Shikshak Bharti 2022

राज्यात शिक्षकांची तब्बल 5 हजार रिक्त पदे लवकरच भरली जाणार..

Shikshak Bharti 2022 – Recruitment of teachers has been pending in the state for the last 10 years by issuing various orders at the government level to fill the vacancies of teachers. Due to the denial of permission by the government to fill these vacancies, students are studying and taking exams in the absence of teachers. This is having adverse effect on the academic future of the students. Prakash did not feel the shortage of teachers due to corona teaching online for the last two years, but due to lack of teachers for the last two months, the class has been vacant. Mukund Andhalkar said.

उच्च माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षक अतिरिक्त नसतानाही गेली दहा वर्षे सातत्याने भरतीसाठी विलंब केला जात आहे. परिणामी राज्यात पाच हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. राज्य सरकारने शिक्षकांची ही रिक्त पदे त्वरित भरावीत, ही शिक्षक भरती प्रक्रिया उन्हाळ्याच्या सुटीत पूर्ण करावी, जेणेकरून येत्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयांमध्ये शिक्षक उपलब्ध होऊ शकतील, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे.

शिक्षक भरती जाहिरात

राज्यात गेली १० वर्षे शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शासन स्तरावर वेगवेगळे आदेश देऊन शिक्षकांची भरती प्रलंबित राहत आहे.प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात काही शिक्षक अतिरिक्त असले तरी उच्च माध्यमिक शिक्षण विभागात मात्र पाच हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शासनाने या जागांवर शिक्षक भरण्यासाठी परवानगी नाकारल्यामुळे शिक्षकांच्या अनुपस्थितीत विद्यार्थी अभ्यास करून परीक्षा देत आहेत.त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होत आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापन करावे लागल्यामुळे शिक्षकांची कमतरता प्रकर्षाने जाणवली नाही, परंतु गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षक नसल्यामुळे वर्ग रिकामे असल्याचे महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.

प्रा. आंधळकर म्हणाले,‘‘बोर्डाचे पेपर तपासणीसाठी शिक्षक पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्याने शिक्षकांना जास्त उत्तरपत्रिका तपासाव्या लागल्या आहेत. दरम्यान, शासनाने ‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षकांची भरती करण्याचे कार्य सुरू केले होते, परंतु ही प्रक्रिया देखील थांबली. त्यामुळे आता राज्य सरकारने शिक्षकांच्या किती जागा रिक्त आहेत, याची त्वरित माहिती घ्यावी आणि उन्हाळ्याच्या सुटीत शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी.’’ कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक भरती प्रक्रिया त्वरित राबविण्याच्या मागणीचे निवेदन महासंघातर्फे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना देण्यात आले आहे.


राज्यात प्राध्यापकांची तब्बल १७ हजार रिक्त पदे कधी भरली जाणार..

Shikshak Bharti 2022 :Although the state government has approved to fill 2,088 Professor Recruitment in the subsidized non-agricultural colleges, it has come to light that there are more than 1,500 vacancies in non-agricultural government universities. Even after a lapse of four and a half years, the process of recruitment of professors has not moved forward and the number of vacancies has reached 17,000 as the government has not given full approval to the October 1, 2017 format.

राज्य सरकारने अनुदानित अकृषी महाविद्यालयांमध्ये दोन हजार ८८ प्राध्यापकांची पदे भरण्यास मान्यता दिली असली, तरी अकृषी सरकारी विद्यापीठांमध्ये एक हजार ५०० पेक्षा अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. साडेचार वर्षांच्या कालावधी उलटून गेल्यानंतरही सरकारने एक ऑक्टोबर २०१७ च्या आकृतिबंधाला पूर्ण मान्यता न दिल्याने प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पुढे सरकत नसून, रिक्त पदांची संख्या १७ हजारांपर्यंत पोहोचली आहे.

Professor Recruitment

राज्यातील प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयासमोर राज्यातील पात्रताधारक उमेदवारांनी सलग ६० दिवस आंदोलन केले. त्यानंतर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सरकारने ४० टक्के रिक्त जागा म्हणजे दोन हजार ८८ जागा भरण्याला मान्यता दिली. त्याबाबतचे राजपत्र नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. या भरतीबाबत तातडीने कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याने, त्रासलेल्या पात्रताधारक उमेदवारांनी सोमवारी एक दिवसीय आंदोलन केले. त्याचप्रमाणे भरती प्रक्रियेला तातडीने सुरुवात न केल्यास चार जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने उच्च शिक्षण संचालनालयाला दिला आहे. राज्यात सध्याची प्राध्यापक भरती एक ऑक्टोबर २०१७ च्या आकृतिबंधानुसार होत आहे. मात्र, साडेचार वर्षांच्या कालावधी उलटून गेल्यानंतरही सरकारने अंतिम मान्यता दिलेली नाही. या कारणामुळे सरकारला अनुदानित महाविद्यालयांमध्ये एक ऑक्टोबर २०१७ नंतर सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरता येत नसल्याचे चित्र आहे.

‘राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये एक हजार ५७२ प्राध्यापकांची पदे रिक्त आहे. सरकारच्या निर्णयानुसार ४० टक्के रिक्त जागा म्हणजे ६२९ प्राध्यापकांची पदे भरण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेण्यात येईल,’ असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले होते. मात्र, त्याची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. गेल्या साडेचार वर्षांत विद्यापीठांमधील साधारण ५०० प्राध्यापक सेवानिवृत्त झाले. त्यामुळे या जागांची भर रिक्त जागांमध्ये पडली आहे. या जागा भरण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विद्यापीठांच्या शैक्षणिक विभागांमध्ये प्राध्यापक नाहीत, अशी परिस्थिती आहे.

