MSCE Pune Scholarship Answer Key 2021

MSCE Pune Scholarship Answer Key 2021 – The Maharashtra State Council of Examination had conducted Pre upper Primary Scholarship (Std 5th) and Pre Secondary Scholarship Exam (Std 8th) on 12th August 2021. All students who have given this exam download the MSCE Pune PUP PSS Scholarship Answer key for Paper-I and Paper-II.

शिष्यवृत्ती परीक्षा ऑगस्ट २०२१ च्या अंतरिम उत्तरसूचीबाबतचे प्रसिद्धीपत्रक 

शिष्यवृत्ती परीक्षा ऑगस्ट २०२१ ची अंतरिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आलेली असून सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन नोंदविण्यासाठी पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये दि. २४/०८/२०२१ ते दि. ०२/०९/२०२१ रोजीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे

मुंबई वगळता इतर जिल्ह्यात १२ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल (Maharashtra Scholarship Exam Result 2021) लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई जिल्ह्यातील परीक्षेचे नियोजन अद्याप झाले नसले, तरी राज्य परीक्षा परिषदेने निकालाची कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठीची अंतरिम उत्तरसूची परिषदेच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. दोन सप्टेंबरपर्यंत त्यासाठीच्या त्रुटी व आक्षेप नोंदविता येणार आहेत. त्यानंतर अंतिम उत्तरसूचीसह निकालप्रत तयार करण्याची कार्यवाही सुरू होणार असल्याचे परिषदेने सांगितले.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय तात्पुरती उत्तरसूची परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि ‘https://www.mscepuppss.in’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही तात्पुरती (अंतरिम) उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबत परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात निवेदन करता येणार आहे. या उत्तरसूचीवर दोन सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत दिली आहे.

MSCE Pune Scholarship Answer Key 2021

आक्षेप हे केवळ ऑनलाइनद्वारेच स्वीकारले जाणार आहेत. तसेच मुदतीत आलेल्या ऑनलाइन निवेदनांवर संबंधित विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे. तसेच शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या ऑनलाइन अर्जातील माहितीमध्ये आणि शाळाच्या माहितीत विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग, अशी काही दुरुस्ती असल्यास त्यासाठी दोन सप्टेंबरपर्यंतची मुदत दिल्याचे परिषदेने सांगितले आहे.

अशा आहेत परिषदेच्या सूचना

– विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये ‘अंतरिम उत्तरसूची’ या पर्यायातून त्रुटी नोंदवता येतील.

– दोन सप्टेंबरनंतर नोंदविलेल्या आक्षेपांची नोंद घेतली जाणार नाही.

– ई-अर्जाशिवाय टपालाने अथवा ई-मेलद्वारे येणाऱ्या त्रुटी ग्राह्य नसतील.

– प्रत्येक अर्जावर स्वतंत्र उत्तर दिले जाणार नाही.

– प्राप्त अर्जांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध होईल.

दुरुस्तीची संधी

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन आवेदन पत्रातील माहिती, नाव, आडनाव बदलण्याची संधी परिषदेने दिली आहे. दोन सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ही संधी असेल. त्यानंतर निकाल तयार करण्याची कार्यवाही सुरू होईल. त्यामुळे निकालपत्रावर अर्जातील माहिती नोंदविली जाईल. तत्पूर्वी, माहितीची खात्री करून घेण्याचे परिषदेने सूचित केले आहे.

MSCE Pune Scholarship Answer Key 2021

Department Name Maharashtra State Council of Examination, Pune
Scholarship Name MSCE Pune Scholarship for 5th & 8th Standard Students
Type of Scholarship Exam State Level Exam
State Maharashtra
Year 2021-22
Scholarship Type Pre Upper Primary Scholarship Examination (PUP)- Class 5th

Pre Secondary Scholarship Examination (PSP)- Class 8th.

Application start date 9th March 2021
Last Date for MSCE 5th & 8th Class scholarship 10th April 2021
Exam Dates 12th August 2021

शिष्यवृत्ती परीक्षा – २०२१ अंतरिम उत्तरसूची / Interim Answer Key

Objection on Question Paper & Interim Answer Key / प्रश्नपत्रिका व अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप

Leave a Comment