पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ जाहीर!- Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022

राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.

🌐 अर्ज करा


राज्य सरकार पोलिस भरती करणार असून त्यासाठी भरती नियमात बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार आधी शारीरिक परीक्षा होणार असून यात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. २४ जून रोजी याबाबतची अधिसूचना काढण्यात आली.

राज्य सरकारने पोलिस विभागात मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना नेते एकनाथ खडसे यांच्या बंडामुळे राज्य सरकार अस्थिर झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बदली व पदोन्नतीच्या प्रक्रियेवर परिणाम झाला. त्याच प्रमाणे भरती प्रक्रिया रखडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. राज्य सरकारने पोलिस शिपाईच्या भरती प्रक्रियेच्या नियमात काही बदल केले आहेत.

पूर्वी १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येत होती. त्यानंतर शारीरिक चाचणी होत होती. परंतु, आता शासनाने यात थोडा बदल केला आहे. नव्या नियमानुसार आधी ५० गुणांची शारीरिक चाचणी होईल. या शारीरिक चाचणीत पात्र ठरणाऱ्यांना लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. लेखी परीक्षा ही १०० गुणांची असेल. यासाठी ९० मिनिटांचा वेळ मिळेल. लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळणारे उमेदवारच पात्र ठरणार आहेत.

शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना संबंधित प्रवर्गामधील जाहिरातीत दिलेल्या रिक्त पदाच्या १ः१० प्रमाणात लेखी चाचणीसाठी बोलावण्यात येईल. उदा. अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये १० रिक्त पदे व अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये ५ रिक्त पदे असतील तर अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये गुणवत्तेनुसार १०० (१०*१०= १००) उमेदवार सुचीबद्ध करण्यात येतील. अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये गुणवत्तेनुसार ५० (१०*५=५०) उमेदवार सूचीबद्ध करण्यात येतील. अनुसूचित जातीच्या १०० व्या क्रमांकावर व अनुसूचित जमातीच्या ५० व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेले गुण जेवढ्या उमेदवारास असतील तेवढे सर्व जण लेखी चाचणीस पात्र असतील.

लेखी परीक्षेतील विषय

  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • अंकगणित
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

शारिरिक चाचणी

पुरुष उमेदवार

  • १६०० मीटर धावणे २० गुण
  • १०० मीटर धावणे १५ गुण
  • गोळाफेक १५ गुणे

महिला उमेदवार

  • ८०० मीटर धावणे २० गुण
  • १०० मीटर धावणे १५ गुण
  • गोळाफेक १५ गुणे

महाराष्ट्र गृह विभागातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये सात हजार २३१ पदांची पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. राज्यात ४ वर्षानंतर पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. १५ जूनपासून विविध पदांच्या ७००० जागा भरण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली होती परंतु अजून घोषणा झाली नाही मात्र, पोलीस भरती प्रक्रियेबाबतचे अगोदर लेखी पेपर होणार की मैदानी चाचणी होणार या प्रक्रियेबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पाच वर्षानंतर प्रथमच मोठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे पालकांसह उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राज्याच्या गृह विभागात मागील दोन वर्षांत नवीन पदांची भरती झालेली नाही. २०१९ मध्ये जाहीर झालेली पाच हजार पदांची भरती प्रक्रिया तब्बल दीड वर्षे चालली. आता २०२० मध्ये घोषित झालेल्या पदभरतीला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. गृह विभागाने काही महिन्यांपूर्वी पोलिस नाईक पद रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोलिस भरती प्रक्रियेतील बिंदुनामावली पुन्हा बदलावी लागली. दुसरीकडे पोलिस नाईक म्हणून कार्यरत असलेल्यांना पोलिस हवालदारपदी नियुक्ती करताना तेवढ्या जागा रिक्त नाहीत. त्यामुळे अजून अनेकजणांना त्याच पदावर काम करावे लागत आहे. या सर्व बाबींमुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती.

पण, आता त्या बाबींची पूर्तता झाल्याने पुढील महिन्यात भरती प्रक्रियेला सुरवात होईल, असा विश्‍वासही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. तत्पूर्वी, पदभरतीवेळी लेखीऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. गोळाफेक, पुलअप्स, लांबउडी आणि १०० मीटर धावणे अशा चाचण्या उमेदवारांना पार कराव्या लागणार आहेत. तिसऱ्यांदा बदलला निर्णय ग्रामीण भागातील तरुणांना पोलिस भरतीत संधी मिळावी म्हणून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पहिल्यांदा लेखीऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. 