राज्यातील अकृषी महाविद्यालयांमध्ये ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक अशी साधारण ३०२ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी पात्रताधारकांच्या शिष्टमंडळाला दिले होते. मात्र, याबाबतही कोणताही निर्णय न झाल्याने ही पदे रिक्तच राहणार असल्याचे चित्र आहे. गेल्या साडेचार वर्षांत सरकारी विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये अनेक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक अशी साधारण १७ हजार पदे रिक्त असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

प्राध्यापक भरतीच्या आकृतिबंधाला साडेचार वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही पूर्ण मान्यता मिळत नाही. त्याचप्रमाणे डॉ. धनराज माने समितीचा अहवाल स्वीकारल्या जात नाही. त्यामुळे प्राध्यापक भरतीबाबत राज्य सरकार पात्रताधारकांची फसवणूक करीत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने तातडीने १०० टक्के प्राध्यापक भरतीबाबत निर्णय घ्यावा.


जाणून घ्या अनुदानित महाविद्यालयातील रिक्त पदे कधी भरली जाणार..

Shikshak Bharti 2022 : On 11th April (Monday)  in front of the office of the Director of Education one-day symbolic fast will be held for various demands including non-commencement of recruitment of Assistant Professors in non-agricultural universities, non-implementation as per the decision regarding professors on Tasika principle, giving grants to subsidized units by Sandeep Pathrikar and Secretary Dr. Given by Maroti Deshmukh.

Major demands by the candidates  are Recruitment of Assistant Professor in Non-Agricultural University should be started immediately. All vacancies till December 2021 should be filled by approving the figure of October 2017. The report of the committee set up on the policy of professors on Tasika principle should be accepted and implemented. Unsubsidized pieces should be subsidized immediately. Salary increase for Assistant Professors after 2016 should be implemented immediately

अकृषी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदभरती सुरू न होणे, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांबाबतच्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी न होणे, विनाअनुदानित तुकड्यांना अनुदान देणे यांसह विविध मागण्यासाठी येत्या सोमवारी (ता.११) शिक्षण संचालक कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाथ्रीकर आणि सचिव डॉ. मारोती देशमुख यांनी दिला आहे.

राज्यातील सुमारे एक हजार १७१ अनुदानित महाविद्यालयांमध्ये १ ऑक्टोबर २०१७च्या विद्यार्थी संख्येनुसार प्राध्यापक पदभरतीला ४० टक्के नुसार दोन हजार ८८ जागांची भरती करण्यात १२ नोव्हेंबर २०२१ मध्ये मान्यता देण्यात आली. पदभरतीतील आरक्षणासंदर्भात २८ डिसेंबर २०२१ रोजी संवर्गनिहाय आरक्षण विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. परंतु याबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. तसेच पद भरतीला परवानगी देताना शिक्षण संचालक, ग्रंथपाल तसेच विद्यापीठातील शैक्षणिक विभागातील सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता न दिल्याने पात्रता धारकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • अकृषी विद्यापीठातील सहायक प्राध्यापक पदभरती त्वरित सुरू करावी.
  • ऑक्टोबर २०१७च्या आकृतिबंधाला मान्यता देऊन डिसेंबर २०२१ पर्यंतची सर्व रिक्त पदे भरावीत.
  • तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या धोरणाबाबत स्थापन केलेल्या समितीचा अहवाल स्वीकारून अंमलबजावणी करावी.
  • विनाअनुदानित तुकड्यांना त्वरित अनुदान द्यावे.
  • २०१६ नंतरच्या सहाय्यक प्राध्यापकांना वेतनवाढ तत्काळ लागू करावी

नरखेड तालुक्यातील शिक्षकांची इतकी पदे रिक्त !!

Shikshak Bharti 2022 (शिक्षक भरती जाहिरात) : There are a total of 115 schools in Narkhed taluka with 78 primary and 35 upper primary schools of Zilla Parishad. While 342 posts of headmaster, assistant and subject teachers have been sanctioned, 312 teachers are working here. 30 posts are vacant. When will these posts be filled? Learn the details

नरखेड तालुक्यात जिल्ह्या परिषदेच्या ७८ प्राथमिक तर ३५ उच्च प्राथमिक शाळा अशा एकूण ११५ शाळा आहेत. येथे मुख्याध्यापकासह, सहायक व विषय शिक्षकांची ३४२ पदे मंजूर असताना ३१२ शिक्षक कार्यरत आहे. ३० पदे रिक्त आहे. ही पदे कधी भरणार ? जाणून घ्या सविस्तर माहिती

शिक्षक भरती जाहिरात


शिक्षक भरतीसाठी नवीन नियम ; द्यावी लागणार आता ‘ही’ परीक्षा

Shikshak Bharti 2022 : Teachers will no longer have to face competitive examinations for promotion. Teachers will now be recruited through competitive examinations while recruiting teachers for classes VI to VIII. Such information has been given by the education department. The education department is in the process of recruiting permanent teachers to fill the vacancies in the state. A few days ago, the Education Minister had informed that a notification will be issued regarding the recruitment of teachers. At the same time, Competitive Exam will be conducted while appointing teachers for 6th to 8th.

शिक्षकांना (Teacher) बढतीसाठी यापुढे स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. सहावी ते आठवीपर्यंतच्या वर्गांसाठी शिक्षकांची नेमणूक करताना स्पर्धा परीक्षा घेऊन यापुढे शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे.

शिक्षण खात्यातर्फे लवकरच राज्यातील रिक्त असलेल्या जागांवर कायमस्वरूपी शिक्षकांची भरती करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. शिक्षक भरती ( Teacher Recruitment)बाबत सरकारकडून हिरवा कंदील मिळतात भरतीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात येईल अशी माहिती काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्र्यांनी दिली होती. त्याच बरोबर आता सहावी ते आठवीसाठी शिक्षकांची नेमणूक करताना स्पर्धा परीक्षा (Competitive Exam)घेतली जाणार आहे.

