Maharashtra Police Patil Bharti 2022

पोलीस पाटील भरती लेखी परीक्षा १३ रोजी आणि दि. १६ रोजी तोंडी परीक्षा

Maharashtra Police Patil Bharti 2022 Exam Dates : Police Patil posts are vacant in 35 villages of Phaltan taluka and Police Patil posts in all these villages will be filled through examination. Jagtap said. The examination of 80 marks will be conducted by OMR method. Shivajirao Jagtap has pointed out. After written examination The results will be announced immediately after taking the oral examination of 20 marks on March 16

Maharashtra Police Patil Bharti 2022 Exam Dates

फलटण तालुक्यात पोलीस पाटील भरती प्रक्रिया व्यवस्थित सुरु असून दि. १३ रोजी लेखी आणि दि. १६ रोजी तोंडी परीक्षा घेण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

फलटण तालुक्यातील ३५ गावात पोलीस पाटील पदे रिक्त असून या सर्व गावातील पोलीस पाटील पदे परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत, त्यासाठी आरक्षणे निश्चित करुन उमेदवारी अर्ज दाखल करणे, दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी सांगितले.

Maharashtra Police Patil Bharti 2022 Exam Dates | police bharti 2022 maharashtra new update

सर्व ३५ गावांसाठी भरती प्रक्रिया कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यानुसार ३५ पैकी ६ गावांसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही, उर्वरित २९ गावांसाठी २१४ अर्ज दाखल झाले आहेत, सर्व दाखल अर्जांची छाननी पूर्ण करण्यात आली असून १९ अर्ज अवैध १९५ अर्ज वैध ठरले असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी सांगितले आहे.
या २९ गावातील पोलीस पाटील भरतीसाठी दि. १० मार्च पासून तलाठी यांचे मार्फत संबंधीत परीक्षार्थींना हॉल तिकीट वाटप सुरु करण्यात आले आहे.

police patil bharti online form

दि. १३ रोजी सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यांच्या निगराणीत मुधोजी हायस्कूल, फलटण येथे लेखी परीक्षा घेण्यात येत आहे, त्यासाठी बहुपर्यायी प्रश्न पत्रिका काढण्यात येत असून ४ पैकी १ बरोबर उत्तरावर खूण करावयाची आहे. OMR पद्धतीने ही ८० मार्कांची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
लेखी परीक्षेनंतर दि. १६ मार्च रोजी २० मार्कांची तोंडी परीक्षा घेऊन लगेचच निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी सांगितले आहे.


Maharashtra Police Patil Bharti 2022 – In 29 Village of Marashtra Many Posts are vacant of Police Patil. Check Below Update

police patil bharti satara 2022


राज्यात लवकरच पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु होणार -गृहमंत्री

Maharashtra Police Patil Bharti 2022 – Police Patil is working at the village level as a representative of the government. The role of police patrols is important in maintaining law and order in the village. Therefore, Home Minister Dilip Walse Patil directed to immediately start the process of filling up the vacancies of Police Patals in the state and also to pay the honorarium of Police Patals on time. A meeting was held at Sahyadri Guest House under the chairmanship of Home Minister Valse Patil and in the presence of Home Minister Shambhuraj Desai regarding various demands of Police Patil in the state.

राज्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याबरोबरच पोलीस पाटलांचे मानधन वेळेत अदा करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.  पोलीस पाटील यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबत गृह व महसूल विभागाने त्वरीत कार्यवाही करावी. तसेच पोलीस पाटलांचे नूतनीकरण करण्यासंदर्भात सर्व बाबींचा अभ्यास करून धोरणत्मक निर्णय घेण्यात यावा. तसेच महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील आदेशात योग्य त्या सुधारणा करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटील यांना प्रति वर्षी पुरस्कार देण्यात येतात. मागील काही वर्षात सदर पुरस्कार देण्याचे बंद झालेले आहे. हे पुरस्कार देण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश वळसे पाटील यांनी यावेळी दिले.
काही कारणास्तव शेजारच्या गावांचा पोलिस पाटील यांना अतिरिक्त कार्यभार दिला जातो. या अतिरिक्त कार्यभारासाठी अतिरिक्त भत्ता देण्याच्या मागणीस यावेळी मान्यता देण्यात आली. तसेच अतिरिक्त कामकाजासाठी अतिरिक्त भत्ता देण्याचे निर्देश त्यांनी गृह विभागास दिले. पोलीस पाटलांना प्रत्येक जिल्हयामध्ये पोलीस पाटील भवन उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारतीमध्ये पोलीस पाटील यांच्यासाठी एक कक्ष निश्चित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतलेला आहे. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत ग्रामविकास विभागास कळविण्यात यावे तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये भवन उपलब्ध करुन देण्याबाबत पालकमंत्री स्तरावर निर्णय घेण्याबाबत कळविण्यात यावेत असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील बऱ्याच ग्रामीण व नागरी भागामध्ये स्वयंपूर्ण पोलीस ठाणे व चौकी असलेल्या गावांमध्ये पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, याबाबत योग्य ते धोरण निश्चित करण्याच्या सूचना गृह व महसूल विभागास यावेळी देण्यात आल्या.
पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करणे, शासनातर्फे विमा योजना सुरू करणे, निवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करणे, निवृत्तीनंतर ठोस रक्कम अथवा पेन्शन मिळणे, अनुकंपा तत्व लागू करणे, कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये नुकसानभरपाई देणे व सरकारी सेवेत सामावून घेणे, या प्रमुख मागण्यांवर यावेही सकारात्मक चर्चा झाली.

