Medhavi Scholarship 2021

सरकारकडून शिष्यवृत्ती, दहावी पास ते पदवीधर, सर्वांना याचा लाभ ! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Medhavi Scholarship 2021 – MEDHAVI national scholarship scheme invites application for the ‘SAMADHAN scholarship examination – 2021’. Under this exam, scholarships will be awarded solely on MERIT basis, to candidates who qualify prescribed exam.  The selection process for the scholarship will comprise of an ONLINE Test of Multiple Choice Questions (MCQs). Candidates are requested to apply online through MEDHAVI ANDROID APPLICATION

भारत सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारने विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप (शासकीय शिष्यवृत्ती) मिळविण्याची संधी दिली आहे. यासाठी दहावी, बारावी, पदवीधर किंवा पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या अशा सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे.

वय १६ ते ४० वर्षांच्या आतील प्रत्येक विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकतो. मेधावी सोल्यूशन स्कॉलरशिप (Medhavi Samadhan Scholarship)असे याचे नाव आहे.

भारत सरकारच्या डिजिटल इंडियाच्या पुढाकाराने मेधावी राष्ट्रीय विद्यार्थी योजना (Medhavi Samadhan Scholarship)सुरु आहे. याअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. ज्यामध्ये मेधावी समाधान शिष्यवृत्ती (Medhavi Samadhan Scholarship 2021) ही एक आहे.

कसा आणि कुठे कराल अर्ज ?

  • या शिष्यवृत्तीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. मेधावी नॅशनल स्कॉलरशिप स्कीमची वेबसाइट medhavionline.org जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकता. आपण गूगल प्ले स्टोअर (Google Play Store)मधून मेधावी एप (Medhavi App) डाऊनलोड करु शकता.
  • १ जूनपासून यासंदर्भातील प्रक्रिया सुरु झाली आहे. १५ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकता.

कशी मिळेल शिष्यवृत्ती

  • ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे. तुम्ही घरबसल्या मोबाइल किंवा लॅपटॉपवरुन मेधावी ऐपची परीक्षा देऊ शकता. परीक्षा २५ जुलै २०२१ रोजी होणार आहे.

Medhavi Scholarship 2021 Syllabus

यामध्ये २० पर्यायी प्रश्न असणार आहेत. केवळ १० मिनिटांची परीक्षा असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असणार आहे. प्रत्येक तीन चुकीच्या उत्तरांना एक गुण कापला जाणार आहे.

  1. रिझनिंग अॅप्टिट्यूड – ६ प्रश्न
  2. क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – ६ प्रश्न
  3. जनरल अवेअरनेस – ४ प्रश्न
  4. इंग्लिश – ४ प्रश्न

किती मिळणार शिष्यवृ्ती ?

  • ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना विविध परीक्षांचे अर्ज शुल्क भरण्याच्या उद्देशाने दिली जाते. ३०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळते.
  • परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाल्यास १००० रुपये मिळतात. ५० टक्क्यांहून अधिक आणि ६० टक्क्यांहून कमी गुण मिळवल्यास ५०० रुपये आणि ४० टक्क्यांहून अधिक आणि ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्यास ३०० रुपये मिळणार आहेत.

कधी मिळेल शिष्यवृत्ती ?

  • २५ जुलैच्या परीक्षेनंतर २६ जुलैला उत्तर पत्रिका जाहीर होणार आहे. २८ जुलैला निकाल जाहीर होणार आहे. निकालाची घोषणा झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार आहे.

मेधावी समाधान शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment