पंजाब पोलीस हवालदार भरती जाणून घ्या पात्रता, वय आणि निवड-प्रक्रिया

पंजाब पोलीस हवालदार भरती जाणून घ्या पात्रता, वय आणि निवड-प्रक्रिया

Punjab Police Constable Recruitment 2024 : पंजाब पोलीस भरती मंडळाने जिल्ह्यातील हवालदार आणि पंजाब पोलिसांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया १४ मार्चपासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ४ एप्रिल असणार आहे .

आजकाल नोकरी शोधण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. लोक विविध करिअर गाईडन्स वेबसाइट्स, अ‍ॅप्स आणि ग्रुप्सद्वारे स्वतःसाठी सर्वोत्तम नोकरी शोधत असतात. कॉलेज पासआउट्सनाही कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकऱ्या मिळतात. तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. पंजाब पोलीस भरती मंडळाने जिल्ह्यातील हवालदार आणि पंजाब पोलिसांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया १४ मार्चपासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ४ एप्रिल असणार आहे. इच्छुक उमेदवार http://www.punjabpolice.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.तत्पूर्वी ही नोकरी नेमकी कोणत्या पदासाठी तसेच यासाठी शैक्षणिक व अनुभवाच्या पात्रतेचे निकष काय आहेत हे आपण जाणून घेऊयात.

पंजाब पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 रिक्त जागा तपशील:  पंजाब पोलीस १७४६ पोलीस कॉन्स्टेबल पदे भरण्यासाठी भरती मोहीम राबवत आहे, त्यापैकी ९७० जिल्हा पोलीस संवर्गात आहेत आणि ७७६ सशस्त्र पोलीस संवर्गात आहेत.

पंजाब पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 वयोमर्यादा : उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि उमेदवारांचे कमाल वय २८ वर्षे असावे.

पंजाब पोलीस कॉन्स्टेबल भर्ती 2024 शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळ/विद्यापीठातून किमान १२वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

पंजाब पोलीस कॉन्स्टेबल भर्ती 2024 निवड प्रक्रिया: निवडीचे तीन टप्पे असतील.

पहिला टप्पा – यामध्ये संगणकावर आधारित आणि MCQ प्रकारचे पेपर असतील.

दुसरा टप्पा – दुसऱ्या टप्प्यात फिजिकल मेजरमेंट टेस्ट आणि फिजिकल स्क्रीनिंग टेस्ट असेल.

तिसरा टप्पा – तिसऱ्या टप्प्यात कागदपत्र तपासणीचा समावेश असेल.

इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लवकरात लवकर अर्ज करावा.

 

 

Leave a Comment