PMC पुणे महानगरपालिकेत पद भरती !

PMC पुणे महानगरपालिकेत पद भरती !

PMC Recruitment 2024 :

पुणे महानगरपालिकेमध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पात्र उमेदवारास 64 हजार रुपये ते 1 लाख 85 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया ऑफलाईन असणार आहे. अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया होणार आहे. या भरतीप्रक्रियेची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. विविध पदानुसार या भरतीप्रक्रियेच्या मुलाखती दिनांक 9 ऑगस्ट, 23 ऑगस्ट, 30 ऑगस्ट रोजी होणार आहेत.

पदे आणि जागा

  • प्राध्यापक – 04 जागा
  • सहयोगी प्राध्यापक – 10 जागा
  • सहाय्यक प्राध्यापक – 14 जागा
  • वरिष्ठ निवासी – 13 जागा
  • ट्यूटर/डेमॉन्स्ट्रेटर – 01 जागा
  • कनिष्ठ निवासी – 04 जागा

शैक्षणिक पात्रता

विविध पदानुसार या भरतीप्रक्रियेची शैक्षणिक पात्रता आहे. जाहीरातीमध्ये सविस्तर माहिती दिली गेली आहे.

वयोमर्यादा

  • प्रोफेसर पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी 50 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी 55 वर्षे,
  • असोसिएट प्रोफेसर साठी खुला प्रवर्ग 45 वर्ष राखीव प्रवर्ग 50 वर्षे,
  • असिस्टंट प्रोफेसर साठी खुला प्रवर्ग 40 वर्ष मागास प्रवर्ग 45 वर्ष,
  • वरिष्ठ निवासी पदांसाठी जास्तीत जास्त 45 वर्ष,
  • कनिष्ठ निवासी व ट्यूटर साठी खुला प्रवर्ग 38 वर्ष मागास प्रवर्ग 43 वर्ष.

अर्जप्रक्रिया

  • जाहिरातीमध्ये दिलेला अर्ज फॉर्म भरायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावे.
  • भरलेल्या अर्जासोबत दोन तास अगोदर मुलाखतीसाठी नियोजित ठिकाणी पोहचणे आवश्यक आहे.

मुलाखतीची वेळ :

वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी तसेच ट्यूटर या पदासाठी 09 ऑगस्ट 2024, 23 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट 2024 सकाळी 11 वाजता मुलाखत घेण्यात येईल.

प्रोफेसर,असोसिएट प्रोफेसर,असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी – 09 ऑगस्ट 2024, 23 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता मुलाखत घेण्यात येईल.

 

मुलाखतीचे ठिकाण : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मंगळवार पेठ, पुणे

 

 

Leave a Comment