Postal Vima Pratinidhi Bharti – टपाल विभागाच्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची थेट नेमणूक केली जाणार आहे. यासाठीच्या मुलाखती 7 डिसेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. अशी माहिती अहमदनगर विभाग डाकघरचे वरिष्ठ अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
किमान इयत्ता 12 वी पास असलेले, कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी , माजी जीवन सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, स्वयंसेवी संघटना चालक, माजी सैनिक, निवृत्त शिक्षक, बेरोजगार किंवा स्वयंरोजगार असणारे 18 ते 60 वर्षं वयोगटातील उमेदवार मुलाखतीस उपस्थित राहू शकतात. वरिष्ठ अधीक्षक डाकघर, अहमदनगर विभाग, अहमदनगर- 414001 यांच्या कार्यालयात सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजण्याच्या कालावधीत मुलाखती होणार आहेत.
इच्छुक उमेदवारांना विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असणे अपेक्षित आहे. उमेदवारावर कोणताही गुन्हा दाखल नसावा. निवड ही इयत्ता 12 वी च्या गुणांवर तसेच उच्च शैक्षणिक पात्रता व मुलाखतीत मिळालेल्या गुणावर केली जाईल.
: : महत्वपूर्ण नवीन जाहिराती : :
✅राष्ट्रीय सहकारी बँक लि, मुंबई अंतर्गत ग्रॅजुएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी; ऑनलाइन अर्ज करा
✅१० वी उत्तीर्णास संधी - भारतीय डाक विभागांतर्गत 38920+ पदांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज सुरु
✅राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा येथे 110+ पदांवर भरती; नवीन जाहिरात
✅10वी, 12वी उमेदवारांना सैन्य कल्याण शिक्षण संस्था HQ दक्षिणी कमांड पुणे अंतर्गत नोकरीची संधी
✅ महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती, नवीन जाहिरात
मुलाखतीस येताना जन्म तारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रता, आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो, ई-मेल आयडी व इतर आवश्यक कागदपत्रे तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्याबाबतची कागदपत्रे घेऊन यावीत. असे आवाहन ही अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.