शिक्षण खात्याने शिक्षक भरतीसाठीचे नवीन नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार शिक्षक भरतीसाठी उमेदवार टीईटी परीक्षा (TET Exam)पास झालेला असेल. टीईटी पास झाल्यानंतर उमेदवारांना सीईटी (CET Exam) परीक्षा द्यावी लागेल सीईटी परीक्षेत पास झाल्यानंतर गुणवत्तेनुसार भरतीसाठी यादी जाहीर केली जाणार आहे. शिक्षकांची भरती झाल्यानंतर सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शिक्षकांची नेमणूक करताना स्पर्धात्मक परीक्षा घेतली जाणार आहे या परीक्षेत पास झालेल्या शिक्षकांना भरतीत प्राधान्य देण्यात येणार आहे.

शिक्षण खात्याने सहावी ते आठवीसाठी शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला तरी प्राथमिक शाळांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या पदवीधर शिक्षकांना अगोदर बढती द्यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांकडून केली जात आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने शिक्षकांची नेमणूक करताना ६७ टक्के शिक्षकांची नव्याने भरती तर त्यात ३३ टक्के शिक्षकांना सेवा बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असून राज्यात सहावी ते आठवीच्या वर्गांमध्ये ५२६३० शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागा वेळेत भरती करणे गरजेचे असून रिक्त शिक्षकांच्या जागांवर सध्या अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

राज्यात नवे शैक्षणिक धोरण लागू होत असल्याने अनेक नव्या नियमांची भर पडत असून सहावी ते आठवीसाठी शिक्षक भरती करताना स्पर्धा परीक्षेचे नवा नियम लागू होणार आहे. स्पर्धात्मक परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळण्यास मदत मिळणार आहे.

ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी


सहाय्यक प्राध्यापकासाठी पीएचडी अनिवार्य नाही, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा निर्णय

Shikshak Bharti 2022- Union Education Minister Dharmendra Pradhan has given good news to those applying for the post of Assistant Professor. The Minister of Education has announced that PhD will not be mandatory for the recruitment of assistant professors in colleges. However, this compulsion is only for one year, i.e. for recruitment in 2022. Read More update about Shikshak Bharti 2022 at below

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्याऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीसाठी पीएचडी अनिवार्य राहणार नाही हा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला आहे. असे असले तरी ही सक्ती केवळ एका वर्षासाठी म्हणजे २०२१ मध्ये होणाऱ्या भरतीसाठी आहे. यावर्षी पीएचडी सक्तीसाठी स्थगिती देण्यात आली आहे पण ती रद्द करण्यात आलेली नाही. विद्यापीठात रिक्त असलेल्या शिक्षकांची भरती व्हावी म्हणून उमेदवारांना हा दिलासा देण्यात आला आहे.

देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदावर भरतीसाठी पीएचडी अनिवार्य आहे. पण आता हा निकष शिक्षण मंत्रालयाने फक्त या सत्रासाठी काढला आहे. यामुळे महाविद्यालयातील रिक्त पदे वेळेवर भरता येतील आणि प्राध्यापक/प्राध्यापकांच्या संभाव्य कमतरतेमुळे शिक्षणावर परिणाम होणार नाही. अनेकांना या पदासाठी अर्ज करायचा होता पण त्यांची पीएच.डी. पूर्ण नाही. अशा अनेक उमेदवारांनी शिक्षणविभागाकडे विनंत केली होती. त्यामुळे ही सक्ती या वर्षासाठीच रद्द करण्यात आली आहे.

आता राष्ट्रीय पात्रता चाचणी उत्तीर्ण केलेले पीजी पदवी असलेले उमेदवार सहाय्यक प्राध्यापक पदावर भरतीसाठी पात्र असतील. या निर्णयाबाबत यूजीसी लवकरच सर्व उच्च शिक्षण संस्थांसाठी नोटिफिकेशन जाहीर करणार आहे. यामुळे महाविद्यालये आणि विद्यापीठांना सर्व रिक्त जागा लवकर भरण्यास मदत होणार आहे.

यापूर्वी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी NET पात्र असणे आवश्यक होते. पण वर्ष २०१८ मध्ये सरकारच्या निर्णयानुसार नेट व्यतिरिक्त पीएचडी उमेदवारांना देखील या स्तरावर नोकरी मिळणे आवश्यक आहे. ही योजना विद्यापीठ अनुदान आयोग २०१८ च्या नियमांतर्गत लागू करण्यात आली. उच्च शिक्षणातील मानके राखण्यासाठी आणि विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक आणि इतर शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवेळी किमान पात्रतेसाठी हा उपाय स्वीकारण्यात आला.


१ हजार १७१ अनुदानित महाविद्यालयांत १७ हजार ५०० सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त

Shikshak Bharti 2021 -Higher and Technical Education Minister Uday Samant had announced that the government would take a decision in eight days to fill 40 per cent of the vacancies. It’s been two months since the announcement. However, the announcement seems to be in the air as the recruitment of professors has not been completed yet.

प्राध्यापकांच्या रिक्त पदांपैकी ४० टक्के जागा भरण्याचा शासन निर्णय आठ दिवसांत काढू अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली होती. या घोषणेला आता दोन महिने होत आहेत. पण अजूनही प्राध्यापक भरतीचा तिढा सुटला नसल्याने ही घोषणा हवेतच विरली असल्याचे दिसून येत आहे.

तीन वर्षांपासून सीएचबी, नेट, सेट, पीएचडी अर्हताप्राप्त उमेदवार भरतीकडे डोळे लावून बसले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५ जून रोजी झालेल्या ऑनलाइन दीक्षांत समारंभात मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील प्राध्यापक भरतीचे धोरण जाहीर केले होते.

प्रत्यक्षात मात्र दोन महिने होत आले तरीही पुढे काहीच झाले नाही. राज्यात अजूनही २० वर्षांपूर्वीचाच आकृतिबंध मंजूर आहे. १ ऑक्टोबर २०१७ रोजी विद्यार्थी संख्येनुसार आकृतिबंधाला तत्त्वत: मंजुरी दिली खरी; पण त्यासाठी पुढे काहीच धोरण ठरवले नव्हते. तरीही ऑक्टोबर-२०१७ नुसारच्या आकृतिबंधात १ हजार १७१ अनुदानित महाविद्यालयांत १७ हजार ५०० सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. या जागांचा शासनाने मागील ५ वर्षांत कधीही विचार केलेला नाही.