पोलीस भरती नवीन टेस्ट सिरीज

पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस

पुन्हा त्यात बदल करून पहिल्यांदा लेखी चाचणी घेण्याचा निर्णय झाला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारने भरती पध्दतीत बदल करून सर्वप्रथम मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून ग्रामीण तरूणांना पोलिस भरतीत सर्वाधिक संधी मिळेल हा हेतू होता. पण, त्याची अंमलबजावणी आता आगामी भरतीवेळी केली जाणार आहे.


पोलिसात शहरी तरुण आणि अधिकाऱ्यांचाच भरणा झाल्यास सामाजिक समतोल ढासळण्याची भीती आहे. ग्रामीण मुले शारीरिकदृष्ट्या सक्षम असूनही खाकी वर्दी पासून वंचित राहत आहेत. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या काळात मैदानी चाचणी १०० गुणांची होती. लेखी ७५ गुणांची व मुलाखत २५ गुणांसाठी होती. मुलाखतीत संशयास्पद प्रकाराच्या शक्यतेने २०१० मध्ये ती पद्धत बंद करण्यात आली. लेखी व मैदानी चाचण्या प्रत्येकी १०० गुणांच्या केल्या.

नंतर फडणवीस सरकारने मैदानी ५० व लेखी चाचणी १०० गुणांची केली. त्यामुळे ग्रामीण तरुणांची मोठी पीछेहाट झाली. महाविकास आघाडी सरकारने पॅटर्न पुन्हा १००-१०० गुणांचा केला. २०२१ मधील परीक्षांमध्ये हाच पॅटर्न राहिला. आता तोदेखील बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत.

परीक्षांचा बदलता पॅटर्न ग्रामीण तरुणांना त्रासदायी ठरत आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम असतानाही लेखी परीक्षेत दांडी उडते. ग्रामीण भागात तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत नाही. शिकवणीही लावता येत नाही. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीवरच भर असतो, पण लेखी परीक्षेचा टप्पा पार करण्यात अयशस्वी ठरतात. त्यामुळे लेखी परीक्षा ५० गुणांची करण्याची मागणी आहे.

Maharashtra Police Bharti 2022:About 7,000 police personnel will soon be recruited in the state police force. The process will start next month Home Department officials sources said. The state cabinet had earlier approved the recruitment. However, due to the coronation period in the state, this recruitment process could not be undertaken. A transparent method will be adopted for this recruitment. This process will be carried out simultaneously and will be completed in a period of one to one and half months. Recruitment rules and norms will be tightened to prevent irregularities in police recruitment. This will be the second phase of police recruitment.

Maharashtra Mega Police Bharti 2022

Earlier, 5,000 policemen were recruited in the first phase. In the third phase, Mahavikas Aghadi will try to fill the backlog of police posts by filling another 10,000 posts next year. On the occasion of this government, the youth will get a great opportunity to join the police force.

राज्याच्या पोलीस दलात लवकरच सुमारे सात हजार पोलीस शिपायांची भरती करण्यात येणार आहे. पुढील महिन्यापासून त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे गृहविभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाने या भरतीला यापूर्वीच मंजुरी दिली होती. तथापि, राज्यात कोरोनाकाळामुळे ही भरती प्रक्रिया हाती घेता आलेली नव्हती. या भरतीसाठी पारदर्शक पद्धत अवलंबिली जाईल. ही प्रक्रिया एकाचवेळी हाती घेतली जाईल आणि एक ते दीड महिन्यांच्या कालावधीत ती पूर्ण करण्यात येणार आहे.

पोलीस भरतीतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरतीचे नियम आणि निकष अधिक कडक करण्यात येणार आहेत. पोलीस भरतीचा हा दुसरा टप्पा असेल. या आधी पहिल्या टप्प्यात पाच हजार पोलिसांची भरती करण्यात आली होती. तिसऱ्या टप्प्यात पुढील वर्षी आणखी दहा हजार पदे भरून पोलीस पदांचा अनुशेष दूर करण्याचा महाविकास आघाडी प्रयत्न असेल. या सरकारचा निमित्ताने पोलीस दलात सहभागी होण्याची, मोठी संधी तरुणाईला मिळणार आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती २०२२

कोरोना संकट तसेच पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांची बिंदूनामावली अद्ययावत नसल्याने पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया घेण्यात आली नाही. गडचिरोलीत पोलीस शिपायांच्या १३६ जागा भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेत सर्वाधिक ७८ जागा इतर मागासवर्गासाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ३७. इतर प्रवर्गाला ३ ते ७ जागा आहेत. पदभरती जाहिरात निघाली आहे. सर्व १३६ जागा गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांमधूनच भरण्यात येणार आहेत.


महाराष्ट्र पोलीस दलात १२६०० पदांची भरती; जाणून घ्या कधी होणार भरती प्रक्रिया सुरु

Maharashtra Police Bharti 2022: The cabinet has only approved recruitment in the health and police departments. Permission to recruit 12,600 police personnel in the state will help reduce the stress on the police in the future, said Guardian Minister Shambhuraj Desai on May 1. Excellent police organized in the office of the Superintendent of Police He was speaking from the presidency at reception for officers and staff.

Maharashtra Mega Police Bharti 2022

मंत्रिमंडळाने केवळ आरोग्य आणि पोलीस विभागातील पदभरतीला मान्यता दिली आहे. राज्यात १२ हजार ६०० पोलिसांच्या भरती प्रक्रियेला परवानगी मिळाल्याने भविष्यात पोलिसांवरचा ताण कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी १ मे रोजी केले. पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित उत्कृष्ट पोलीसअधिकारी कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

कोरोना काळात अनेक पोलिसांनी जीव गमावला आहे. अनेकजण सेवानिवृत्त झाले. अनेकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तसेच अपघात किंवा आजारपणामुळे काहींचा मृत्यू झाला. अनेकांना पदोन्नती मिळाली तर काहीजण विविध कारणांवरून निलंबित तथा बडतर्फ झाले. त्यामुळे राज्याच्या पोलिस दलात सध्या १८ हजारांहून अधिक पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत.

महाराष्ट्र पोलीस भरती २०२२

कोरोना संकटाचा मुकाबला करताना लोकांचे जीव वाचायला हवेत या हेतूने पोलिसांनी रात्रंदिवस रस्त्यांवर खडा पहारा दिला. त्यावेळी अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. निर्बंध शिथिल झाल्यानंतर दोन वर्षांत साजरे न झालेल्या सण-उत्सवाला, जयंती-मिरवणुकीवेळी पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागली. दैनंदिन काम करतानाच पोलिसांनी सव्वादोन वर्षांत बहुतेकवेळा ना सुटी, ना रजा घेता केवळ ड्युटी करून त्यांची पॉवर दाखवून दिली. अनेकांना त्या काळात सुटी, रजा मिळत नाही.

देश मागील सव्वादोन वर्षांत कोरोना संकटाचा मुकाबला करत असतानाच जिल्ह्यात लागू केलेल्या लॉकडाउनची कडक अंमलबजावणी, संचारबंदीत बंदोबस्ताची भूमिका, गर्दी होणार नाही आणि गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची पुरेपूर दक्षता पोलिस बांधवांनी घेतली.अतिवृष्टी, महापूर, कोरोनासह इतर संकटात लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या पोलिसांनी कुटुंबाची व स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोखपणे बजावले, त्यांच्या कार्याला सलाम.कोरोनासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री व राज्यपालांचे दौरे, आरक्षणाच्या मुद्द्यांवरून होणारी आंदोलने, विविध मुद्द्यांवर निघालेले मोर्चे, उपोषणावेळीही पोलिसांनी बंदोबस्ताची ड्युटीसांभाळली.पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.वर्षातून चारवेळा मोठ्या वाऱ्या असतात.त्यावेळीही पोलिस बंदोबस्त देतात.भीमा-कोरेगावलाही दरवर्षी पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागते.शिवजयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव (दसरा)अशावेळीही मोठा बंदोबस्त लागतो.एसटी महामंडळाचे आंदोलन आणि आता भोंग्यांवरून वातावरण पेटले असून त्यासाठीही पोलिसांनी बंदोबस्ताची ड्युटी चोख बजावली.शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत आणि दैनंदिन कामकाज सांभाळत मागील सव्वादोन वर्षांत पोलिसांना त्यांच्या मनाप्रमाणे सुटी, रजा मिळालेली नाही.तरीही, ते कोणत्याही तणावाशिवाय बंदोबस्ताची ड्युटी सांभाळत आहेत.

कोरोना संकटात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. आता हे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने पोलिस अधिकारी व कर्मचारी कोणताही ताण न घेता त्यांची काळजी घेण्यासाठी कर्तव्यावर आहेत. त्याचवेळी ते त्यांची दैनंदिन कामे चोखपणे करतात, असे हिम्मत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर यांनी सांगितले.


Maharashtra Police Bharti 2022 – Good News For Maharashtra Police Recruitment aspiring candidates ! As  Deputy Chief Minister Shri. Pawar said that 7,231 posts would be filled in the police force and the promotion would be done in such a way that a retired officer would become a sub-inspector when he retires after 30 years. Of these, construction of 87 police stations has already started. So Prepare for Maharashtra Police Bharti 2022 with Free Police Bharti Test series 2022 to get selected as per latest pattern.

