Maharashtra SSC HSC Exam 2022

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

Maharashtra SSC HSC Exam 2022 – It has been decided to give concession marks to 10th and 12th class students on the basis of their participation in sports competitions, informed the Minister of School Education Prof. Varsha Gaikwad. The Department of School Education has taken various measures to ensure that the regular education of school children is not disrupted due to abnormal conditions caused by Covid-19. Examinations for 10th and 12th standard students are being conducted in the prevailing manner against the backdrop of declining incidence of corona.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्यात येत आहेत.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन त्यांना सन 2021-22 या वर्षाकरिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत.
तसेच इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सन 2021-22 करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत, असे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना देण्यात आल्याचे मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. ही सवलत केवळ सन 2021-22 च्या परीक्षेकरिताच देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मंडळाने दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले !!

Maharashtra SSC HSC Exam 2021 – The State Board has announced the schedule of supplementary examinations for Class X and XII (ssc hsc re-exam schedule). Both these exams will be in written form. The detailed schedule has been published on the State Board’s website https://mahahsscboard.in/

SSC HSC Re Exam Schedule 2021

राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक (ssc hsc re-exam schedule) जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार दहावीची परीक्षा २२ सप्टेंबपासून, तर बारावीची परीक्षा १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दोन्ही परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहेत. सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे

Maharashtra SSC HSC Exam 2021

राज्य मंडळाने शुक्रवारी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करून, अंतर्गत मूल्यांकनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालातही अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची आता नियमित लेखी परीक्षा होणार आहे. या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. त्याचप्रमाणे बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. व्यवसाय अभ्यासक्रम घेऊन बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. तत्पूर्वी, दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होईल. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा १५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

पुरवणी परीक्षेला कमी विद्यार्थी प्रविष्ठ होतात. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित नियम पाळून या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेणे शक्य आहे. त्यानुसार पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाप्रमाणे परीक्षेची तयारी करावी.


Maharashtra HSC Exam 2021 – महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

सुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. इयत्ता 12 वीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याने परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असे महाराष्ट्र शासनाने केंद्राला यापूर्वीच सुचवले होते, असेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले आहे.

कला, क्रीडा गुणांसाठी मुदतवाढ

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा या विषयासाठी देण्यात येणाऱ्या गुणांचे प्रस्ताव सादर करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या या मुदतवाढीमुळे राज्यातील क्रीडा विषय असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाची दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आठवी आणि नववीतील क्रीडा स्पर्धेतील सहभाग तर बारावीच्या विद्यार्थ्यांचा अकरावीमधील क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन क्रीडा कोट्यातील सवलतीचे गुण देण्यात येणार आहेत. हे प्रस्ताव सादर करण्यासाठी मंडळाने १२ ते २१ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे तर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना संबंधित विभागीय शिक्षण मंडळाकडे विद्यार्थ्यांची प्रस्ताव यादी पाठविण्यासाठी १५ ते २५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या दिलेल्या मुदतीत कोणतीही वाढ केली जाणार नाही, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.


दहावी – बारावीच्या परीक्षांचे  सुधारित अंतिम वेळापत्रक जाहीर !! येथे करा डाउनलोड

Maharashtra SSC HSC Exam 2021 : The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has announced the probable timetable for Class X-XII examinations to be held in March and April. Accordingly, Class XII examination will be held from April 23 to May 21 and Class X examination will be held from April 29 to May 20. A detailed schedule has been made available on the official website of the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education.

Latest Update on 23rd March 2021 – 

राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र राज्य मंडळाकडून १६ फेब्रुवारीला जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकावर मागवण्यात आलेल्या सूचनांनतर शुक्रवारी दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मेदरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे एप्रिल-मे २०२१मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक १६ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले होते. त्यावर आलेल्या सूचनांचे अवलोकन करून राज्य मंडळाने शुक्रवारी दहावी व बारावीचे संभाव्य वेळापत्रकच अंतिम केल्याचे जाहीर केले. अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

About timetable for HSC/SSC April-May 2021.

SSC April-may-2021 final time table.

HSC April-may-2021 vocational final time table(NEW)

HSC April-may-2021 general final time table(NEW)


MSBSHSE Exam Time Table 2021 –  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च व एप्रिल महिन्यात होणाऱ्या दहावी – बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान तर दहावीची २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होईल. याचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी व्हावा, यादृष्टीने एप्रिल, मे २०२१ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची ही सुविधा फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

सोशल मीडियावरील वेळापत्रक ग्राह्य नाही

शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडून मिळणाऱ्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व परीक्षा द्यावी, असे मंडळाने नमूद केले आहे. अन्य यंत्रणेने छपाई केलेले व व्हाॅट्सॲप किंवा सोशल मीडियाद्वारे व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव
डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. सदर वेळापत्रकाबाबत काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या २२ फेब्रुवारीपर्यंत मंडळाला कळवाव्यात, असेही सांगण्यात आले आहे.


