Pune Dak Vibhag Bharti 2021

पुणे टपाल जीवन विमा एजंट (अभिकर्ता) नियुक्तीसाठी ७ सप्टेंबर रोजी मुलाखती

Pune Dak Vibhag Bharti 2021 – An interview has been arranged for the appointment of Postal Life Insurance Agent on 7th September at 10 am. Interested candidates should be present at Superintendent Post Office, Pune Rural Division, Shivajinagar Post Office Building, Jangli Maharaj Road, Pune along with educational certificate, PAN card, Aadhar card and other relevant documents, appealed Pune Rural Division Post Office. More information about Pune Dak Vibhag Bharti 2021 are as given below

Pune Dak Vibhag Bharti 2021

टपाल जीवन विमा एजंट (अभिकर्ता) नियुक्तीसाठी ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग, शिवाजीनगर पोस्ट ऑफिस इमारत, जंगली महाराज रस्ता, पुणे या पत्त्यावर शैक्षणिक प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्डसह अन्य संबंधित कागदपत्रांसमवेत उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.

काय पात्रता असेल ?

उमेदवाराची वयोमर्यादा कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ५० वर्षे असावी. दहावी, बारावी उत्तीर्ण, विमा क्षेत्राबाबतची माहिती असणे आवश्यक आहे. बेरोजगार, स्वयंरोजगार व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, निवृत्त शिक्षक, स्वयंसहायता समूह पदाधिकारी टपाल जीवन विमा एजंटसाठी पात्र असतील.

नियुक्तीनंतर टपाल विभागाने निर्धारित केलेले कमिशन प्रोत्साहन भत्ता नियमितपणे देण्यात येईल. परवाना परीक्षा आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर परवाना देण्यात येईल. नियुक्त उमेदवारांना परवाना देण्यासाठी २५० रुपये आणि परवाना परीक्षेसाठी २८५ रुपये शुल्क राहील. तसेच, पाच हजार रुपये टपाल बचत बँक खात्यामध्ये राष्ट्रपतींच्या नावे तारण म्हणून ठेवणे बंधनकारक आहे. मुलाखतीसाठी सकाळी १० ते सायंकाळी चार वाजेपर्यंत वेळ असेल. अधिक माहितीसाठी व्ही. एस. देशपांडे यांच्याशी (मोबाईल क्र. ९४२०९६५१२२) संपर्क साधावा.

Leave a Comment