राजस्थान स्टाफ सेलेक्शन बोर्ड भरती सुरु

राजस्थान स्टाफ सेलेक्शन बोर्ड भरती सुरु

RSMSSB Recruitment 2024 : सरकारी नोकरी हवीये? मग आता नो टेन्शन. थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. इच्छुक उमेदवारांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया ६७९ पदांसाठी पार पडत आहे. खरोखरच ही मोठी सुवर्णसंधीच आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.

राजस्थान स्टाफ सेलेक्शन बोर्डकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. अर्जाची प्रक्रिया ७ मार्चपासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ५ एप्रिल २०२४ आहे. इच्छुक उमेदवार rsmssb.rajasthan.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पदे: ही भरती कार्यशाळा गणना आणि विज्ञान कनिष्ठ प्रशिक्षक, अभियांत्रिकी रेखाचित्र कनिष्ठ प्रशिक्षक, कॉम्प्युटर लॅब/आयटी लॅब कनिष्ठ प्रशिक्षक , रोजगार कौशल्यकनिष्ठ प्रशिक्षकांसाठी असेल.

 वयोमर्यादा: या भरती प्रक्रियेसाठी २१ ते ४० वयापर्यंतचे उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क: या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला सामान्य श्रेणी, BC (क्रिमी लेयर) आणि EBC (क्रिमी लेयर) मधील उमेदवारांनी ६०० रु. फी भरणे आवश्यक आहे. BC (नॉन-क्रिमी लेयर), EBC (नॉन-क्रिमी लेयर), EWS, SC, ST आणि PwD श्रेणीतील उमेदवारांना ₹४०० रु फी भरावी लागेल.

 

Leave a Comment