Advertisement

Paytm Money Pune Recruitment 2021

खुशखबर ! Paytm देणार 20 हजार अंडर ग्रॅज्युएट्सना नोकरी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Paytm Job Vacancy 2021 – Paytm Jobs 2021, the country’s largest digital payment solution company, is all set to launch an IPO worth Rs 16,600 crore before Diwali. It is said to be the largest IPO to date. The company is fully prepared before the IPO. For this, Paytm is considering increasing the number of its employees. Accordingly, 20,000 youth (Paytm jobs 2021) will be recruited in Paytm.

Paytm Job Vacancy 2021

देशातील सर्वात मोठी डिजीटल पेमेंट सोल्यूशन कंपनी (Digital payment Solution Company) पेटीएम (Paytm jobs 2021) दिवाळीपूर्वी तब्बल 16,600 कोटी रुपयांचा आयपीओ (IPO) आणणार आहे. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असल्याचे बोलले जात आहे. आयपीओ आणण्यापूर्वी कंपनी पूर्णपणे तयारी करत आहे. यासाठी पेटीएम आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे. त्यानुसार पेटीएममध्ये 20 हजार तरुणांची (Paytm jobs 2021) पदभरती केली जाणार आहे.

या पदासाठी होणार भरती 

पेटीएम 20 हजार फिल्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह (field sales executives) नेमणूक करण्याचा विचार करत आहे. फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह व्यापारी आणि यूजर्सना डिजिटल सेवांचं शिक्षण देतील आणि कंपनीच्या विविध डिजिटल उत्पादनांचा प्रचार (Promoting digital products) करतील. त्यामुळे यासाठी टेक्नॉलॉजी (Technology) समजणाऱ्या तरुणांची गरज कंपनीला आहे.

कोण करु शकतो अर्ज

ज्या उमेदवारांचे वय 18 वर्षे पूर्ण आहे आणि 10 वी, 12 वी किंवा पदवीधर आहेत असे उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. इच्छुक उमेदवार अँड्रॉइड स्मार्टफोनमधून पेटीएम अ‍ॅप वापरुन अर्ज करु शकतात. ज्या उमेदवारांकडे दुचाकी आहे अशांना प्राधान्य दिलं जाणार आहे. अर्जदारांना स्थानिक भाषा आणि प्रदेशाची चांगली माहिती असणे आवश्यक आहे.

एवढी मिळणार सॅलरी

निवड झालेल्या फिल्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह यांना दरमहा 35 हजार रुपये पगार असणार आहे. पेटीएमने पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एफएसई कार्यक्रम सुरु केले आहे. यानुसार लवकरच ही भरती होणार आहे.


महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी !! “या” नामवंत कंपनीत होणार २५० इंजिनियर्स आणि डेटा सायन्टिस्टची भरती

Paytm Money Pune Recruitment 2021Paytm Money an Online investment platform has recently set up a new R&D facility in Pune, Maharashtra. And and plans to hire over 250 engineers and data scientists at the facility. Read More details on Paytm Money Pune Recruitment 2021 at below:

“We are very excited to launch our Pune R&D centre and looking forward to developing new wealth management products and disruptions in Pune. We continue our vision to leverage technology to lower costs for our consumers and provide a solid, innovative and stable platform,” Paytm Money’s Chief Executive Officer Varun Sridhar said. “We believe Pune is poised to become an innovation hub for fintech and was a natural choice for Paytm Money’s expansion plans.”

 २५० इंजिनियर्स आणि डेटा सायन्टिस्टची भरती

Paytm Money Pune Bharti  2021- पेटीएम मनी ही आघाडीची डिजिटल कंपनी तंत्रज्ञान विकासासाठी आणि इनोव्हेशनसाठी पुण्यात एक केंद्र उभारले आहे.  या संशोधन केंद्रात काम करण्यासाठी कंपनीला इंजिनियर आणि डेटा सायन्टिस्टची (engineers and data scientists) गरज आहे. त्यासाठी पेटीएम मनी २५० इंजिनियर्स आणि डेटा सायन्टिस्टची भरती करणार आहे. महाराष्ट्रातील आणि विशेषत: पुण्यातील इंजिनियर आणि डेटा सायन्सच्या क्षेत्रात कार्यरत तरुणांना याचा मोठा लाभ होणार आहे

कंपनीचे धोरण

‘आम्हाला पुण्यात नवे संशोधन केंद्र कार्यरत करायचे आहे. या संशोधन केंद्राच्या माध्यमातून कंपनी नवे आर्थिक आणि गुंतवणूक विषयक सेवांचे व्यवस्थापन पुण्यात करणार आहे. तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे ग्राहकांवरील खर्चाचा बोझा कमी करत स्थिर, मजबूत आणि नाविन्यपूर्ण व्यासपीठ पुरवण्याच्या आमच्या धोरणाचाच हा एक विस्तार असणार आहे’, असे मत पेटीएम मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण श्रीधर यांनी व्यक्त केले आहे. फिनटेक क्षेत्रासाठी पुणे हे नवे इनोव्हेशन केंद्र म्हणून पुढे येईल अशी आमची खात्री आहे. त्यामुळेच पेटीएम मनीच्या विस्ताराच्या योजनेसाठी पुणे ही आमची नैसर्गिक निवड होती, असेही ते पुढे म्हणाले.

छोट्या शहरांवर लक्ष

पेटीएमने मोसमातील नव्या ग्राहकांसाठी आणि गुंतवणुकदारांना केंद्रस्थानी ठेवत नव्या सेवा आणि उत्पादने बाजारात आणली आहेत. चालू आर्थिक वर्षात एक कोटी ग्राहक आणि दरवर्षी ७.५ कोटी ट्रॅन्झॅक्शनचा पल्ला गाठण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीचे बहुसंख्य ग्राहक हे छोटे शहरांमधील आहेत. गुंतवणूक आणि संपत्ती निर्मितीशी निगडीत सेवा आणि योजनांबद्दल देशातील जवळपास दहा लाख ग्राहकांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून जागृती निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

सरकारी भरती संदर्भातील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी  येथे क्लिक करून लगेच व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा .

Leave a Comment