11th Admission Online Process2021

11th Admission Online Process2021- कोरोनाच्या संकटकाळात राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक मंडळाकडून इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत (Eleventh Admission online process)काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले होते. त्यानंतर तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्या राबवण्याचा हजारो विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाकडून निर्णय घेण्यात आला. परंतु अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्या राबवल्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, यासाठी बुधवारपासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबवण्यात येणार आहे. (‘First come first served’ round; Another chance for the 11th admission entry)

आतापर्यंतच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये महाविद्यालय अलॉट न झालेले, मिळालेला प्रवेश रद्द केलेले, प्रवेश नाकारलेले तसेच दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण, दहावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी असलेले विद्यार्थी या फेरीत प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी ही अकरावी प्रवेशाची अखेरची फेरी असणार आहे. या फेरीनंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात येणार नाही, असे आवाहनही शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी केले आहे. तसेच 29 जानेवारीपासून एटीकेटी आणि फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. मुंबई विभागात अकरावीच्या एकूण 3,20,390 जागा असून, या प्रवेशानंतर 1 लाख 24 हजार 254 जागा रिक्त आहेत.

आतापर्यंत झालेले प्रवेश

कला- 19,346
वाणिज्य- 1,11,211
विज्ञान- 63,300
एचएसव्हीसी- 2279
एकूण – 1, 96,136

प्रवेशाचे वेळापत्रक

13 जानेवारी 90 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश
13 ते 15 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश गेणे
15 जानेवारी- रिक्त जागा जाहीर
16 जानेवारी 80 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश
16 ते 18 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे
18 जानेवारी- रिक्त जागा जाहीर
18 जानेवारी 79 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश
19 ते 20 जानेवारी- महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेणे
20 जानेवारी- रिक्त जागा जाहीर
21 जानेवारी- 60 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश
21 ते 22 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश गेणे
22 जानेवारी- रिक्त जागा जाहीर
23 जानेवारी- 50 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश
22 ते 25 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे
25 जानेवारी- रिक्त जागा जाहीर
27 जानेवारी- उत्तीर्ण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश
27 ते 28 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे
28 जानेवारी- रिक्त जागा जाहीर

सौर्स

टीव्ही 9


Pune 11th Admission First Merti List 2020 & Cut Off List 2020 – Pune FYJC 11th Admission First Merit List, Selection list & Cut off will be available Soon, which will be declared by respective departments. Candidates shroud Check the given links & Track their status. More Details are given below. The expected time is 15.00. The official website is pune.11thadmission.org.in

Cut Off 11th Admission 2020

Cutoff For 2020, Details & updates are given below. Read all details carefully & go through given respective Links.

बहुप्रतीक्षेत असलेल्या अकरावी प्रवेशाच्या नियमित पहिल्या फेरीतील प्रवेशाची गुणवत्ता यादी रविवारी (ता.३०) दुपारी तीन वाजता प्रसिद्ध होणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये प्रवेशासाठी मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिसणार आहे. तसेच नियमित प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील महाविद्यालयांचा कट-ऑफ देखील कळू शकणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील एक लाख सहा हजार ७७५ जागांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यातील जवळपास सहा हजार २२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश कोट्याअंतर्गत निश्चित झाले आहेत. आता अकरावी प्रवेशासाठी एक लाख ५४८ जागा उपलब्ध असून त्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत ९८ हजार ९४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील ८१ हजार ६८७ विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक झाले आहेत. तर ८१ हजार २५१ विद्यार्थ्यांचे अर्ज व्हेरिफाय करण्यात आले आहेत. सुमारे ७३ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी दिलेले पर्याय निवडले आहे. या प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी रविवारी जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष या यादीकडे लागले आहे.

अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकातील महत्त्वाचे मुद्दे :

कालावधी : कार्यवाहीचा तपशील
३० ऑगस्ट २०२० (दुपारी तीन वाजता) : नियमित प्रवेश फेरी
– प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.
– विद्यार्थी लॉगिनमध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालय दर्शविणे.
– संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालय यास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉगिनमध्ये दर्शविणे.
– विद्यार्थ्यांना याबाबत मोबाईल संदेश पाठविणे.
– पहिल्या नियमित प्रवेश फेरीचे कट-ऑफ संकेतस्थळावर दर्शविणे.

अकरावी प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :
https://pune.11thadmission.org.in

1 thought on “11th Admission Online Process2021”

Leave a Comment