Mumbai Mantralaya Sarkari Bharti 2020

Mumbai Mantralaya Sarkari Bharti 2020: If you are looking for a government job, there is a good news for you. Under the Ministry of Law and Justice, Government of India, recruitment has been started for several vacancies. Read Further details below..

जर आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी चालून आली आहे. भारत सरकारच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत, अनेक रिक्त जागांसाठी भरती सुरू करण्यात आली (ministry-of-indian-government-on-various-posts-pa-in-different-laguages) आहे. मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन यासाठी अर्ज करू शकता. या भरतीसाठी 44, 900 ते 1,42,400 पर्यंत वेतन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे 12 उत्तीर्ण उमेदवारांना देखील यासाठी अर्ज करता येणार आहे.

या पदांसाठी भरती
कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या विभागात उर्दू, कोकणी, नेपाळी, संथाली आणि तमिळ भाषांसाठी वैयक्तिक सहाय्यक (प्रादेशिक भाषा) अशा पाच पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी उमेदवारांना 12 वी पास असणे गरजेचे आहे. त्याशिवाय संबंधित भाषांव्यतिरिक्त कम्प्यूटरमध्ये निपुण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचं वय 30 वर्षांपेक्षा अधिक नसावे. उमेदवार http://leligslative.gov.in/documents/recruitment या लिंकवर जाऊन या पदांसाठी संबंधित पात्रता, पदांसाठीचे निकष आणि इतर तपशील मिळवू शकतात.

येथे अर्ज जमा करा
उमेदवार या पदांसाठीची जाहिरात जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत वेबसाईटवर उपलब्ध नमुन्यानुसार, अर्ज भरू शकतात. आरके शर्मा, अवर सचिव, भारत सरकार कायदा आणि न्याय मंत्रालय विधान विभाग, रूम नंबर 412 बी, ए विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली येथे अर्ज जमा करावा लागेल.


मुंबई मंत्रालयातील अधिकारी वर्गाची पदे रिक्त

मंत्रालयातील अधिकारी संवर्गातील रिक्त पदे (vacant posts of officers in Mantralaya) न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि विहित कार्यपद्धतीने भरण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. कक्ष अधिकारी संवर्गाची ज्येष्ठता सूची जारी करुन या कामासाठी विशेष सेल तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

विधानभवनात मंत्रालयातील कक्ष अधिकारी पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रलंबित असल्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पटोले यांनी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले. यावेळी नाना पटोले म्हणाले की, तातडीने प्रशासनातील दोन्ही बाजू मांडून सेवा ज्येष्ठता यादी तयार करुन पुढील कार्यवाही करण्यास गती द्यावी.  कक्ष अधिकारी पदाच्या 1986 पासूनच्या ज्येष्ठता सुधारीत करण्याच्या कार्यवाहीस प्रदीर्घ कालावधी लागणार असून या कामासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी, असेही पटोले यांनी सांगितले. यावेळी बैठकीत उपस्थित असलेल्या मुख्य सचिव संजय कुमार यांनी विहित नियामांनुसार कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

सौर्स : डेली हंट

Leave a Comment