MSCE Pune 5th 8th Scholarship result, Merit List 2022

MSCE Pune 5th 8th Scholarship result, Merit List 2022The final results of the Class V and VIII examinations conducted by the Maharashtra State Examination Council in August 2021 and the merit lists of the scholarship holders have been announced on Friday. 57 thousand 334 students of class V and 23 thousand 962 students of class VIII have become eligible in this scholarship examination. Out of which 14 thousand 250 students of class V and 10 thousand 736 students of class VIII will be scholarship holders. (Scholarship Exam Result)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ऑगस्ट २०२१ मध्ये घेतलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीचे ५७ हजार ३३४, तर आठवीचे २३ हजार ९६२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यातील इयत्ता पाचवीचे १४ हजार २५० आणि आठवीचे १० हजार ७३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक असणार आहेत. (Scholarship Exam Result)

परीक्षा परिषदेच्या वतीने ही शिष्यवृत्ती परीक्षा १२ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबई वगळता संपूर्ण राज्यात घेण्यात आली. परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल २४ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला, तर गुणपडताळणीसाठी २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाइनद्वारे मागविले होते.

परिषदेने दिलेल्या मुदतीत ऑनलाइन आलेल्या परिपूर्ण अर्जांवरून संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी केली. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार केला आहे. या निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.

‘‘शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम गुणपत्रकाची प्रत परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. छापील गुणपत्रक व प्रमाणपत्र लवकरच शाळांना पोचविण्यात येतील. तसेच, शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडे गुणवत्ता यादीतील संबंधित विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती रकमेबाबत यापुढील पत्रव्यवहार त्यांच्या कार्यालयाकडे करण्यात यावा’’, असे परीक्षा परिषदेचे आयुक्त एच.आय. आतार यांनी स्पष्ट केले.

शिष्यवृत्ती परीक्षेची सांख्यिकीय माहिती :

 • परीक्षेचे नाव : नोंदणी केलेले विद्यार्थी : उपस्थित विद्यार्थी : अनुपस्थित विद्यार्थी : पात्र विद्यार्थी : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी : पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार टक्केवारी)
 • इयत्ता पाचवी : ३,८८,५१५ : ३,३७,३७० : ३७,८७१ : ५७,३३४ : १४,२५० : १६.९९ टक्के
 • इयत्ता आठवी : २,४४,३१४ : २,१०,३३८ : २२,८१४ : २३,९६२ : १०,७३६ : ११.३९ टक्के
 • एकूण : ६,३२,८२९ : ६,३१,०१४ : ६०,६८५ : ८१,२९६ : २४,९८६ :१४.२० टक्के

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ :

– www.mscepune.in

– https://www.mscepuppss.in/

– असा पहा निकाल : संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा वैयक्तिक बैठक क्रमांक टाका.


MSCE Pune 5th 8th Scholarship result, Merit List 2021 : The interim results of the fifth and eighth scholarship examinations conducted by the Maharashtra State Examination Council have been announced. In this, Pimpri-Chinchwad city’s fifth and eighth result was relatively low. Therefore, the Department of Education has worked hard in this regard and has started the actual work by announcing the Mission Scholarship Program.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा पाचवी आणि आठवीचा निकाल तुलनेने घटला. त्यामुळे शिक्षण विभागाने या दृष्टीने कंबर कसली असून मिशन शिष्यवृत्ती कार्यक्रम शिक्षण विभागाने जाहीर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांचा इयत्ता पाचवीचा निकाल ५.१ टक्के, तर आठवीचा निकाल ६.६ टक्के इतका लागला आहे. हा निकाल समाधानकारक नसल्याने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता वाढवण्याकरिता ‘मिशन शिष्यवृत्ती’ कार्यक्रम शिक्षण विभागाने हाती घेतला असल्याचे अशी माहिती प्रभारी प्रशासन अधिकारी स्मिता गौड यांनी दिली.

यावर्षी इयत्ता पाचवीच्या एक हजार ३०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक हजार ८९ विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये फक्त ५६ विद्यार्थी पात्र ठरले. इयत्ता आठवीच्या ५१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४०५ विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी फक्त २७ विद्यार्थी पात्र ठरले. ही आकडेवारी समाधानकारक नसल्याने प्रभारी प्रशासन अधिकारी स्मिता गौड यांनी मुख्याध्यापकांची बैठक घेतली.

