NMMS Scholarship Result 2021

NMMS Merit List 2021 –आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची निवड यादी जाहीर; इथे वाचा सविस्तर

NMMS Scholarship Result 2021 – NMMS merit list 2021 maharashtra has been announced. Scholarship examination for class VIII of economically weaker students was held on 6th April 2021. The list of meritorious students can be seen on the website of Maharashtra State Examination Council in Pune. Eighth class students were tested for this. The selection list of students eligible for the scholarship is available here on the website of the Examination Council from 18th August.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात NMMS स्कॉलरशिपची गुणवत्ता यादी (nmms merit list 2021 maharashtra)जाहीर झाली आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतल्या विद्यार्थ्यांची इयत्ता आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा 6 एप्रिल 2021 रोजी घेण्यात आली होती. पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर गुणवंत विद्यार्थ्यांची यादी पाहता येईल. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची यासाठी परीक्षा झाली होती. शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी 18 ऑगस्टपासून परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर इथे उपलब्ध आहे.

या लिंकवर इथेही क्लिक केलंत तर तुमच्या पाल्याचं नाव आहे का हे दिसेल. 2007-08 पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा Ministry of Human Resources अर्थात भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे आयोजित केली जाते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या गुणवत्तेस अधिक वाव देण्यासाठी त्यांचं 12 वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण व्हावं या योजनेचा गाभा आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत नाव आलं तर अशा प्रज्ञावान विद्यार्थ्याला दरमहा 1000 रुपये (वार्षिक 12हजार रुपये) शिष्यवृत्ती मिळते.

राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांचं पुढील शिक्षण धोक्यात; श्रेणी सुधार परीक्षा नाही 6 एप्रिल रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या केंद्रीय शिष्यवृत्तीमध्ये महाराष्ट्रासाठी 11682 एवढा कोटा आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या 11682 विद्यार्थ्यांना दरवर्षी या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळू शकते. ZP च्या शिक्षकाला राष्ट्रपती पुरस्कार; अतिदुर्गम भागात देतात शिक्षणाचे धडे महाराष्ट्र राज्याच्या आरक्षण धोरणानुसार संबंधित विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते.

अपंगांसाठी 4 टक्के आरक्षण यात राज्य सरकारने ठेवलं आहे. प्रत्येक जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आला आहे. या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची यादी www.mscepune.in www.nmms.mscescolarshipexam.in या दोन अधिकृत संकेस्थळांवर जाहीर करण्यात आली आहे. शाळांनी ही यादी याच संकेतस्थळांवरून डाउनलोड करून संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वितरण करावं अशी सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी केली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची सोय आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2020-21 इ. ८ वी साठी परीक्षा दि. ६ एप्रिल २०२१ गुणयादी बाबत सूचना ….

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2020-21
निवड प्रक्रिया –
1. NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी 11,682 शिष्यवृत्ती कोटा M.H.R.D. नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केला आहे.
2. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधीत संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.
3. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगासाठीचे ४% आरक्षण समाविष्ट आहे.
4. सर्व जिल्हयांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व इ. ८ वी ची विद्यार्थी संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्या यांच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे.
5. पात्रता गुण : MAT व SAT दोन्ही विषयात एकत्रित GEN, VJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC, EWS साठी ४०% गुण व SC, ST व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३२% गुण मिळणे आवश्यक आहेत.

प्रसिद्धी निवेदन : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२०-२१ इ. ८ वी साठी मंगळवार दिनांक ६/४/२०२१ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेची अंतिम गुणयादी जाहीर करण्याबाबत


NMMS Scholarship Result 2021 -Maharashtra State Council of Educational Research and Training (MSCERT) has released the NMMS Result 2021, NMMS Scholarship Merit List at its official site @ www.mscepune.in/ www.nmms.mscescholarshipexam.in. Applied candidates can download their Result from below link. And they an check NMMS Cut Off, NMMS Maharashtra Merit list 2021, NMMS Scholarship Result 2021 and other at below section

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दि.२६/०७/२०२१ रोजी परिषदेच्या www.mscepune.in व http://nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलिंग, जातीत, दिव्यंगत्वाचे व इतर काही दुरुस्ती/हरकती असल्यास शाळेमार्फत परिषदेच्या [email protected] या ईमेलवर दि. ०४/०८/२०२१ पर्यंत कळविण्यात यावे. विहित मुदतीनंतर आलेल्या दुरुस्त्यांचा विचार करण्यात येणार नाही. प्राप्त झालेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल. जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे बँक खातेबाबतची माहिती भरणे बंधनकारक आहे. तसेच याबाबतची सर्वच जवाबदारी संबंधित पालक व मुख्याधापक यांची असेल.

NMMS Scholarship  Cut Off 2021

सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित खाली नमूद केल्याप्रमाणे गुण मिळणे आवश्यक आहेत –

अ. क्र. माध्यम बौद्धिक क्षमता चाचणी (MAT) प्रश्न संख्या शालेय क्षमता चाचणी (SAT) प्रश्न संख्या एकूण गुण पात्रता गुण
General/VJ/NTB/NTC/
NTD/OBC/SBC
SC/ST व दिव्यंगत्वासाठी
१) मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, सिंधी, तेलगू, कन्नड 90 90 180 ४०% ३२%
२) इंग्रजी 90 89 179
  1. SAT विषयातील इंग्रजी माध्यमाचा प्रश्न क्र. ७९ हा रद्द झाल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ९० च्या प्रमाणात गुण देण्यात आले आहेत

NATIONAL MEANS cum MERIT SCHOLARSHIP EXAMINATION 2020-21- Result

Leave a Comment