Maharashtra SSC HSC Exam 2021 – The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education is expected to announce the exam schedule for secondary school certificate (SSC or Class 10) and higher secondary certificate (HSC or Class 12) this week. check New Update For Time Table Of SSC HSC Exam 2021 :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एमएसबीएसएचएसई) लवकरच एसएससी (दहावी) आणि बारावी (बारावी) परीक्षेची तारीख प्रसिद्ध करणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या आठवड्यात परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे सांगितले .

मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले की, बारावीच्या परीक्षा एप्रिलपासून तर मे महिन्यात दहावीची परीक्षा होणार आहे. ते म्हणाले की बोर्ड परीक्षा घेण्याची तयारी करत आहे. “आम्ही या आठवड्यात तारखा जाहीर करू”. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना परीक्षेच्या तारखांची अगोदरच माहिती असणे आवश्यक आहे .  नुकतीच बोर्डाने पुरवणी परीक्षा सुरळीत पार पाडली ज्यासाठी दोन लाखांहून अधिक विद्यार्थी हजर होते. दोन आठवड्यात निकाल जाहीर झाला आणि विभागीय मंडळाच्या विद्यार्थ्यांसमोर कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. या पूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षा बारावीच्या 1 एप्रिलनंतर आणि एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी १ मे नंतर सुरू होण्याची शक्यता उघडकीस आणली. गायकवाड यांनी 5 जानेवारीला बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन अंतिम तारीख व वेळापत्रक ठरविण्याचे सांगितले होते. सहसा बोर्ड परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होतात.


Maharashtra SSC Exam 2021 – Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has extended the deadline for filing applications for Class X examination. As per the revised schedule, students will be able to fill up online applications till January 25 with regular fees. The previous deadline was Monday, January 11.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रक प्रमाणे २५ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. यापूर्वीची मुदत सोमवारी ११ जानेवारी रोजी संपत होती.

नोंदणी कुठे करायची?

राज्य मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboard.in यावर विद्यार्थी माध्यमिक शाळांमार्फत नोंदणी करू शकतात.

या तारखांव्यतिरिक्त बोर्डाने परिपत्रकात आणखी महत्त्वाची माहिती दिली आहे. ऑनलाइन नोंदणी करताना विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे. त्यासाठी Saral Data वरूनच नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. तसेच यावर्षी नव्याने फॉर्म १७ द्वारे नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची २०२१ मधील परीक्षेसाठी अ्ज भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्चित केला जाणार आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्यात येऊ नयेत, असेही बोर्डाने कळवले आहे.

SSC Exam 2021 Update – महत्त्वाच्या तारखा

  • नियमित विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत – १२ जानेवारी २०२१ ते २५ जानेवारी २०२१
  • पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत – १२ जानेवारी २०२१ ते २५ जानेवारी २०२१
  • माध्यमिक शाळांनी चलन डाऊनलोड करून त्याद्वारे बँकेत शुल्क भरण्याची मुदत – १२ जानेवारी २०२१ ते १ फेब्रुवारी २०२१
  • माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रि-लिस्ट जमा करण्याची मुदत – ४ फेब्रुवारी २०२१

सोर्स : म. टा.


Maharashtra SSC HSC Exam 2021 – Corona infection and lockdown rules have hit hard this academic year. Now in some places ninth to twelfth classes have started. However, in many places these classes are still closed. In all these circumstances, the education department of the state government has started planning the schedule of examinations for class X and XII to be held this year. Read latest update on schedule of examinations for 10th and 12th 2021 Exam:

कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनचे नियम यांचा मोठा फटका यंदाच्या शैक्षणिक वर्षाला बसला आहे. आता काही ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहे. मात्र अनेक ठिकाणी हे वर्गही अद्याप बंद आहेत. या सर्व परिस्थितीत दहावी आणि बारावीच्या यावर्षी होणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकाचे नियोजन राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने सुरू केले आहे. शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखांबाबत आज महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.

आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या परीक्षा ह्या १५ एप्रिलनंतर सुरू होतील. तर दहावीच्या परीक्षा ह्या १ मे नंतर घेण्याबाबत नियोजन अपेक्षित आहे, असे सांगितले.

दरम्यान, शिक्षण विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनावर शाळा सुरू करण्याचा निर्णय सोपविल्यामुळे मुंबई पालिका प्रशासनाने ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता नवीन वर्षातही आणखी १५ दिवस शाळा व शैक्षणिक संस्था बंदच राहणार असून ऑनलाइन शिक्षण पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे.  ठाणे जिल्हा परिषदेकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्यांना शाळा व शैक्षणिक संस्थांना पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत शाळा सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू असून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त  केली जात आहे.

Leave a Comment