Satara 11th admission Online Application Forms

Satara 11th admission Online Application Forms : This year Satara District is carrying the online application process for the 11th Admission 2020 – 2021. Large number of students will take benefit of this online registration process. The Online registration Process will begin from 14th August 2020. For 11th (FYJC) Admission there are 51060 seats are there. There are Some well known collages in satara are yc college, Satara, dg college, lbs college, sayajirao college, satara sainik school admission for 11th class. More updates are details are given below.

इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रियेस सातारा जिल्ह्यात 14 ऑगस्टपासून प्रारंभ होत असून पालक आणि विद्यार्थ्यांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. काेराेनाच्या पार्श्वभुमीवर यंदाची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असेल. जेथे आॅनलाईन पद्धतीने करणे शक्य नाही तेथेच आॅफलाईन पद्धतीने प्रक्रिया हाेईल असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.

सातारा जिल्ह्यात अनुदानित प्रकारात कला शाखेसाठी 15460, वाणिज्य 7080, विज्ञान 11200, संयुक्त 3000 तसेच व्यवसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) 800 जागा आहेत. विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित प्रकारात कला शाखेसाठी 3360, वाणिज्य 1120, विज्ञान 3840, संयुक्त 240 तसेच व्यवसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) 400 जागा आहेत. याबराेबरच स्वयंअर्थसायित्ता प्रकारात कला शाखेसाठी 240, वाणिज्य 880, विज्ञान 3040, संयुक्त 400 जागा आहेत.

Required Documents For 11th Admission 2020

Required Documents

यंदा सातारा जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या परिक्षेत 41 हजार 018 विद्यार्थी पास झाले आहेत. सातारा जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी 51 हजार 060 इतक्या जागा आहेत. अकरावी प्रवेशासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी संकेतस्थळ, लिंक याची व्यवस्था करावी. जेथे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविणे शक्‍य होणार नाही तेथे सोशल डिस्टन्सिंग सांभाळून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत, अशीही सूचना केल्याचे क्षीरसागर यांनी नमूद केले.

त्यानंतर 26, 28, 29 आणि 31 या काालवधीत गुणवत्तेनूसार निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश शिल्लक असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्राच्या आधारे दोन व तीन सप्टेंबर रोजी प्रवेश द्यावा. चार व पाच सप्टेंबर रोजी दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. रिक्त राहिलेल्या जागांवर एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना सात व आठ सप्टेंबरला प्रवेश द्यावा असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment