Maharashtra Shikshak Bharti 2022

राज्यातील शालेय शिक्षण विभागात अधिकारी होण्याची संधी, जाणून घ्या कसे ?

Maharashtra Shikshak Bharti 2022 – Many posts in the School Education Department have not been filled for years. many organizations had demanded that Ph.D. teachers should be appointed for the posts of Class One, Class Two, Education Extension Officer, Head of Center. So Teachers are likely to get the opportunity to fill the vacancies in the School Education Department in the state. Know More information regarding Maharashtra Shikshak Bharti 2022 at below

राज्यातील शालेय शिक्षण विभागात (School Education Department) रिक्त असलेल्या पदांवर अधिकारी होण्याची संधी शिक्षकांना (Teachers) मिळण्याची शक्यता आहे. विभागतील अनेक पदं वर्षानुवर्ष भरली गेलेली नाहीत. त्यामुळे क्लास वन, क्लास टू, शिक्षण विस्तार अधिकारी (Education Extension Officer), केंद्रप्रमुख (Head of Center) या पदांवर पीएचडी (Ph.D.) झालेल्या शिक्षकांची नेमणूक केली जावी, अशी मागणी अनेक संघटनांनी केली होती. (Big Decision taken by the State Government for PhD Teachers)

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधले 200पेक्षा जास्त शिक्षक पीएचडी झालेले आहेत. मात्र त्यांना थोडीफार पगारवाढ मिळण्यापलीकडे फारसा फायदा होत नाही. त्यामुळे अनेक शिक्षक नावाच्या आधी डॉक्टर लावणेही टाळतात. त्यामुळे अशा शिक्षकांना अधिकारी होण्याची संधी मिळाली, तर त्याचा फायदा राज्याच्या शिक्षणक्षेत्रालाच होईल, अशी भावना शिक्षक व्यक्त करत आहेत. दरम्यान या दिशेने राज्य सरकारने विचार सुरू केलं आहे.

ग्रामविकास खात्यानं सर्व विभागीय आयुक्तांना याबाबतच एक पत्र नुकतेच पाठवले आहे. अधिकारी होण्यासाठी आर्हतेमध्ये बसणा-या शिक्षकांची माहिती मागवण्यात आली आहे. औरंगाबादच्या शिक्षणाधिका-यांनी माहिती जमवायला सुरूवात केली आहे. शिक्षक संघटनेनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. एकीकडे विद्यादान करताना स्वतःचाही शैक्षणिक विकास करणारे अनेक शिक्षक आहेत. या शिक्षकांना अधिकारी केल्यास ते अधिक योग्य ठरेल.


जिह्यातील ग्रामीण भागांतील शाळांमधील ५५१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत

Maharashtra Shikshak Bharti 2022 According to Zilla Parishad, there are 1,530 schools from 1st to 8th standard. More than 71,505 students from rural areas are studying there. A total of 4,552 teacher posts are sanctioned here; But at present only 4 thousand 1 teachers are working in this place. There are 551 vacancies for teachers. The small number of teachers creates difficulties in the education of students. Regarding this, District President of State Primary Teachers’ Committee Liladhar Thackeray said that this is likely to have an adverse effect on school enrollment in future. He demanded that the government should immediately fill the vacancies of all assistant teachers, as well as the posts of subject graduate teachers and higher grade headmasters. More information is as given below for Maharashtra Shikshak Bharti 2022

Maharashtra Shikshak Bharti 2022

नरखेड आणि पारशिवनी तालुक्यांतील ४ शाळांमध्ये एकही शिक्षक उपलब्ध नाही. परिणामी या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाकडून शेजारील केंद्रातील शाळेतील शिक्षकांना प्रतिदिन पाठवण्यात येत आहे. अशा पद्धतीने या शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा कारभार चालू आहे, तसेच दिवसेंदिवस या जिल्हा परिषदांच्या शाळांची अवस्था अतिशय दयनीय अशी होत आहे. गुणवत्तेसमवेत शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्याही घटत चालली आहे.