राज्य सरकारच्या अंतर्गत येणारी महाराष्ट्रात एकूण २० विद्यापीठे आहेत. त्यापैकी ५ कृषी, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ आणि तंत्रशिक्षण प्रत्येकी एक अशी तीन विद्यापीठे आहेत. नागपूरला एक संस्कृत विद्यापीठ आहे. त्याशिवाय ११ प्रादेशिक अकृषी विद्यापीठे आहेत.

या विद्यापीठांमध्ये साधारणत: १ हजार ५७२ प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्यापैकी ४० टक्के म्हणजे ६२९ जागा भरण्यासंदर्भात स्वतंत्र शासन निर्णय राहणार आहे. शिवाय कॉलेजांच्या ज्ञानस्त्रोत केंद्र अर्थात ग्रंथालयातील १२१ ग्रंथपालांच्या जागाही भरण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पुण्यातील उच्च शिक्षण संचालक डॉ. डी. आर. माने यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


राज्यभरातील  रखडलेली  प्राध्यापक भरती लवकरच – माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत !!

Shikshak Bharti 2021 – Maharashtra Higher and Technical Education Minister Uday Samant today informed that 3,064 professors will be recruited in the state soon. He was speaking at a press conference at the Pune Collectorate. A total of 4,074 professors were recruited on behalf of the government. Of these, 1,0674 vacancies have been filled.

राज्यात लवकरच 3,064 प्राध्यापकांची भरती  होणार असल्याची माहिती महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. 21 जूनपासून नेट-सेट पीएचडी पात्रताधारक उमेदवार भरतीसाठी आंदोलन करीत आहेत. आता मंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर त्यांनी आपला निषेध मागे घेतला आहे. सरकारच्या वतीने एकूण 4,074 प्राध्यापक भरतीस मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी 1,0674 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती पूर्ण करण्यात आलेली आहे.

कोरोना महामारीमुळे 3,064 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती थांबली होती, ती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले

त्यांनी पुढे सांगितले की, माझ्या मंत्रालयाकडून 3,064  प्राध्यापकांच्या भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. तो अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात मंजूर होण्याची अपेक्षा आहे. वित्त विभागाकडील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्थमंत्रालयाकडून मान्यता घेतल्यानंतर भरतीसंदर्भात लवकरच शासन निर्णय काढला जाईल.

यासोबत, महाराष्ट् राज्य ग्रंथपाल महासंघाच्या वतीने अनुदानित वरिष्ठ महाविद्यालये तसेच विद्यापीठातील ग्रंथपाल भरतीसंदर्भात केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत 121 ग्रंथपाल भरती तसेच विद्यापीठातील शिक्षकीय 659 भरती करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


राज्यात लवकरच होणार 3,064 प्राध्यापकांची भरती

Shikshak Bharti 2021 – The first and second waves of corona had hampered the recruitment of professors in the state. But now the committee has approved the recruitment of professors. Therefore, the first phase of recruitment of professors will start in the next two to three days after getting the approval.

राज्य सरकार प्राध्यापक भरतीसाठी सकारात्मक असून वित्त विभागानेही मंजुरी दिली आहे. सर्व प्राध्यापकांची पदे लवकरच भरली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. सध्या सुमारे १५ हजार हजार सहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचेही त्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात प्राध्यापक भरतीला

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापकांची भरती रखडलेली होती. मात्र आता समितीने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल. तसेच तासिका प्राध्यपाकांच्या मानधनात वाढ केली जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. गोंदियात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत म्हणाले.

आचारसंहितेमुळे ही भरती प्रक्रिया रखडली. त्यानंतर राज्यभरातील नेट-सेट पात्रताधारकांकडून वारंवार प्राध्यापक भरती करण्यासंदर्भात मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे आता शासन स्तरावरूनही प्राध्यापक भरतीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उदय सामंत यांनी सांगितले की, प्राध्यापक भरती करण्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकार कायमच सकारात्मक आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी वित्त विभागाने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे. त्यानंतर प्राध्यापक भरतीसाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने पदांना मंजुरी दिली असून त्यांच्या सूचनेनुसार प्राध्यापक भरती लवकरच सुरू होणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. यासोबतच महाविद्यालय पूर्वपदावर सुरू होण्यासंदर्भातील निर्णय हा स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आहे. आज केवळ कोरोनामुळे आपण परीक्षा आणि महाविद्यालय ऑनलाइन सुरू ठेवले आहेत. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येताच सर्वकाही पूर्वपदावर सुरू होईल असेही सामंत यांनी सांगितले.

सीईटी परीक्षा शंभर टक्के जुलै महिन्यात

त्याशिवाय जेईई आणि नीटच्या परीक्षा घेणे हे केंद्र सरकारच्या हातात आहे. ज्याप्रमाणे सीबीएसई दहावी बारावीच्या केंद्र सरकारने परीक्षा रद्द केल्या आहेत. जो केंद्राचा विभाग तो जेईई आणि नीटच्या तारखा जाहीर करेल. मात्र प्रोफेशनल कोर्सेससाठी असलेली सीईटी शंभर टक्के जुलै महिन्यात घेण्यात येईल, असे सामंत म्हणाले.