पुणे पोलिस पाटील भरती ७१२ पदांसाठी लवकरच होणार 

Maharashtra Police Patil Bharti 2022 -712 posts of police patils have been sanctioned under eight revenue divisions in 15 talukas of the district. As the government has not yet found the time to fill 880 posts, the question of law and order in the vacant village has come to the fore. There are 15 talukas in the district and 1,970 posts of police patrols have been sanctioned in the district. Out of which 1,100 posts have been filled and 880 villages are still awaiting police patrols. Some of the 969 working police patrols have retired. As a result, hundreds of police patrols have to take extra charge of three villages each. Know More details about Maharashtra Police Patil Bharti 2022, Maharashtra Police Patil Recruitment 2022, Maharashtra Police Patil Vacancy 2022 are as given below

Pune Police Patil Bharti 2022

गेल्या तीन- चार वर्षानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा लवकरच पोलीस पाटील भरती करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात सध्या 712 जागा रिक्त असून, ही पदे भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मागितले आहे.

गेले चार वर्षांपासून पोलीस पाटीलच्या रिक्त जागा भरण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही. कोरोना संकटामुळे यासाठी अधिक विलंब झाला. परंतु आता ही प्रक्रिया सुरू झाली असून, आरक्षण सोडत काढण्याचे काम सुरू होणार आहे. पुणे जिल्ह्यात 1911 महसुली गावे असून, आतापर्यंत 1130 पदे भरण्यात आली आहेत. आता लवकरच 712 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

महसूल आणि पोलीस यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील गाव पातळीवर काम करीत असतात. जिल्हा आणि पोलीस विभागाला वेळोवेळी गावातील घटना, घडामोडींची माहिती देण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. यामुळे गाव पातळीवर पोलीस पाटील पदाला महत्व आहे. पाच वर्षांसाठी असलेले पोलीस पाटील पदासाठी महसूल विभागाकडून भरती केली जाते आणि पोलीस विभागाकडून संबंधित पोलीस पाटील यांना दर महा 5 हजार रुपयांचे मानधन दिले जाते.

जिल्ह्यातील 15 तालुक्यांतील आठ महसुली विभागांतर्गत पोलीस पाटलांची एक हजार 970 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 880 पदे भरण्यास शासनाला अजूनही मुहूर्तच न सापडल्याने रिक्त असलेल्या गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात 15 तालुके असून जिल्ह्यात पोलिस पाटलांची एक हजार 970 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 1 हजार 100 पदे भरण्यात आली असून 880 गावांना अजूनही पोलिस पाटलांची प्रतिक्षा आहे. 969 कार्यरत पोलिस पाटलांमधून काही निवृ्त्त झालेले आहेत. त्यामुळे शेकडो पोलिस पाटलांना तीन-तीन गावचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे.

पोलीस पाटलांच्या प्रमुख मागण्या

  • निवृत्तीचे वय 60 वरून 65 करावे.
  • निवृत्तीनंतर 10 लाख रुपये रोख द्यावेत.
  • स्वसंरक्षणासाठी बंदूक परवाना द्यावा.
  • मानधन सहा हजार 500 वरून 15 हजार रुपये करावे.
  • 10 वर्षांनी होणारे नूतनीकरण पद्धत बंद करावी.
  • ग्राम पोलीस अधिनियम कायदा 1967 मध्ये दुरुस्ती करावी.
  • वयोमर्यादेत वाढ करावी.