शिक्षक प्रशिक्षणास सुरुवात
मिशन शिष्यवृत्ती कार्यक्रम जाहीर करून मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या. यामध्ये महापालिकेच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यांला शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट करावे; तसेच एकूण विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतील यासाठी प्रयत्न करावेत; १० टक्के विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण सोमवार (२० डिसेंबर) पासून सुरू करण्यात आले आहे.

मिशन शिष्यवृत्ती
या कार्यक्रमांतर्गत महापालिका शाळातील पाचवी आणि आठवी इयत्तेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार करण्यात येईल. तसेच यासाठी शिक्षकांचे चार दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील शिष्यवृत्तीत तज्ज्ञ असलेली ८ मंडळी यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत. महापालिकेचे ३५० हून अधिक मुख्याध्यापक, शिक्षक याचे प्रशिक्षण घेत आहेत. तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्य़ांच्या ३ सराव चाचण्या महापालिकेच्या वतीने घेण्यात येतील.

सध्या २०२२ च्या शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. तर २० फेब्रुवारी २०२२ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म भरण्याची ३१ डिसेंबर २०२१ ही अंतिम तारीख आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहून याबाबत थोडी उदासीनता असल्याचे पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गुणवत्ता तपासणे आणि विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण करणे यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी हा यामागचा हेतू आहे. या उद्देशाने मिशन शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु केल्याचे प्रभारी प्रशासन अधिकारी स्मिता गौड यांनी सांगितले.

 

 

 


MSCE Pune 5th 8th Scholarship result, Merit List 2021 : www.mscepune.in published am online result of Class 5th & 8th Scholarship Result online. Candidates appeared for this Examinations can Check their online result from given Link. The Official Notification published by MSCE Pune is given below.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत 12 ऑगस्टला २०२१ घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा; तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा (इयत्ता आठवी) अंतरिम (तात्पुरता) निकाल २४ नोव्हेंबर २०२१  जाहीर करण्यात आला.खाली दिलेल्या लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता. 

MSCE Pune 5th 8th Scholarship result, Merit List 2021


Online Result of Maharashtra Std 5th & 8th Result Date & Time, Merit List from the official website at www.mscepune.in, www.puppss.mscescholarshipexam.in. It is expected that More than 55000 students appeared in the शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी-२०२१ Std 5th & 8th Scholarship Exam and now looking for Cut Off Marks Expected.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करावयाची असल्यास संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये दिनांक २४/११/२०२१ ते दिनांक ०५/१२/२०२१ रोजीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.

MSCE Pune 5th 8th Scholarship result 2021

Organization Maharashtra State Council of Examination
Name of the Exam Scholarship Examination
MSCE  Scholarship Exam Result Date 24.11.2021
Status of MSCE Pune Result Available Now
Official Website www.mscepune.in/ www.mscepuppss.in

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगइनमध्ये ५ डिसेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरसाठी ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाइन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी, ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी ५ डिसेंबर पर्यंत पर्यंत संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अंतिम निकाल कधी ?

मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

 

शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉग इनमधून; तसेच पालक व विद्यार्थ्यांना हा निकाल परिषदेच्या http://www.mscepune.in/ वेबसाइटवर पाहता येणार आहे. मात्र, निकाल जाहीर झाल्यापासून या लिंकवर काही तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल समजू शकलेला नाही

MSCE Pune merit list 2021 District wise : 

District wise Details to Check your result are given here. Read all details carefully & Check your result Online.

Mumbai Nagpur
Wardha Pune
Thane Solapur
Amravati Buldhana
Aurangabad Bid
Chandrapur Ahmednagar
AkolaBhandara Gadchiroli
Satara Dhule
Gondiya Jalgaon
Kolhapur Nanded
Nandurbar Nashik
Jalna Latur
Washim Mumbai Suburban
Osmanabad Hingoli
Raigarh Ratnagiri
Yavatmal Parbhani
Sangli Sindhudurg

The result and merit list for MSCE Pune 2021 can be checked by following some simple steps. The steps which need to be followed are mentioned on this page. Read the below-given instructions to check your MSCE Pune Scholarship merit list 2021.

 

1 thought on “MSCE Pune 5th 8th Scholarship result, Merit List 2022”

 1. Dear Sir /Madam
  We have already enroll for last scholarship -Mumbai.we have Hall ticket also.but as the exam postponed and not conducted in Mumbai.
  What will be the solution.my daughter Asmi (now 9th STD)wanted to give exam.but only because we are in mumbai.we can not give.please allow us to give the exam.
  Kindly do the needful.

  Reply

Leave a Comment