अखेर प्राध्यापकांच्या भरतीला अर्थ विभागाची मान्यता ; पन्नास टक्के जागा भरण्याची कार्यवाही सुरू

Shikshak Bharti 2021 – राज्य  सरकारकडून देय असलेल्या सातव्या वेतन आयोगातील ५० टक्के फरकाची रक्कम रोखीने दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

प्राध्यापकांच्या रिक्त जागांच्या भरती बाबत सुटाने केलेल्या मागणीकडे लक्ष वेधताना शासनाने पन्नास टक्के जागा भरण्याची कार्यवाही सुरू केली असल्याचे सामंत यांनी सांगितले. नेट सेट चा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा अशी मागणी झाली, यावरही सामंत यांनी खुलासा करताना शासन याबाबतही सकारात्मक असून लवकरच त्याचेही चांगले परिणाम दिसतील असे सांगितले. प्राध्यापकांच्या स्थान निश्चिती बाबत तांत्रिक बाबींमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे होत असलेल्या नुकसात व्यक्तिशः लक्ष घालून ते प्रश्न निकालात काढावेत अशी मागणी केली


50 % सहायक प्राध्यापक रिक्त पदांकरिता नेट, सेट पात्रता धारकांसाठी महत्वाचा अपडेट !!

Shikshak Bharti 2021 – As per the notification of Union Ministry of Human Resource Development and University Grants Commission (UGC), from 1st July 2021, net, set as well as Ph.D. has been made mandatory for the post of Assistant Professor in the University. At present, about 50 per cent or about 1,500 posts of assistant professors are vacant in all the universities in the state. Professor recruitment is also closed. Net, set with Ph.D. The number of qualifiers is measurable. Therefore, if the recruitment is not done in time, many net, set qualifiers will only get Ph.D. This has led to the possibility of being deprived of recruitment in universities.

१ जुलै २०२१ पासून विद्यापीठात  सोबतच पीएच.डी.सुद्धा अनिवार्य

१ जुलै २०२१ पासून विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदाकरिता नेट, सेट सोबतच पीएच.डी.सुद्धा अनिवार्य करण्यात आली आहे. सध्या राज्यातील संपूर्ण विद्यापीठात जवळपास ५० टक्के म्हणजेच सुमारे १५०० सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. प्राध्यापक भरतीही बंद आहे.  नेट, सेटसह पीएच.डी. पात्रताधारकांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यामुळे वेळेत पदभरती न झाल्यास अनेक नेट, सेट पात्रताधारक केवळ पीएच.डी. नसल्याने विद्यापीठांमधील पदभरतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त

‘यूजीसी’कडून वारंवार राज्य शासनाला सहायक प्राध्यापकांची पदे भरण्याची सूचना दिली जात आहे. परंतु त्याला राज्य शासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करून प्राध्यापकांची पदे भरण्याचे टाळले जात आहे. परंतु, प्राध्यापकांच्या वेतनाचा ५० टक्के वाटा हा यूजीसीकडून दिला जातो. त्यामुळे राज्य शासनावर प्राध्यापकांच्या वेतनाचा पूर्ण भुर्दंड बसत नाही. असे असतानाही प्राध्यापक पदभरती का होत नाही, हा सवाल  पात्रताधारक उपस्थित करीत आहेत. याउलट उच्च शिक्षण विभाग व वित्त विभाग मात्र कायमस्वरूपी स्थायी प्राध्यापकांबाबत उदार असल्याचे दिसून येते. राज्य शासनाने नुकताच प्राचार्य पदभरती संदर्भात शासन निर्णय जाहीर करीत प्राचार्य पदभरतीसाठी अनेक निर्बंध रद्द केले आहेत. या शासन निर्णयात नॅक मूल्यांकनासाठी आणि शैक्षणिक कामकाज पार पाडण्यासाठी प्राचार्यपद भरणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मग  वर्गात शिकवण्यासाठी प्राध्यापकांची आवश्यकता नाही का, असा सवाल पात्रताधारक करीत आहेत.

आम्ही सहा वर्षांपासून सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी करीत आहोत. प्रत्येकवेळी शासनाकडून खोटे आश्वासनच मिळाले. नव्या नियमाने अनेकांची पात्रता जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ भरतीचा आदेश काढावा. अन्यथा, आम्हाला राज्यभर उपोषण केल्यावाचून पर्याय राहणार नाही.


जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांच्या 1800 जागा रिक्त !!

Shikshak Bharti 2021 – Since the recruitment of teachers after the year 2010, has remained unfulfilled. Recruitment in Palghar district and other Scheduled Tribes has also stopped, leading to unemployment among the educated. In the year 2018-19, out of 363 vacancies for Zilla Parishad schools, 140 candidates were selected from 318 PESA constituencies. At present, the administration has informed that there are more than 1800 vacancies in the Zilla Parishad.

Shikshak Bharti 2021 – सन २०१० नंतर शिक्षक भरती झाली नसल्याने अनेक डी.एड, बी.एड उत्तीर्ण पदवीधरांना शिक्षक होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. पालघर जिल्ह्यासह इतर अनुसूचित जमाती क्षेत्रातील भरतीदेखील बंद राहिल्याने सुशिक्षितांवर बेरोजगारी ओढावली आहे. सन २०१८-१९ मध्ये  जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी ३६३ रिक्त जागांपैकी ३१८ पेसा क्षेत्रातील जागांमधील १४० उमेदवारांची निवड करण्यात आली. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेमध्ये १८०० पेक्षा अधिक पेसा क्षेत्रातील जागा रिक्त असल्याची माहिती  प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात पेसा भागातील शिक्षकांच्या १८०० हून अधिक रिक्त जागा असून शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले ३५० पेक्षा अधिक  आदिवासी तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.पेसा क्षेत्रातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी गठित केलेल्या समितीचा अहवाल जनजाती सल्लागार परिषदेसमोर ठेवण्यात आला आहे. मात्र  या अहवालावर कार्यवाही न झाल्याने पालघर जिल्ह्यासह राज्यातील सर्व आदिवासी जिल्ह्यतील कर्मचारी भरती प्रक्रिया खोळंबली आहे.

पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रिया राबवण्यासाठी वरिष्ठस्तरावर बैठकीचे आयोजन करावी यासाठी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी वरिष्ठांना पत्राद्वारे विनंती केली आहे. हा निर्णय प्रलंबित राहिल्याने जिल्ह्यतील तसेच इतर आदिवासी जिल्ह्यतील हजारो आदिवासी तरुण शासकीय नोकरीपासून वंचित राहिले आहेत.