जिल्हा परिषदेच्या इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या अनुमाने १ सहस्र ५३० शाळा आहेत. त्या ठिकाणी ग्रामीण भागातील जवळपास ७१ सहस्र ५०५ हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे एकूण ४ सहस्र ५५२ शिक्षकांची पदे संमत आहेत; मात्र सध्या या ठिकाणी ४ सहस्र १ शिक्षकच कार्यरत आहेत. ५५१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षकसंख्या अल्प असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण होतात. याविषयी राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे म्हणाले की, भावी काळात शाळांच्या पटसंख्येवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. शासनाने सर्व साहाय्यक शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावीत, तसेच विषय पदवीधर शिक्षक आणि उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदे पदोन्नतीने त्वरित भरण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

विनामूल्य गणवेश, पाठ्यपुस्तके आणि भोजन देऊनही विद्यार्थी पटसंख्या अल्प !

गेल्या काही वर्षांमध्ये गुणवत्तेअभावी आणि ग्रामीण भागात इंग्रजी शाळांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी पटसंख्या प्रतिवर्षी घसरत आहे. ही पटसंख्या रोखण्यासाठी शासनाने यापूर्वी सर्व शिक्षा आणि आता समग्र शिक्षाअंतर्गत विद्यार्थ्यांना विनामूल्य गणवेश, पाठ्यपुस्तके आणि मध्यान्ह भोजन अशा विविध योजनांचा लाभ देणे चालू केले; परंतु शाळांमध्ये आवश्यक तितके आणि अपेक्षित असे शिक्षक नसल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव आहे. त्यामुळे पाल्यांना इंग्रजी किंवा इतर खासगी शाळांमध्ये शिकवण्याकडे ग्रामीण पालकांचाही कल वाढत आहे. ही पटसंख्या रोखण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासनाकडून कुठलीही उपाययोजना होत असल्याचे दिसून येत नाही.


वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीला वेग

Maharashtra Shikshak Bharti 2022 : Recruitment of vacancies for professors and assistant professors in senior colleges in the state has accelerated. The college administration is in the process of collecting information about vacancies in senior colleges across the state and submitting proposals to the higher education department. More details about Maharashtra Shikshak Bharti 2022 at below:

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांच्या रिक्त पदांच्या भरतीला वेग आला आहे. राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयांत रिक्त पदांची माहिती आणि त्यासाठीचे प्रस्ताव गोळा करून उच्च शिक्षण विभागाकडे सादर करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाची धावपळ सध्या सुरू आहे.

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांत सध्या रिक्त असलेल्या प्राध्यापक, सहायक, प्राध्यापक यांच्या ३,५८० पदांपैकी पहिल्या टप्प्यात २,८८ पदभरतीला नुकतीच सुरुवात झाली. ही पदभरती गुणवत्ता आणि पारदर्शक पद्धतीने केली जावी, यासाठी उच्च शिक्षण विभागाकडून संबंधित महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.

रिक्त पदांमधील खुल्या, राखीव प्रवर्गासह इतर आवश्यक विषयांसाठी ही पद भरती केली. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक वरिष्ठ महाविद्यालयांनी रिक्त पदांचे प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे सादर करण्यासाठी जोर लावला आहे. …

‘आदिवासी उमेदवार नाहीत’ उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून रिक्त असलेल्या प्राचार्यांची पदे भरण्याची प्रक्रिया ही सुरू आहे. प्राचार्यांची ही पदे पूर्णपणे भरली जाणार आहेत. मात्र यात अजूनही मोठ्या प्रमाणात आदिवासी प्रवर्गातील उमेदवारच मिळत नसल्याने अनेक महाविद्यालयांची मोठी पंचायत झाल्याचे ‘एम फुक्टो’ या प्राध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब साळवे यांनी सांगितले .


तालुक्यातील ४० शाळांमध्ये गणित शिक्षकांच्या तब्ब्ल इतक्या जागा रिक्त !!

Maharashtra Shikshak Bharti 2022 : 40 schools in Paithan taluka including Pachod are running without mathematics teachers. On the one hand, the government is squandering crores of rupees to increase the quality of education and get quality education. On the other hand, since the vacancies of the responsible elements are not being filled for five to seven years. Know More details on Maha Maths Teacher Bharti 2022, Maharashtra Shikshak Bharti 2022 at below

दीड वर्षापासून कोरोनामुळे शिक्षणाची पूर्णतः वाट लागली. कोरोनाचे संकट दूर सारत आता हळूहळू शैक्षणिक स्थिती पूर्वपदावर येत असून, विद्यार्थीही शाळेत जात आहेत.