मोफत सराव करा- नवीन सिल्याबस नुसार पेपर्स सोडवा

गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही; वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पात पोलीसांच्या घरांसाठी 737 कोटी रुपयांची तर यावर्षीच्या अर्थसंकल्पात 802 कोटींच्या तरतूदीसह पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी एकूण 1 हजार 29 कोटींची तरतूद करण्यात आली असून पोलीस दलासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते आज महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या 119 व्या सत्राच्या दीक्षांत समारंभात बोलत होते.

यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार असून शिपाई पदावर भरती झालेला कर्मचारी 30 वर्षानंतर निवृत्त होतांना खात्रीने सब इन्स्पेक्टर होईल अशा पद्धतीने कालबद्ध पदोन्नतीची रचना करण्यात आली असून राज्यातील जुन्या पोलीस स्टेशनच्या इमारतींचे दुरूस्ती व नुतनीकरणाचा निर्णय घेण्यात अला आहे. त्यातील 87 पोलीस स्टेशनच्या बांधकामांना सुरूवातही झाली आहे. महिला पोलीसांच्या दैनंदिन कर्तव्याची वेळ आठ तासांची करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या काळात राज्यात पोलीसांसाठी 1 लाख घरे निर्माण केली जाणार आहेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

If you have NCC certificate, you will get more marks in the exam !!

NCC will now benefit in police recruitment
C Certificate – 5% of total marks EXTRA marks
B Certificate – 3% bonus points of total marks
A Certificate – 2% bonus points of total marks

पोलीस दलासाठीचे महत्वाचे निर्णय :

◼️पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार
◼️शिपाई पदावरील कर्मचारी 30 वर्षानंतर निवृत्त होताना खात्रीने सब इन्स्पेक्टर होईल.
◼️पोलीस स्टेशनच्या जुन्या इमारतींच्या दुरुस्तीचा किंवा नवीन बांधकामाचा निर्णय
◼️राज्यात 87 पोलीस स्टेशनच्या बांधकामांना सुरुवात
◼️महिला पोलिसांना आठ तासांची ड्यूटीचा निर्णय लागू
◼️राज्य पोलिसांसाठी 1 लाख घरं बांधण्याचा निर्णय
◼️वर्ष 2021-22 अर्थसंकल्पात घरांसाठी 737 कोटी आणि यावर्षीच्या अर्थसंकल्पात 802 कोटी अधिक इतर खर्चांकरता मिळून 1 हजार 29 कोटींची तरतूद
◼️महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षण इमारतीसाठी 7 ते 10 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार


आता पोलीस भरती प्रक्रिया TCS, IBPS, MKCL यांचेमार्फत न राबविता ती थेट पोलीस घटक स्तरावरुन

Maharashtra Police Bharti 2022 – There is requiremnet of Police in Gadchiroli District. For this a newn GR has been issued. According to this, Police Bharti recruitment process will not be carried out through TCS, IBPS, MKCL because there is urgent need of Police Shipai in Gadchiroli, in a view of this, recruitment will be through Police Unit. Under this 416 vacant posts will get filled. Check Below Update about Upcomg maharashtra Police Bharti 2022.

राज्यात एप्रिल नंतर तीन टप्प्यांत मेघा भरती -५० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार

पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील दि.३१.१२.२०२० अखेरपर्यंत रिक्त असलेली ३११ पदे (१५० पोलीस शिपाई व १६१ पोलीस शिपाई चालक) आणि समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३ देसाईगंज, गडचिरोली येथील रिक्त असलेली १०५ पदे अशी एकुण ४१६ पदे भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) यांच्या संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयातून वगळण्यात येत असून सदर पदे भरण्यासाठीची भरती प्रक्रिया TCS, IBPS, MKCL यांचेमार्फत न राबविता ती थेट पोलीस घटक स्तरावरुन राबविण्यास विशेष बाब म्हणून शासन मान्यता देण्यात येत आहे.