अखेर राज्य शासनाची  मान्यता ;  प्राचार्य भरतीचा मार्ग मोकळा

Shikshak Bharti 2021 – The state government had earlier sanctioned a total of 260 vacancies for principals. Now the state government has approved to fill the vacant posts of principals in senior colleges. A new circular was issued on Tuesday allowing the vacant posts of principals to be filled till May 3, 2020

राज्य सरकारने यापूर्वीच एकूण 260 प्राचार्यांची रिक्‍त पदे भरण्यास मान्यता दिली होती. मात्र, कोणत्या विभागात किती पदे रिक्‍त आहेत, किती पदांना मान्यता द्यायची, यात कोणतीच स्पष्टता नव्हती. त्यामुळे भरतीचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याची पुढील कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे प्राचार्य पदभरतीत स्पष्टता असावी, अशी मागणी होत होती.

आता राज्य सरकारने वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांची रिक्‍त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. मंगळवारी नव्याने परिपत्रक प्रसिद्ध करीत 3 मे 2020 पर्यंत रिक्‍त असलेली प्राचार्यांची पदे भरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्राचार्यांची नियुक्‍तीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

दरम्यान, करोनामुळे प्रतीक्षेत असलेल्या प्राचार्य पदांना नियुक्‍तीचे आदेश देण्यासाठीचा प्रस्ताव संचालकांमार्फत शासनास सादर करावा. त्याचबरोबर “ना हरकत प्रमाणपत्र’ निर्गमित झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांचा कालावधी संपुष्टात आला असेल, अशा महाविद्यालयांकडून मुदतीवाढीचा प्रस्ताव स्वीकारून शासनास सादर करावा, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.


जिल्ह्यातील ZP शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त

Shikshak Bharti 2021 – जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १२५ केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची ८० पदे रिक्त असल्यामुळे शालेय व्यवस्थापनावर परिणाम होत आहे. जिल्हा परिषेदेच्या जिल्ह्यात 2 हजार 789 शाळा आहेत. या शाळांमध्ये 9 हजार 847 शिक्षकांची नियुक्ती आहे. विषय शिक्षक व मुख्याध्यापकांच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत.

ग्रामीण भागातील काही ठिकाणच्या शाळांमधील पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. त्याचबरोबर वाड्या व वस्तीवर सुरु केलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी घटले आहेत. जिल्ह्यातील 1 ते 10 पर्यंत पटसंख्या असलेल्या 29 शाळा आहेत. तर 11 ते 20 पर्यंत पटसंख्या असलेल्या तब्बल 263 शाळा आहेत. जिल्ह्यातील माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला तालुक्यात 164 शाळांची पटसंख्या 20 पेक्षाही कमी असून 20 शाळांमध्ये दहा विद्यार्थी आहे.

कोरोना महामारीची भर पडल्याने गेले वर्षभर शिक्षकांचे प्रश्न सुटले नाहीत. सध्यस्थिती केंद्रप्रमुख १२५ व मुख्याध्यापकांची ८० जागा रिक्त आहेत. अशात आता ३१ मे अख्तर शिक्षक मोठ्या प्रमाणावर सेवानिवृत्त होणार आहेत. केंद्रप्रमुखची पदे मजूर असून फक्त ७५ जण कार्यरत आहेत.


वैद्यकीय शिक्षण खात्यात १२००+ पदे रिक्त 

Shikshak Bharti 2021 – In Maharashtra States 22 Government Medical College  and Hospital having 49 % Vacant posts of  Professors Posts, 29% Associate Professor and 41 % Assistant Professor. When will be this vacant posts get filled ? Read below Image To More about Vacancies Of Professors at GMC and Hospital across State:


जिल्हा परिषद अंतर्गत शाळांमध्ये शिक्षकांची शेकडो पदे रिक्त !!

Shikshak Bharti 2021 – In Nagpur Zilla Parishad School there is hundreds of Vacant Post of Subject Teacher, Headmaster Head of Center. Due to these vacant positions, effects have been seen in Monitoring and supervision of Education Department. Check below Updated Information on Shikshak Bharti 2021 at below:

 

Shikshak Bharti 2021

Nagpur Zilla Parishad Shikshak Bharti 2021- Vacancy Details

संवर्गनिहाय रिक्त पदे विषय पदवीधर शिक्षक
शिक्षण विस्तार अधिकारी – 34 भाषा विषय शिक्षक -76
केंद्रप्रमुख – 104 विज्ञान विषय शिक्षक -10
उच्च श्रेणी मुख्याध्यापक – 38 समाजशास्त्र -09

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सरकारी माध्यमिक शाळांमध्ये लवरकच 133 अतिथी शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तर राज्यातील सरकारी माध्यमिक शाळांमध्ये 3473 अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यानूसार बिएडधारकांकडून अर्ज मागिविली जाणार आहेत. 

राज्यातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्‍त आहेत. मात्र शिक्षण खाते रिक्‍त जागा भरण्याऐवजी दरवेळी अतिथी शिक्षकांची नेमणुक करुन वेळ मारुन नेत आहे. 2020 मध्ये कोरोनाचे संकट असल्याचे सांगत सरकारी कर्मचाऱ्यांची भरती न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे लवकर शिक्षक भरती होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून यावेळीही विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी अतिथी शिक्षकांवरच असणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हातील सरकारी माध्यमिक शाळांमध्ये विविध विषयाच्या शिक्षकांच्या जागा रिक्‍त असून या भरती करणे आवश्‍यक बनले आहे. मात्र शाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी संपल्यानंतर आता अतिथी शिक्षक भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे.