मात्र, शाळांतील रिक्त जागा भरण्याकडे लक्ष दिले जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येते. पाचोडसह पैठण तालुक्यातील ४० शाळा गणिताच्या शिक्षकांविना सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एकीकडे शासन शैक्षणिक गुणवत्ता वाढून दर्जेदार शिक्षण मिळावे, म्हणून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करीत आहे. तर दुसरीकडे पाच ते सात वर्षे जबाबदार घटकाच्या रिक्त जागाच भरत नसल्याने शिक्षणाचे तीन- तेरा वाजत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून पैठण तालुक्यातील शिक्षण विभागात एकूण १,३०५ पैकी दोन शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांसह १५ केंद्र प्रमुखांच्या, २३ मुख्याधापकांच्या व ४८ पदवीधर प्राथमिक शिक्षकाच्या तर ३५ सहशिक्षकांच्या अशा १२३ जागा रिक्त आहेत. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जा खालावत चालला आहे, त्यामुळे सधन व जागरूक पालक आपल्या पाल्यांना शहरांची वाट दाखवत आहे.

एकंदरीत सहशिक्षक गेल्या सहा वर्षांपासून मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखाची ‘प्रभारी’ जबाबदारी सांभाळीत असून, ते शिक्षणमंत्र्यांपेक्षाही अधिक रुबाब गाजवीत आहे. त्यांना नामी संधीचा मिळालेला मोह सुटण्यास तयार नसून, पाच वर्षांपासून तालुक्यात बदलून आलेल्या शिक्षकांना तर ‘प्रभारी’ कोण हे सुद्धा माहीत नाही, ते प्रभारींनाच आपले नियमित ‘वरिष्ठ’ समजतात.

पैठण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २४४ प्राथमिक, सहा माध्यमिक अशा २५० तर १८ केंद्रीय प्राथमिक शाळा असून, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची चार पदे मंजूर असून, दोन पदे रिक्त आहेत. केंद्र प्रमुखांची अठरा पदे मंजूर असून, तीन कार्यरत तर पंधरा पदे रिक्त, मुख्याध्यापकांची ९२ पदे मंजूर असून, ६९ पदे कार्यरत तर २३ पदे रिक्त, पदवीधर प्राथमिक शिक्षकांची २७१ पदे मंजूर असून, २२३ कार्यरत तर ४८ पदे रिक्त, सहशिक्षकांची ९२० पदे मंजूर असून, ८८५ जण कार्यरत तर ३५ जागा रिक्त आहेत.

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अनिता वानखेडे यांनी तातडीने रिक्त जागा भरण्याची मागणी केली असून, जागा न भरल्यास आपण शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

गणित विषयाच्या रिक्त पदांचा तपशिल

आडूळ, ज्ञानेश्वरवाडी, मायगाव, कुरणपिंप्री, दरेगाव, खादगाव, फारोळा, शिवणी, धनगाव, पोरगाव, ढोरकीन, ब्रम्हगाव, देवगाव, रजापूर, धूपखेडा, लोहगाव, आवडे उंचेगाव, घेवरी आदी. उर्दू माध्यम गणित : बालानगर, कारकीन, लोहगाव, हिरडपूरी, नवगाव, पिंपळवाडी, कोळी बोडखा.

सर्व रिक्तपदांची वरिष्ठांना प्रत्येक महिन्याला माहिती देण्यात येते. रिक्त पदे भरण्याची कार्यवाही वरिष्ठांच्या अधिनिस्त आहे. जिल्हाभर हीच परिस्थिती आहे. माणसंच नाहीत, काही बदलून गेले, काही सेवानिवृत्त झाले. आम्ही काय करणार?

