RTMNU Professor Recruitment 2021

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे प्राध्यापक पदाची भरती

RTMNU Professor Recruitment 2021 –  Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University is hiring candidates for the post of Professor. There is a total of 01 vacant posts to be filled under RTMNU Jobs 2021. Candidates who are interested to apply here must send their application offline at mentioned address. Applications must reach on or before 3rd January 2022 to given postal address. Additional details about RTMNU Bharti 2021, RTMNU Bharti 2021-22, RTMNU Vacancy 2021, RTMNU Recruitment 2021, are as given below …..

RTMNU Bharti 2021 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “प्राध्यापक” पदाच्या 01 रिक्त जागेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे.  इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव प्राध्यापक
 • पद संख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – refer PDF
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 जानेवारी 2022
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Registrar, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Fule Educational Campus, Ambazari Road, Nagpur – 440033
 • अधिकृत वेबसाईट – www.nagpuruniversity.ac.in

Application Details For RTMNU Job 2021 :

 • Candidates Apply offline mode for RTMNU Bharti 2021
 • Interested candidates send your application to the given address
 • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
 • Applicants apply before the last date
 • Last date –3rd January 2022.
 • Application Address – Given Above

रिक्त पदांचा तपशील –RTMNU Vacancy 2021

Sr. No Name of Post No. of Post
01 Professor 01

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RTMNU Professor Bharti 2021

अर्ज नमूना
☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

RTMNU Assistant Professor Recruitment 2021 – The appointment of teachers on contract basis in the academic departments of Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University has been affected by administrative slowness along with ‘corona’. Admission process in postgraduate departments is underway and academic classes will start soon. Many teachers in the departments have retired and the departments will definitely face shortage of teachers. The question of why the recruitment process has not started yet is also being asked by the departments along with the aspiring candidates. Read below Article On RTMNU Assistant Professor Recruitment 2021..

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीवर शिक्षकांच्या नियुक्तीला ‘कोरोना’सह प्रशासकीय संथपणाचादेखील फटका बसतो आहे. पदव्युत्तर विभागांतील प्रवेशप्रक्रिया सुरू असून लवकरच शैक्षणिक वर्ग सुरू होणार आहेत. विभागांतील अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले असून विभागांना शिक्षकांची कमतरता निश्चितच भासणार आहे. अद्यापपर्यंत भरती प्रक्रिया का सुरू झालेली नाही असा प्रश्न इच्छुक उमेदवारांसह विभागांकडूनदेखील विचारण्यात येत आहे.

विद्यापीठाच्या जवळपास सर्वच पदव्युत्तर विभागांमध्ये पूर्णकालीन शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठान दोन वर्षांअगोदर कंत्राटी पदे भरण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी विद्यापीठाने विविध विभागांत १०४ कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती केली होती.

यंदा कंत्राटी शिक्षक भरतीचे हे तिसरे वर्ष असणार आहे. ‘कोरोना’मुळे यंदा ‘ऑनलाईन’ वर्ग घेण्यात आले व तृतीय सत्राचा अभ्यासक्रम जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. आता पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पहिल्या सत्राची प्रवेशप्रक्रिया सुरू असून जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात वर्गांना सुरुवात होईल. ‘ऑनलाईन’ वर्ग जरी सुरू झाले तरी शिक्षकांची कमतरता भासणार आहे. त्यामुळे कंत्राटी शिक्षक कधी भरणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना फटका बसण्याची चिन्हे

कंत्राटी पदभरतीसंदर्भातील प्रस्ताव अधिष्ठाता मंडळाकडून व्यवस्थापन परिषदेकडे जाईल. तेथून मंजुरी मिळाल्यानंतर लगेच प्रक्रियेला सुरुवात होईल. त्यानंतर उमेदवारांकडून अर्ज मागविणे, मुलाखती यासाठी महिनाभराचा कालावधी जाईल. त्यामुळे वर्ग सुरू झाल्यानंतरदेखील कंत्राटी शिक्षकांसाठी प्रतीक्षाच करावी लागण्याची चिन्हे आहेत.

यंदा कमी लोकांची भरती

‘कोरोना’मुळे पदव्युत्तर विभागांमध्ये ‘ऑनलाईन’ वर्ग घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यातही प्रात्यक्षिकांबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे यंदा कमी लोकांची भरती होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांना संपर्क केला असता प्रक्रिया सुरू असून लवकरच जाहिरात काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सौर्स –

लोकमत

Leave a Comment