2020- 21 च्या शैक्षणिक वर्षाकरिता अतिथी शिक्षक भरती होणार असल्याने तीन ते चार महिने नोकरी करण्यासाठी बिएडधारक पुढे येणार का? असा प्रश्‍न निर्माण होणार आहे. माध्यमिक प्रमाणेच सरकारी शाळांमध्येही शिक्षकांच्या जागा रिक्‍त आहेत. मात्र सध्या फक्‍त सरकारी माध्यमिक शाळांमध्येच शिक्षकांच्या जागा भरती केल्या जाणार असून पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळा सुरु झाल्यानंतर प्राथमिक शाळांमध्ये अतिथी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्यामार्फत देण्यात आली आहे. दरवेळी अतिथी शिक्षकांची नेमणुक केली जाते, परंतु त्यांना वेळेत वेतन देण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नोकरी करुही वेतनासाठी शिक्षकांना वाट पहावी लागते.


राज्यातील प्राध्यापक भरती लवकरच ; रिक्‍तपदांची मागविली माहिती

Shikshak Bharti 2021 – There are three and a half lakh professors to teach 42 lakh students in the state. There are vacancies for professors in many universities along with five and a half thousand colleges. A big decision in this regard will be taken soon, informed Higher and Technical Education Minister Uday Samant in Solapur.

 

राज्यातील 42 लाख विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी साडेतीन लाख प्राध्यापक आहेत. साडेपाच हजार महाविद्यालयांबरोबरच अनेक विद्यापीठांमधील प्राध्यापकांची पदे रिक्‍त आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून रिक्‍तपदांची माहिती संकलित केली जात आहे. आगामी काळात लवकरच त्यासंदर्भात मोठा निर्णय होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी  सोलापुरात दिली.

कोरोनामुळे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घ्यावी लागली. त्यावेळी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी ऑनलाइन सर्व्हर हॅक झाल्याबद्दल सायबर सेलकडे तक्रार देणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी तक्रार न देताच परीक्षा घेतल्या. मुंबई विद्यापीठाने सायबर सेलकडे तक्रार दिली असून त्याची चौकशी सुरु आहे. दरम्यान, त्यावेळी ज्या-ज्या विद्यापीठांनी ऑनलाइन परीक्षेसंदर्भात तक्रारी नोंदविल्या आणि त्यांनी पुढे काय कार्यवाही केली, याच्या पडताळणीसाठी फॅक्‍ट फाईंडिंग समिती नियुक्‍त केली आहे. त्यात उपसचिव, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक, आयटीचे सचिव आणि सायबर तज्ज्ञांचा समावेश असून तक्रारीनंतरही काहीच न करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाविद्यालयांमधील प्राचार्यांची पदे रिक्‍त

महाविद्यालयांमधील प्राध्यापकांबरोबरच काही महाविद्यालयांमधील प्राचार्यांची पदे रिक्‍त होती. या पार्श्‍वभूमीवर राज्यभरातील 260 प्राचार्यांच्या भरतीस राज्य सरकारने मंजुरी दिली असून त्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे. तर विविध विद्यापीठांमधील 48 संविधानिक पदभरतीलाही मान्यता दिल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठातील एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. आता प्रत्येक विद्यापीठांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र सुरु करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात ‘युपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचाही निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या मागणीनुसार सोलापुरातही हे केंद्र लवकरच सुरु होईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

विद्यापीठाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बदलीचा विचार

राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करता येतील का, यादृष्टीने सरकारचे नियोजन सुरु आहे. तत्पूर्वी, कोंडवाना विद्यापीठ, नागपूर, रामटेक, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी त्यासंदर्भात निवेदने दिली आहेत. आता नांदेड येथील कर्मचाऱ्यांची काय भूमिका आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. त्यानंतर सर्वच विद्यापीठांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करुन कर्मचाऱ्यांच्या बहुमतानुसार अंतर्गत बदल्याचा निर्णय आगामी शैक्षणिक वर्षात घेतला जाईल, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 


Shikshak Bharti 2021– Many constitutional posts in the state’s universities are vacant, making it difficult to run the university administration. Therefore, the Vice-Chancellor also demanded that these posts be allowed to be filled. Against this backdrop, the Governor directed the Department of Higher and Technical Education to allow universities to fill constitutional posts as soon as possible.

राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्था व महाविद्यालयातील वर्ग त्वरित सुरु करण्याची विद्यापीठांची तयारी आहे. मात्र शासनाच्या परवानगीशिवाय महाविद्यालये सुरु करता येत नाही. महाविद्यालयातील वर्ग त्वरित सुरु करावी अशी मागणी विद्यार्थी देखील करीत आहेत. त्यामुळे राज्यातील महाविद्यालयांना प्रत्यक्ष वर्ग त्वरित सुरु करण्याची विद्यापीठांना अनुमती द्यावी, अशी एकमुखी मागणी राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली.

राज्यातील विद्यापीठांमधील अनेक संविधानिक पदे रिक्त असल्यामुळे विद्यापीठ प्रशासन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही पदे भरण्याची अनुमती द्यावी अशीही मागणी यावेळी कुलगुरूंनी केली. या पार्श्वभूमीवर शासनाने विद्यापीठांना संविधानिक पदे यथाशीघ्र भरण्याची अनुमती द्यावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाला केली.

राज्यपाल कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी ते बोलत होते. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता तसेच राज्यातील सर्व २० विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

विद्यापीठांचे २०२०-२१ या शैक्षणिक सत्रातील प्रत्यक्ष वर्ग सुरु करणे, विद्यापीठांमधील रिक्त संविधानिक पदांचा आढावा घेणे तसेच विद्यापीठांच्या वार्षिक लेखा परीक्षणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्याकरिता राज्यपालांनी बैठकीचे आयोजन केले होते.

विद्यापीठांमध्ये संविधानिक पदांशिवाय शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जवळ जवळ ५० टक्के पदे रिक्त असल्याचे काही कुलगुरूंनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. बैठकीमध्ये प्रत्येक विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विषय पत्रिकेशी निगडीत आपापल्या विद्यापीठांसंबंधी माहिती राज्यपालांना सादर केली.


