ग्रामविकास व पंचायत राज विभागामध्ये लवकरच १३ हजार च्या वर पदांवर भरती प्रक्रियेला सुरुवात
Maharashtra Zilla Parishad Bharti 2022 – During the Fadnavis government, mega recruitment was announced in the state. It included 13 thousand 521 seats in Zilla Parishad. For this, in March 2019, over 20 lakh applications were received. One candidate applied for various posts by spending three to four thousand rupees. Candidates were expecting that Zilla Parishad would also be recruited as the recruitment process for various posts has been going on since last year. However, anger was heightened as there was no movement from the government. However, senior officials from the Rural Development and Panchayat Raj Department said that the recruitment process, which was delayed due to technical reasons, has now been eased. The General Administration Department has given permission for recruitment and the government should select one of the three newly appointed companies for the examination. Therefore, the Rural Development and Panchayat Raj Department will soon start the recruitment process by selecting a company.
Maharashtra Zilla Parishad Bharti 2022 | Maha RDD Bharti 2022
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५२१ पदांची तीन वर्षांपासून रखडलेल्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने पदभरतीला मान्यता दिली असून परीक्षेसाठी एका कंपनीची निवड केली आहे. त्यामुळे २० लाखांहून अधिक अर्जदारांना दिलासा मिळाला आहे
Zilla Parishad Recruitment 2022
जिल्हा परिषदेमधील १३ हजार ५२१ जागांचा समावेश होता. यासाठी मार्च २०१९ मध्ये २० लाखांवर अर्ज आले. एका उमेदवाराने तीन ते चार हजार रुपये खर्च करून विविध पदांसाठी अर्ज केलेत. वर्षभरापासून विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू असल्याने जिल्हा परिषदेचीही पदभरती होईल, अशी अपेक्षा उमेदवारांना होती. मात्र, सरकारकडून कुठलीच हालचाल नसल्याने रोष वाढला होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या भरती प्रक्रियेचा मार्ग आता सुकर झाल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सामान्य प्रशासन विभागाने भरतीसाठी परवानगी दिली असून शासनाने नव्याने नेमलेल्या तीन कंपन्यांपैकी एकाची परीक्षेसाठी निवड करावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामविकास व पंचायत राज विभाग लवकरच एका कंपनीची निवड करून भरती प्रक्रियेला सुरुवात करणार आहे.
महापरीक्षा संकेतस्थळ बंद झाल्याने पुढे सरकारने परीक्षेसाठी चार खासगी कंपन्यांची निवड केली. यातील न्यासा कंपनीसोबत ग्रामविकास विभागाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, न्यासा कंपनीसोबतचा करारही सरकाने रद्द केल्याने जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये पुन्हा खोडा निर्माण झाला होता. शासनाने आता नव्याने तीन कंपन्या निवडल्या असून त्यामार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे.
नुकत्याच झालेल्या ‘म्हाडा’ परीक्षेत राज्यभर बनावट उमेदवारांना पकडण्यात आले होते. आता जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे परीक्षेत पुन्हा गोंधळ टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, बायमेट्रिक, मोबाईल जॅमर व अंग तपासणी बंधनकारक करावी.
जिल्हा परिषदांमध्ये ४६९००, विविध विभागांत २ लाखांहून अधिक पदे रिक्त
Maharashtra Zilla Parishad Bharti 2022 : More than 2 lakh posts are vacant in various departments of the state. There are 46,900 vacancies in Zilla Parishads and 1.53 lakh vacancies in other divisions. Vacancies are putting extra strain on the work and when will these posts be filled? What are the plans to fill the vacancies? Why the delay in filling up the posts? This question was raised by MLA Ranjit Singh Mohite. Replying to this, Deputy Chief Minister Ajit Pawar admitted that more than 2 lakh posts were vacant and said that 100 per cent posts in the Public Service Commission would be filled after the approval of the Finance Department.
राज्याच्या विविध विभागांत २ लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदांमध्ये ४६ हजार ९०० तर इतर विभागातील १ लाख ५३ हजार इतर पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कामांवर अतिरिक्त ताण येत असून ही पदे कधी भरणार ?
पदे भरण्याचे नियोजन काय ? पदे भरण्यास विलंब का झाला ? असा प्रश्न आमदार रणजितसिंह मोहिते यांनी उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देत २ लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याचे मान्य करीत वित्त विभागाच्या मंजुरीनंतर लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील १०० टक्के पदे भरण्यात येणार असल्याचे सांगितले.
अ वर्गाच्या १०५४४, ब वर्गाच्या २०९९९, क वर्गातील १ लाख २७ हजार तर ड वर्गातील ४० हजार ९४४ पदे रिक्त आहेत. कोरोनामुळे राज्यातील हजारो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, यामुळे शासनाने नोकरभरती राबविल्यास रोजगार मिळेल. रिक्त पदे असल्याने प्रशासनावर ताण पडत आहे. नागरिकांना सेवा मिळण्यास विलंब होत आहे. यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी उत्तर देत पदे रिक्त असली तरी उपलब्ध कर्मचारी, संगणक व ऑनलाइन कामकाज करून प्रशासकीय कामकाज सुरू आहे. ताण पडत असला तरी नागरिकांना वेळेत सुविधा दिल्या जात असल्याचे पवार यांनी सांगितले.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents