Maharashtra SSC HSC Supplementary Exams Result

दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर…. असा पाहा निकाल !

Maharashtra SSC HSC Supplementary Exams Result – The results of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education’s supplementary examination for class X and XII conducted in September-October 2021 has been announced on Wednesday, October 20, 2021 at 1 pm, informed the Minister of School Education Prof. Varsha Gaikwad. This result has been announced on the website www.mahresult.nic.in and the subject wise marks of the students has been available on this website.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (maharashtra board) सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) (ssc result)व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) (hsc result)पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवार, दि. 20 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड (varsha gaikwad)यांनी दिली आहे. हा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असून या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इ. दहावीची पुरवणी परीक्षा दिनांक २२ सप्टेंबर, २०२१ ते ८ ऑक्टोबर २०२१ व इ. बारावीची पुरवणी परीक्षा दिनांक १६ सप्टेंबर २०२१ ते १२ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून त्याची कार्यपद्धती व कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

विद्यार्थ्यांनो असा पाहा निकाल – How To Check Maharashtra SSC HSC Supplementary Exams Result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इ. दहावीची पुरवणी परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर व बारावीची पुरवणी परीक्षा १६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबर २०२१ रोजी म्हणजे (बुधवारी) दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर
होमपेजवरील HSC, SSC supplementary result 2021 या ऑप्शनवर क्लिक करा
तुमचा रोल नंबर, आणि आईचे नाव टाका.
त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

गुणपडताळणी अर्ज करता येणार-

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना आपल्या गुणांसंबंधी असलेल्या तक्रारी, उत्तरपत्रिकेच्या प्रती, स्थलांतर प्रमाणपत्रासाठीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. दहावी व बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज रपायचा आहे. यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून दहावीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व इ. बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in यावर जावे. यासाठी स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/ शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

SSC Examination Result September 2021

HSC Examination Result September 2021

Click Here To Check Your Result


Maharashtra SSC HSC Supplementary Exams Result – दहावी-बारावीचा पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत दहावीच्या निकालात वाढ तर बारावीच्या निकालात घट झाली आहे…

SSC HSC Re-Exam Result 2020: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे इयत्ता दहावी आणि बारावीचे पुरवणी परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. दहावीचा निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा निकाल १८.४१ टक्के इतका लागला आहे. बारावीचा निकाल मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ४.७६ टक्क्यांनी घसरला आहे; याउलट दहावीच्या निकालात ९.७४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेला राज्यातून ४१,३९७ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १३,४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीची परीक्षा देणाऱ्या ६९,२७४ विद्यार्थ्यांपैकी १२,७५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

निकाल कुठे पाहाल?

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येईल.

विभागीय मंडळनिहाय दहावी, बारावीची उत्तीर्णता

मंडळ — दहावी — बारावी
पुणे — ३०.७६ — १४.९४
नागपूर — २९.५२ — १८.६३
औरंगाबाद — ३९.११ — २७.६३
मुंबई — २९.८८ — १६.४२
कोल्हापूर — ३०.१७ — १४.८०
अमरावती — ३२.५३ — १६.२६
नाशिक — ३७.४२ — २३.६३
लातूर — ३३.५९ — २२.०५
कोकण — ३४.०५ — १४.४२
एकूण — ३२.६० — १८.४१

गुणपडताळणी कधी?

ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २४ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे

महत्त्वाच्या तारखागुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत – २४ डिसेंबर २०२० ते २ जानेवारी २०२१

उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करण्याची मुदत – २४ डिसेंबर २०२० ते १२ जानेवारी २०२१

गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी ऑनलाइन अर्जांच्या थेट लिंक्स पुढीलप्रमाणे –

गुणांच्या पडताळणीसाठी येथे करा अर्ज : 
– दहावीसाठी : http://verification.mh-ssc.ac.in
-बारावीसाठी : http://verification.mh-hsc.ac.in

Maharashtra SSC HSC Supplementary Exams Result – Maharashtra SSC Result 2020 and Maharashtra HSC Result 2020 for the November Supplementary exams would be released today -23th December 2020. Check your result on mahresult.nic.in.

