अजित पवार यांची घोषणा पोलिस शिपयांची १७००० आणि आंगणवाड़ी सेविकांची १४००० जागांची भर्ती होणार

अजित पवार यांची घोषणा पोलिस शिपयांची १७००० आणि आंगणवाड़ी सेविकांची १४००० जागांची भर्ती होणार : 

महाराष्ट्रात २०२४ या वर्षी  पोलिस शिपायांची 17 हजार 471 पदे आणि अंगणवाडी सेविकांची 14 हजार पदे भरण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. महारष्ट्रातील तरुणांसाठी सुवर्णसंधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प आज मांडला. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी विविध घोषणा केल्या. यामध्ये राज्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच दवोसमध्ये 19 कंपन्यांबरोबर करार झाले असून त्यांचा राज्याला मोठा फायदा होईल, असंही पवार यांनी सांगितलं. (Maharashtra Interim Budget 2024 )
तसेच महाराष्ट्रात येत्या काळात पोलिस शिपायांची 17 हजार 471 पदे भरण्यात येणार आहेत. याबरोबरच अंगणवाडी सेविकांची 14 हजार पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. यामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

 

Leave a Comment