मा. मंत्रिमंडळाच्या दि.१५.१२.२०२१ रोजीच्या बैठकीमध्ये मा. मंत्रिमंडळाने पदभरतीसाठी घेण्यात येणा-या परिक्षेसाठी असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित केले असून यापुढे होणा-या परिक्षा TCS, IBPS आणि MKCL यांच्यामार्फत घेण्याचे निर्देश दिले असून त्यानुसारच्या सूचना सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) यांनी संदर्भ क्र.३ येथील दि.१८.०१.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिल्या आहेत. तथापि, गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याने गडचिरोली जिल्हातील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक इ. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया थेट पोलीस घटक स्तरावरुन राबविण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Read Police Bharti GR Full PDF


Maharashtra Police Bharti 2022 – State’s Upper Director General of Police (Establishment) Sanjeev Kumar Singhal announced the status of Faujdar vacancies on March 7. Accordingly, there are 2360 vacancies in 7 Revenue Departments. In Konkan-2 1622, Nagpur-256, Nashik and Pune 147 each, Amravati 102, Konkan 1-80 and in Aurangabad division 49 seats are vacant. The posts of faujdars will be filled by promotion. Police officers will be promoted to the rank of Sub-Inspector of Police. Accordingly, revenue preference has been sought from the officials in the promotion list.

आताच प्राप्त माहिती नुसार महाराष्ट्रात लवकरच ७००० पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती खालील व्हिडीओ मध्ये दिलेली आहे. 

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दल माहिती दिली. वळसे म्हणाले, “सोशल मीडियातून सातत्यानं विचारलं जात आहे की, पोलीस भरती कधी करणार? या निमित्तानं मी सांगू इच्छितो की, २०१९ रोजी रिक्त असलेल्या पोलीस शिपाईपदाच्या ५,२९७ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, याच्या नेमणुका देणं बाकी आहे. पण येत्या काही काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यानंतर दुसऱ्या टप्प्यात ७,२३१ पोलिसांची भरती करण्यात येईल. याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ही भरती करत असताना यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. यानंतर पुढील दोन वर्षात जी भरती होईल, त्याचा प्रस्तावही आम्ही मंत्रिमंडळात मांडणार आहोत. त्यालाही मंजुरी मिळाली तर अनेक तरुणांना रोजगाराची संधी मिळेल”

राज्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या तब्बल २ हजार ३६० जागा रिक्त असून, त्यात सर्वाधिक मुंबईचा समावेश असलेल्या कोकण विभाग-२ मध्ये आहेत. दरम्यान, यातील रिक्त जागा भरण्यासाठी सहायक उपनिरीक्षक तथा पोलीस हवालदारांना बढती दिली जाणार आहे.

राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी ७ मार्चरोजी फौजदारांच्या रिक्त जागांची स्थिती जाहीर केली. त्यानुसार, एकूण ७ महसूल विभागात २३६० जागा रिक्त आहेत. कोकण-२ मध्ये १६२२, नागपूर-२५६, नाशिक व पुणे प्रत्येकी १४७, अमरावती १०२, कोकण १-८०, तर औरंगाबाद विभागात ४९ जागा रिक्त आहेत. फौजदारांच्या यातील जागा पदोन्नतीने भरल्या जाणार आहेत. पोलीस अंमलदारांना बढती देऊन पोलीस उपनिरीक्षक बनविले जाणार आहे. त्याअनुषंगाने पदोन्नतीच्या यादीतील अंमलदारांचा महसुलीत पसंतीक्रम मागण्यात आला आहे.

अनेक वर्षांपासून बढतीची प्रतीक्षा

Officers in the state police force have been waiting for a promotion for several years. Finally, the government has approved it on July 14, 2021. Therefore, the dream of the bureaucrats to become criminals will come true. A number of officials have retired in anticipation of this promotion. If the promotion list does not come out soon, the possibility of some more officials retiring and their dream of becoming a faujdar cannot be ruled out.


“हे” प्रमाणपत्र असेल तर पोलीस भरती परीक्षेत मिळेल “Bonus मार्क्स”

Maharashtra Police Bharti 2022 – Good News For Maharashtra Police Mega Bharti 2022 Aspirants !! As Maharashtra Govt Has issued Gazette Regarding Police Bharti under Home Ministry of Maharashtra. As Per this, candidates having NCC Certificate will get Bonus Marks in Upcoming Bharti as per NCC Certificate Level.. Read More about this at below

पोलीस भरती सेवा प्रवेश नियमामध्ये बदल

NCC प्रमाणपत्र असेल तर परीक्षेमध्ये अधिकचे मार्क्स मिळणार !!

NCC चा फायदा आता पोलीस भरती मध्ये होणार
क सर्टिफिकेट – एकूण गुणांचा 5% EXTRA गुण
ब सर्टिफिकेट – एकूण गुणांचा 3% बोनस गुण
अ सर्टिफिकेट – एकूण गुणांचा 2% बोनस गुण


2 thoughts on “पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ जाहीर!- Maharashtra Police Bharti 2022”

Leave a Comment