Maharashtra SSC HSC Supplementary Exams Result

नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांसाठी, दुपारी 1 वाजता निकाल 

महाराष्ट्र बोर्डाने दोन किंवा कमी विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांची गुणवत्ता सुधारू इच्छित होती त्यांच्यासाठी SSC आणि HSC पुरवणी परीक्षा आयोजित केली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती आणि जवळपास एक महिन्यानंतर ही एमएसबीएसएचएसई दहावी आणि १२ वी पूरक परीक्षा निकाल २०२० जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता, पोर्टलवर उपलब्ध असलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र बोर्ड पूरक परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. बुधवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येतील. निकालची प्रिंटआऊट घेता येईल. उत्तरपत्रिकेच्या पूनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.

महाराष्ट्र बोर्ड एचएससी / एसएससी पुरवठा निकाल २०२० ऑनलाइन कसे तपासायचे?

निकाल ऑनलाईन घोषित केल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल तपासणी प्रक्रियेची माहिती असणे महत्वाचे आहे. या घोषणेच्या वेळी बर्‍याच विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो ज्यामुळे महाराष्ट्र दहावी व बारावीचा पुरवठा निकाल २०२० तपासणे कठीण झाले आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी, महाराष्ट्र बोर्डाचा निकाल २०२० तपासण्यासाठी विस्तृत चरण-दर-चरण प्रक्रिया खाली सूचीबद्ध केली आहे:

 1: अधिकृत वेबसाइट म्हणजेच maharesult.nic.in वर भेट द्या
2: एसएससी / एचएससी पूरक निकालासाठी क्लिक करा
3: आपणास इनपुट फील्डसह एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल
4: आपला परीक्षा रोल नंबर आणि इतर तपशील प्रविष्ट करा
5: सत्यापित करा आणि वेबसाइटवर तपशील सबमिट करा
6: आपला महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल
7: निकाल स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या

दहावी परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात

दुसरकडे SSC’च्या परीक्षांसाठी २०२१ करता ऑनलाईन पध्द्तीने अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी www. Mahahsscborad.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करायचे आहेत. नियमित विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी २३ डिसेंबर ते ११ जानेवारी पर्यंतची मुदत आहे. तर खासगी विद्यार्थी आणि पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांना १२ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यत ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत. तर विद्यार्थ्यांचे अर्ज इतके घाईगडबडीत दाखल करून घेण्यावरून मुंबई मुख्याध्यापक संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे.
जाहीर झाल्याप्रमाणे २३ डिसेंबर ते ११ जानेवारीपर्यंत मुदत आहे. पुनर्परिक्षार्थींसाठी १२ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. SSC परीक्षांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. www. Mahahsscborad.in वर दाखल करायचे अर्ज भरू शकतात.

त्याचप्रमाणे आज दहावीच्या मार्कशीटबाबत गुडन्यूज देण्यात आली. दहावीची मार्कशीट मिळवण्यासाठी आता धावपळ करावी लागणार नाही. विद्यार्थ्यांना मार्कशीट घरपोच देण्याची सोय परीक्षा मंडळाने केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता दहावीची मार्कशीट घरीच मिळणार आहे.
विशेष म्हणजे कोणत्याही व्यक्तीला यापुढे चार वेळा ऑनलाईन मार्कशीट मागविता येणार आहे. hhtp://kseeb.kar.nic.in या संकेत स्थळावरून आपले गुणपत्रक मागवता येणार आहे. सरकारी कामांसह नोकरी मिळविण्यासाठी दहावीची मार्कशीट गरजेची असते तर ही मार्कशीट वेळेत न मिळाल्याने अनेकांची कामे अडून राहतात. परंतु यापुढे मार्कशीट ऑनलाईन मिळवता येणार असल्याने अनेकांचा त्रास कमी होणार आहे.

Leave a Comment