प्रत्येक गावासाठी प्रतिष्ठेची व मान सन्मानसोबतच गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजविणार्‍या पोलीस पाटील पदासाठी प्रत्येक गावात स्पर्धा निर्माण झालेली असताना ही रिक्त पदे भरण्यासाठी शासन कानाडोळा करत आहेत. त्यामुळे महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम अभियानाला त्यामुळे साहजिकच हरताळ फासला जात आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात 880 पदे रिक्त असून, या गावांच्या कायदा व सुव्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे. वास्तविक बघता, पोलीस पाटील हा पोलीस प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा आहे. ते गावातील कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासोबतच अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनास मदत करत असतात. यासाठी रिक्त पदाचे ग्रहण लागलेल्या गावात भरती प्रक्रिया पूर्ण करून कायमस्वरुपी पोलीस पाटील देणे आवश्यक आहे. रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात पनवेल उपविभाग येत नसल्याने पनवेल आणि उरण तालुका वगळता 969 रिक्त पदे उर्वरित जिल्ह्यात आहेत. तर, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात पनवेल आणि उरण तालुक्यात 90 रिक्त पदे आहेत. पोलीस पाटलांच्या रिक्त पदांमुळे अनेक गावांत कायदा व सुव्यवस्था टिकविण्याची मोठी कसरत करावी लागत आहे. कार्यरत असलेल्या पोलीस पाटलांचे मानधन व वयोमर्यादा वाढ यासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. यासाठी रिक्त पदे भरण्यासोबतच प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत.


राज्यात पोलिस पाटलांची १२ हजार ४२२ पदे रिक्त; सर्वाधिक पदे ही मराठवाड्यात रिक्त

Maharashtra Police Patil Bharti 2022– A total of 38 thousand 712 posts of police patils  have been sanctioned in the state. Out of this 26 thousand 290 posts were filled; 12 thousand 422 posts are vacant. Since these vacancies have not been filled for four years, at present only one police patil is in charge of three to four villages. The highest number of police posts are vacant in Marathwada. Read Below Information on Maharashtra Police Patil Bharti 2022

Maharashtra Police Patil Bharti 2022

राज्यात एकूण ३८ हजार ७१२ पोलिस पाटलांची पदे मंजूर आहेत. यापैकी २६ हजार २९० पदे भरली; तर १२ हजार ४२२ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे चार वर्षांपासून भरण्यात आली नसल्याने सध्या एकाच पोलिस पाटलांकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. यामुळे त्यांची चांगली तारांबळ उडत आहे. पोलिस पाटलांची सर्वाधिक पदे ही मराठवाड्यात रिक्त आहेत.

महसूल आणि पोलिस यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलिस पाटील गाव पातळीवर काम करीत असतात. जिल्हा आणि पोलिस विभागाला वेळोवेळी गावातील घटना, घडामोडींची माहिती देण्याचे काम पोलिस पाटील करीत असतात.

मात्र, रिक्त जागा भरण्याचा शासन आणि गृह विभागाला चार वर्षांपासून मुहूर्त सापडत नाही.

राज्यात एकूण ३८ हजार ७१२ पोलिस पाटलांची पदे मंजूर आहेत. यापैकी २६ हजार २९० पदे भरली; तर १२ हजार ४२२ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे चार वर्षांपासून भरण्यात आली नसल्याने सध्या एकाच पोलिस पाटलांकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. यामुळे त्यांची चांगली तारांबळ उडत आहे. पोलिस पाटलांची सर्वाधिक पदे ही मराठवाड्यात रिक्त आहेत.

कोरोना संक्रमणामुळे पोलिस पाटलांची रिक्त पदे भरण्याची शक्यता कमीच आहे. मध्यंतरी राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्याने नव्याने बिंदूनामावली तयार करण्यात आली होती. मात्र, पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने आता नव्याने बिंदूनामावली तयार करावी लागणार आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्यामुळेही पोलिस पाटील भरतीला विलंब होत आहे. ग्रामीण भागात गावातील तंटे गावातच सोडवून शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची पोलिस पाटलांची मोलाची भूमिका असते. मात्र, तुटपुंज्या मानधनावर सरकार पोलिस पाटलांची बोळवण करीत आहे.

विभागनिहाय पोलिस पाटलांची रिक्त पदे –

विभाग

रिक्त पदे

ठाणे आणि कोकण विभाग ११४०
पश्चिम महाराष्ट्र १८९०
उत्तर महाराष्ट्र १८४२
मराठवाडा ४०५०

Leave a Comment