Shikshak Bharti 2021 – School Education Minister Varsha Gaikwad has made a big announcement on Twitter regarding recruitment. The education department has recruited 266 junior clerks. Therefore, this is a golden opportunity to get a job in the education department. Read More details at below:

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नोकर भरतीबाबत ट्विटरवर मोठी घोषणा केली आहे. शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 पदांची भरती निघाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्यात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे (Varsha Gaikwad announced recruitment in Education Department).

दरम्यान, ही भरती सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ठ्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील 50 टक्के नियुक्ती देण्यास मान्यता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे (Varsha Gaikwad announced recruitment in Education Department).


Shikshak Bharti 2021 – There are vacancies in major hospitals like KEM, Sion, Nair, general hospitals, medical colleges. Out of 105 vacant posts of Associate Professors, 100 posts will be filled immediately. This proposal was approved in the meeting of the Public Health Committee, informed the Chairperson of the Health Committee, Praveena Morjkar.

पालिकेच्या केईएम, सायन, नायर या प्रमुख रुग्णालयांसह सर्वसाधारण रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये याठिकाणी रिक्त असलेल्या सहयोगी प्राध्यापकांच्या १०५ पदांपैकी १०० पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती आरोग्य समितीच्या अध्यक्षा प्रवीणा मोरजकर यांनी दिली.

पालिका वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये याठिकाणी शिकवण्यासाठी आणि रुग्णांवरील उपचारांकरिता साहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक यांची ४० ते ५० टक्के पदे रिक्त आहेत. यामध्ये, सहयोगी प्राध्यापकांची १०५ पदे रिक्त असून, त्यापैकी १०० पदे तातडीने भरण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. सहयोगी प्राध्यापकांना एक लाख ८२ हजार ते दोन लाख २४ हजार १०० इतके मासिक वेतन दिले जाणार आहे.


Pavitra Portal – Shikshak Bharti For 20,000 Vacancies  – Shikshak Bharti 2021

Shikshak Bharti 2021 -The government had given permission to fill some of the posts. However, after the corona infection, the finance department on May 4 imposed restrictions on recruitment in the state. However, the absence of a principal was affecting the day-to-day functioning of the colleges. Read More details on Shikshak Bharti 2021 at below

Maharashtra Shikshak Bharti 2021 – राज्यातील २६० महाविद्यालयांना अखेर पूर्णवेळ प्राचार्य मिळणार असून शासनाने प्राचार्याची भरती करण्यास मंजुरी दिली आहे.

राज्यातील प्राध्यापक आणि प्रचार्याची पदे रिक्त आहेत. प्राचार्याची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यापैकी काही पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी दिली होती. मात्र करोना संसर्गानंतर वित्त विभागाने ४ मे रोजी राज्यातील पद भरतीवर निर्बंध आणले. मात्र, प्राचार्य नसल्यामुळे महाविद्यालयांच्या रोजच्या कामकाजावर परिणाम होत होता. अनेक महाविद्यालयांचे नॅकचे मूल्यांकनही रखडले होते.

विविध संघटनांनी प्राचार्याची पदे भरण्याची मागणी केली होती. अखेर शासनाने प्राचार्याची २६० पदे भरण्यास वित्त विभागाने ४ मेच्या निर्बंधातून सूट दिली आहे. त्यामुळे या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सोर्स : लोकसत्ता


Maharashtra Teachers Recruitment 2020 : कोरोना संकटात ही कंपनी 20 हजार महिलांना देणार रोजगार, दीड लाखांपर्यंत पगार

कोरोना संकटाच्या काळात पदवीधर आणि पदव्युत्तर महिलांसाठी एक चांगली बातमी आहे. एडटेक स्टार्टअप व्हाइटहॅट जुनियर (WhiteHat Jr)ने म्हटले आहे की, ते आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतातील महिला शिक्षकांची संख्या वाढवित आहेत. कंपनी प्लॅटफॉर्मवर दररोज 220 शिक्षकांना जोडत आहे. आतापर्यंत त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 7,000 पेक्षा जास्त शिक्षक कार्यरत आहे. वर्षाच्या अखेरीस 20,000 शिक्षकांची भरती करण्याची त्यांची योजना आहे, अर्थात यावर्षी आणखी 13,000 शिक्षकांची भरती करण्याची कंपनीचा मानस आहे. या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू. तेव्हा महाभरती ला नियमित भेट देत रहा.

अनेक देशांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढतीच

व्हाइटहॅट जुनियरला अलीकडेच बीजू(Byju’s) यांनी विकत घेतले होते. व्हाइटहॅट ज्युनियर म्हणाले की, त्यांचे भारत (India), अमेरिका (US), कॅनडा (Canada), ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवर अधिक शिक्षकांची आवश्यकता आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, त्याच्या प्लॅटफॉर्मवर शिक्षकांची संख्या वाढत आहे. कंपनीने म्हटले आहे की, कोरोना संकटामुळे डिजिटल शिक्षण आणि शिक्षणाच्या पद्धतींमध्ये नवीन प्रयोग करण्यात येत आहेत.

पालक ऑनलाइन शिकण्यास पूर्णपणे पाठिंबा देत आहेत

व्हाइटहॅट ज्युनियरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करण बजाज म्हणाले की, पालकांनीही ऑनलाइन शिक्षण घेतले आहे. मुलांच्या शिक्षणाच्या या नवीन दृष्टिकोनास पालक पूर्णपणे पाठिंबा देत आहेत. सध्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मशी संबंधित 84 टक्के शिक्षकांचे वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे. ते घरी मुलांना शिकवत आहेत आणि दरमहा सरासरी 50,000 ते 1.5 लाख रुपये कमवत आहेत. बहुतेक शिक्षकांकडे पदव्युत्तर पदवी आहेत. या कंपनीची स्थापना 2018 मध्ये झाली होती.

4 thoughts on “Shikshak Bharti 2022”

Leave a Comment