MHT CET Time Table 2021

सीईटी परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असल्याची सीईटी सेलची माहिती

MHT CET Time Table 2021 – There is confusion among the students as the schedule of the subsequent CET exams has not been announced by the CET cell yet. But As per information by CET CELL it will soon released Time Table for CET Exams. So keep visiting to know further details on MHT CET Time Table 2021.

CET Time Table 2021 Maharashtra – अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी या पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी महाराष्ट्रातून सुमारे साडेतीन लाख विद्यार्थी अर्ज भरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा याची दिशा व मार्गदर्शन मिळत असते. मात्र अद्याप सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. सीईटी सेलने संपूर्ण नियोजन जाहीर न करता किमान तारखा तरी जाहीर कराव्यात, असे मत विद्यार्थ्यांनी मांडले.

नियाेजित प्रवेेश प्रक्रिया संपल्यावर वेळापत्रक हाेणार जाहीर

मागील वर्षी तब्बल ६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी नोंदणी केली होती. इतर परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या. अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात संपली. मात्र, लाॅची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू आहे. ही प्रक्रिया संपल्यावरच पुढील वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे सांगण्यात आले आहे. नियाेजित प्रवेेश प्रक्रिया संपल्यावर वेळापत्रक हाेणार जाहीर

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..