,000+ vacant posts to be filled for various Districts. This vacancies is for SALES MARKETING, EDUCATIONAL COUNCELLER, SALES TRAINEE, TRAINEE SALSMAN, MARKETING EXECUTIVE, MOULDING MACHINE OPERATOR, DATA ENTRY OPERATOR, LIC AGENT, MECHANICAL / AUTOMOBILE /TOOL AND DIE MAKER / PRODUCATION / MECHATRONICS, EEE, ECE, AND INSTRUMENTATION, OFFICE ADMIN and other posts . Click On Below Link and check your disttrict vacancy and register for Maharashtra Mega Job Fair 2021

येत्या १२ ते 17 डिसेंबर या  दिवसांच्या कालावधीत राज्यस्तरीय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून, त्याअनुषंगाने आयुक्तालयामार्फत http//www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेर नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी दिली.

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने जाहीर केलेल्या सोशल डिस्टन्सींगचे नियम व अटीचे पालन करुन ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. लॉकडाऊन नंतर नव्याने व्यवसाय/उद्योग सुरु करताना जिल्ह्यातील आस्थापनामध्ये मोठया प्रमाणात मनुष्यबळाची गरज निर्माण झाली असून स्थानिक बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या महारोजगार मेळाव्यात राज्यातील नामवंत उद्योजक/आस्थापनांमध्ये रिक्त असलेली विविध प्रकारची सर्वसाधारणपणे 10 वी, 12 वी आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर तसेच बी.ई. व इतर व्यवसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्त पदांसह राज्यभरातून 25 हजार पेक्षा जास्त रिक्तपदांसाठी उद्योजक/आस्थापनांमार्फत https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रिक्तपदे ऑनलाईन अधिसूचित करण्यात येत आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी नोकरी इच्छूक युवक-युवतींनी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. होमपेजवरील नोकरी साधक लॉगीन मधून आपआपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉबफेअर या बटनावर क्लिक करुन त्यातील “STATE LEVEL MEGA JOB FAIR 2021” या रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रताधारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन उपलब्‌ध असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हीडीओ कॉन्फरन्स अथवा टेलीफोन द्वारे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.

Maharashtra Job Fair 2021

मुंबई, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, पुणे, नागपूर या विभागातील 25,000+ पदांकरिता मेळाव्याचे आयोजन होणार आहे. सदरचा मेळावा हा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील सर्व  जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना आवाहन करण्यात येते की,  या संधीचा लाभ घेण्यासाठी नोकरीइच्छुक युवक-युवतींनी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. या मेळाव्यामध्ये सेल्स मार्केटिंग, एज्युकेशनल कौन्सेलर, सेल्स ट्रेनी, ट्रेनी सॅलमन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, मोल्डिंग मशीन ऑपरेटर, डेटा एंट्री ऑपरेटर, एलआयसी एजंट, मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / ऑटोमोबाईल / मशीन आणि मशीनिंग मशीन आणि मशीनिंग मशीन व इतर पदांसाठी भरती होणार आहे.

1) होमपेजवरील नोकरीसाधक (Job Seekar) लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे.

2) त्यानंतर डॅशबोर्ड मधील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करुन प्रथम  आपला विभाग व नंतर आपला जिल्हा निवडून  त्यातील STATE LEVEL MEGA JOB FAIR 2021  या रोजगार मेळाव्याची निवड करावी.

3) यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन, उचित असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.

 इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस , दूरध्वनी, ई-मेल किंवा सोईच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.

या राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इतारत, तळ मजला, एस.टी. स्टॅड जवळ, सातारा येथे प्रत्यक्ष भेटीद्वारे अथवा या कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनीवर संपर्क साधावा असे असे आवाहन सहायक आयुक्त श्री. पवार यांनी केले आहे.

 

जाहिरात वाचा

???? अर्ज करा


कोरोनाच्या संकटामुळे राज्यामध्ये १५ हजार ३२० बेरोजगारांना रोजगार !!

Maharashtra Job Fair 2021 –While the Corona crisis has created unemployment, 15,320 unemployed people have been provided employment in the state in July 2021 through various initiatives being implemented by the Department of Skill Development, Employment and Entrepreneurship, said Nawab Malik, Minister of the department.

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात जुलै २०२१ मध्ये १५ हजार ३२० बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.

अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते जुलैअखेर ९३ हजार ७११ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

मंत्री मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९० हजार ७३५ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

मुंबईत जुलैमध्ये ५ हजार ४१२ बेरोजगारांना रोजगार

मंत्री मलिक म्हणाले की, माहे जुलै २०२१ मध्ये विभागाकडे ४८ हजार ९९५ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ११ हजार ६१९, नाशिक विभागात ७ हजार ५५४, पुणे विभागात १५ हजार ६४७, औरंगाबाद विभागात ७ हजार २४७, अमरावती विभागात ३ हजार ०४६ तर नागपूर विभागात ३ हजार ८८२ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

माहे जुलैमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १५ हजार ३२० उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात ५ हजार ४१२, नाशिक विभागात २ हजार ४३७, पुणे विभागात सर्वाधिक ६ हजार ९५३, औरंगाबाद विभागात २७४, अमरावती विभागात ११५ तर नागपूर विभागात १२९ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.


सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे -एकूण २ हजार ४१६ युवकांना प्रशिक्षण मिळणार !!

Maharashtra Job Fair 2021 – The government has various schemes to provide employment. Under these Schemes, the training will be imparted through Prime Minister’s Skill Development Center, Government Industrial Training Institute Hingoli, Wasmat, Aundha Nagnath, Kalamanuri, Sengaon and Training Centers. Read below update on Mharashtra Rojgar Melava 2021 at below:

गत वर्षात १३१६ युवकांना रोजगार

Maharashtra Job Fair 2021 – कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत प्रशिक्षणाबाबत विविध योजना राबविण्यात येत आहेत. गत वर्षात १३१६ युवकांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे.

बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, किमान कौशल्य विकास कार्यक़्रम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा समावेश आहे. या योजनेंतर्गत २०२०-२१ मध्ये एकूण २ हजार ४१६ युवकांना प्रशिक्षण द्यावयाचे आहे. सदरील प्रशिक्षण प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव व ट्रेनिंग सेंटर आदीमार्फत देण्यात येणार आहे.

सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे

सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे, ऑनलाईन वेबिनार, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. २०२० मध्ये १ हजार ३१६ युवकांना या योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. १२ डिसेंबर ते २० डिसेंबर यादरम्यान राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात हिंगोली जिल्ह्यासाठी ५३७ जागांसाठी सात उद्योजक कंपन्यांनी सहभाग नोंदविला.

२२१ लाभार्थ्यांची रक्कम मंजूर

विभागांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना राबविण्यात येते. यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, गट प्रकल्प कर्ज योजना राबविली जाते. महामंडळाकडून आजपर्यंत २२१ लाभार्थ्यांना १३ कोटी ८० लाख १५ हजार २१ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. २२१ पैकी २०७ लाभार्थींना व्याज परतावा मिळाला आहे. व्याज परताव्याची एकत्रित रक्कम ९० लाख ३५ हजार २७१ एवढी आहे.

-प्र.सो. खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालय

1 thought on “Maharashtra Job Fair 2021-State Level Rojagar Registration 2021”

Leave a Comment