MIDC परीक्षा अखेर सरळसेवा पद्धतीनेच – MIDC Recruitment 2019 Hall Ticket

८६५ पदांकरिता MIDC भरती २०१९:  मदतनीस, शिपाई आणि वाहनचालक या पदाकरिता प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध होणार, मॉक टेस्ट लिंक उपलब्ध !!

MIDC Recruitment 2019 Hall Ticket – Maharashtra Industrial Development Corporation, advertisement was given for 865 posts of class C and class D in 2019 from Mahapariksha Portal. For this exam will be conducted from 20th Aug To 10th Sep 2021. Official Exam Notice has been issued for the same. And Applied candidates will be able to download their hall tickets from blow link which will be activated on 12th August 2021. As soon as link is active we will inform You so keep visiting this Page for future Update on MIDC Recruitment 2019 Hall Ticket.

Update on 20th Aug – ADMIT CARD FOR THE POSTS OF HELPER / PEON /DRIVER WILL GO LIVE SHORTLY, CANDIDATES WILL BE INFORMED ACCORDINGLY.  मदतनीस, शिपाई आणि वाहनचालक या पदाकरिता प्रवेशपत्र लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु असून त्यासाठी लागणाऱ्या पुढील सूचना लवकरच कळवण्यात येईल. 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) दोन वर्षे प्रलंबित असलेली परीक्षा अखेर २० ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परंतु, ८६५ पदांसाठी होणारी ही परीक्षा सरळसेवा ऐवजी ‘आयबीपीएस’कडून (इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) घेण्यात येणार होती. ऐन वेळेवर परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आल्याने परीक्षार्थीचा विरोध होत होता. ही बाब लक्षात घेऊन आता ही परीक्षा सरळसेवा पद्धतीनेच होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

एमआयडीसीने २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज मागवले होते. मात्र त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे परीक्षा कधी होणार, असा प्रश्न उमेदवारांकडून सातत्याने विचारण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीकडून परिपत्रक प्रसिद्ध करून परीक्षेबाबत माहिती देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी महापरीक्षा संकेतस्थळावर अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यामुळे ही भरती प्रक्रिया सरळसेवा परीक्षा पद्धतीने होईल, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते. मात्र, आता ही परीक्षा आयबीपीएस घेणार असल्याचे सांगण्यात आले. मार्च २०२१ मध्ये झालेल्या एका परीक्षेतही आयबीपीएसने ही परीक्षा घेतली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. हीच पद्धती आता ८६५ पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्येही अवलंबिली जाणार होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता.

सरळसेवा भरती आणि आयबीपीएस परीक्षा पद्धतीत टोकाचे अंतर आहे. त्यामुळे परीक्षा देणे अडचणीचे होणार असल्याने विद्यार्थ्यांनी याला प्रचंड विरोध केला. हा विरोध बघता आता एमआयडीसीने ही परीक्षा सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारेच घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आयबीपीएसला विरोध का?

परीक्षांच्या तारखा जाहीर होताना परीक्षा पद्धतीही जाहीर केली जाते. बँकिंग क्षेत्रातील परीक्षा आयबीपीएसकडून घेतल्या जातात तर अन्य परीक्षा सरळसेवा पद्धतीने होतात. ज्यामध्ये सामान्य ज्ञान विषय असतो. ऋणात्मक गुण नसतात. आयबीपीएसकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीत मात्र गणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी असते. शिवाय यामध्ये ऋणात्मक गुण असतात. त्यामुळे आयबीपीएसकडून होणाऱ्या परीक्षेला विरोध होता.

 

MIDC Recruitment 2019 Hall Ticket

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत २०१९ साली वर्ग क आणि वर्ग ड ची ८६५ पदांकरिता जाहिरात देण्यात आली होती . उक्त पदांच्या भरती करिता ऑनलाईन/ऑफलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन २० ऑगस्ट ते १0 सप्टेंबर 2021 या कालावधीत करण्यात आल्याचे असून सादर परीक्षेसाठी हॉल तिकीट हे १२ ऑगस्ट पासून संकेस्थवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार . ज्या उमेदवारांनी या साठी २०१९ मध्ये अर्हज केला आहे ते डायरेक्ट आपले प्रवेश पत्र येथून डाउनलोड करू शकतात अधिक माहिती खाली दिलेली आहे

MIDC 2019 Exam Schedule

MIDC Recruitment 2019 Hall Ticket

MIDC Recruitment 2019 Hall Ticket

Notification MIDC Bharti 2019
Notification Published on Date 15 July 2019
Last Date of Submission 7 August 2019
Location Maharashtra
Exam date 20th Aug To 10 Sep 2021
Organization Maharashtra Industrial Development Corporation
No Of Posts 865
Admit card Status Out on 12 Aug 2021

How to download MIDC India Hall Ticket/Admit Card 2021?

  • Visit the MIDC Website www.midcindia.org  
  • Go to ST Recruitment Application, the Hall Ticket link.
  • Now, Enter the Roll Number and Date of Birth.
  • Then, Click on the submit button.
  • After submitting the Hall Ticket will Appear.
  • Download the PDF for future use.

MIDC Hall 2021 Ticket RELEASED- DOWNLOAD Here

MIDC Syllabus and Exam Pattern Download

MIDC 2019 Exam Mock Test

MIDC Bharti 2019 Hall Ticket -Notice

SCRIBE-COVID SELF DECLARATION

DECLARATION FORM FOR USE OF SCRIBE

 

7 thoughts on “MIDC परीक्षा अखेर सरळसेवा पद्धतीनेच – MIDC Recruitment 2019 Hall Ticket”

Leave a Comment