-श्रीराम केदार, गट शिक्षणाधिकारी, पैठण


Maharashtra Shikshak Bharti 2022 : Higher Education Minister Uday Samant informed about the recruitment of professors in the college through Twitter. This has paved the way for stagnant professor recruitment. However, at present there are about 1,298 vacancies for Assistant Professors in Shivaji University Kolhapur. There are a large number of vacancies for Assistant Professors in various subjects in the universities and colleges of the State. The University Grants Commission (UGC) has issued instructions in this regard from time to time. However, due to Corona and subsequent circumstances, the recruitment process was delayed

महाविद्यालयातील प्राध्यापक भरती बाबतची माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिली. यामुळे रखडलेल्या प्राध्यापक भरती चा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, सध्या शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात सुमारे 1,298 सहायक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहे. रिक्त जागा व शासन निर्णयात मोठी तफावत असल्याने पात्रताधारकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

राज्यातील विद्यापीठे व अनेक महाविद्यालयांमध्ये मोठ्या संख्येने विविध विषयांची सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वेळोवेळी याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र, कोरोना व त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पदभरतीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांच्या पहिल्या टप्प्यातील 2,088 प्राध्यापक भरती व सर्व प्राचार्य पदे भरण्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी दिली आहे.

2013 पासून राज्यात प्राध्यापक भरती झालेली नाही

राज्यात 2013 पासून प्राध्यापक भरती नियमितपणे झालेली नाही. महाविद्यालयातील 40 ते 50 टक्के प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अनुदानित महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांची सुमारे 1298 पदे रिक्त आहेत. प्राध्यापक भरती व्हावी म्हणून नेट-सेटधारक व पीएच. डी. पदवी मिळविलेल्यांनी पाठपुरावा केला होता. युती सरकारने 40 टक्के भरतीनुसार 3580 पदे भरण्याचा निर्णय झाला. त्यातील सुमारे प्राध्यापकांची 1100 पदे भरण्यात आली. अद्याप 2400 पदे भरणे अपेक्षित आहेत. परंतु, महाविकास आघाडी सरकारने 2088 पदे भरतीचा निर्णय घेतला आहे. आणखी 312 पदे रिक्त ठेवल्याने पात्रताधारकांमध्ये नाराजीची भावना आहे.

पात्रताधारकांच्या बेरोजगारीत वाढ

सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक भरतीवर 4 मे 2020 च्या शासन निर्णयानुसार बंदी होती. प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. दहा वर्षांपासून सलग रिक्त प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया न झाल्याने सेट, नेट व पीएच. डी. पात्रताधारकांच्या बेरोजगारीत वाढ झाली आहे. त्यामुळे प्राध्यापक भरती प्रक्रियेचा शासन निर्णय तत्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.

राज्यात सुमारे 13 हजार प्राध्यापक पदे रिक्त असताना पहिल्या टप्प्यात 2088 पद संख्या भरण्याचा शासनाने घेतलेला निर्णय नगण्य आहे. त्यामुळे दुसरा टप्पा नजीकच्या काळात घोषित होईल व उर्वरित 100 पदे भरली जातील, अशी अपेक्षा आहे.
– डॉ. किशोर खिलारे,
राज्य समन्वयक, प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलन


Maharashtra Shikshak Bharti 2022 : With the permission of the state finance department, approval has been given by the higher and technical education department to fill 370 posts of principals and 2,088 posts of assistant professors. In order to maintain the affiliation given to each college by the concerned university or regulatory authority, the allocation of teaching posts has been made keeping in view the necessary limits for evaluation and re-evaluation of the college.

राज्याच्या वित्त विभागाच्या परवानगीने प्राचार्याची ३७० आणि सहायक प्राध्यापकांची २ हजार ८८ पदे भरण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. प्रत्येक महाविद्यालयास संबंधित विद्यापीठ किंवा नियामक प्राधिकरणाने दिलेली संलग्नता अबाधित राहण्यासाठी, महाविद्यालयाचे मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन होण्यासाठीची आवश्यक मर्यादा विचारात घेऊनच शिक्षकीय पदांचे वाटप करण्यात आल्याचे सष्ट करण्यात आले आहे.

प्राचार्य आणि सहायक प्राध्यापक भरतीवरील निर्बंध शिथिल करण्यात आल्याचा शासन निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रसिद्ध केला. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या पावणेदोन वर्षांपासून सहायक प्राध्यापक आणि प्राचार्य भरतीवर निर्बंध घालण्यात आले होते. प्राचार्य संवर्गाच्या पदभरतीमुळे शासनावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नसल्याने प्राचार्य पदाच्या ३७० रिक्त जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यास मान्यता देण्यात आली. तर १ ऑक्टोबर २०१७च्या विद्यार्थी संख्येला आधारभूत मानून सहायक प्राध्यापकांच्या २ हजार ८८ पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अतिरिक्त ठरलेल्या सहायक प्राध्यापकांचे रिक्त पदी समायोजित करून संबंधित विषयासाठी सहायक प्राध्यापकाचे पद अतिरिक्त नसल्याचे विभागीय सहसंचालकांनी प्रमाणित केल्यावरच पदभरतीची जाहिरात देता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

संस्थेवर वेतनाची जबाबदारी..  

आकृतिबंध अंतिम झालेला नसल्याने आकृतिबंधास वित्त विभागाची अंतिम मंजुरी मिळेपर्यंत संबंधित पदे अंतिम समजण्यात येऊ नयेत. त्या व्यतिरिक्त पदांवर भरती केल्यास संबंधित उमेदवारांच्या वेतनाची जबाबदारी संस्थेची असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २ हजार ८८ सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला असला, तरी या भरतीनंतरही अनेक पदे रिक्त राहणारच आहेत. कारण उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ऑक्टोबर २०१७च्या कार्यभाराला अंतिम मान्यताच दिलेली नाही. ही मान्यता दिल्यास सर्व रिक्त पदे भरता येतील. सर्व रिक्त पदे भरली जाऊ नयेत म्हणूनच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २०१७च्या कार्यभाराला अंतिम मान्यता दिलेली नाही. प्राध्यापकांची भरती करताना शासनाने विद्यार्थ्यांचे हित पाहिलेले नाही.


राज्यात  प्राध्यापकांची २ हजार ८८ पदे, प्राचार्यांच्या सर्व रिक्त पदांची भरती

Maharashtra Shikshak Bharti 2022 – Pradhyapak Bharti 2022 Update – It has been decided to implement recruitment process for 2,088 professors and all vacant posts of principals in the state. Higher and Technical Education Minister Uday Samant has informed about it through a tweet. Although the decision has brought relief to the eligible candidates who are constantly agitating for the recruitment of professors, it has not been clarified when the recruitment process will start. Know More about Maharashtra Shikshak Bharti 2022 at below

राज्यात प्राध्यापकांची २ हजार ८८ आणि प्राचार्यांच्या सर्व रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी त्या बाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. प्राध्यापक भरतीसाठी सातत्याने आंदोलने करणाऱ्या पात्रताधारकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला असला, तरी भरती प्रक्रिया कधी सुरू होणार याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही.

Maharashtra Shikshak Bharti 2022

Maharashtra Shikshak Bharti 2022

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याचे निर्देश देशभरातील विद्यापीठांना, महाविद्यालयांना देण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली प्राध्यापकांची पदे भरण्याची मागणी पात्रताधारकांकडून करण्यात येत होती. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दोन वर्षांपूर्वी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर सातत्याने प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवण्याबाबत पात्रताधारकांच्या संघटनांना आश्वासने दिली होती. मात्र वित्त विभागाकडून मान्यता मिळत नसल्याने राज्यातील प्राध्यापक भरती रखडली होती. त्यामुळे घड्याळी तासिका तत्त्वावर काम करावे लागणाऱ्या नेट-सेट, पीएच.डी. धारकांमध्ये प्राध्यापक भरती कधी होणार याबाबत अस्वस्थता होती.

या पार्श्वभूमीवर  प्राध्यापक भरतीच्या पहिल्या टप्प्यात २ हजार ८८ पदे आणि प्राचार्यांची सर्व पदे भरण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली. प्राध्यापकांच्या सर्व रिक्त पदांवर भरती करण्यासाठी पात्रताधारकांच्या संघटनांनी पुण्यासह राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली. आता प्राध्यापक भरतीच्या पहिल्या टप्प्यात २ हजार ८८ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली असली, तरी प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार याबाबत स्पष्टता नसल्याने एकूण भरती प्रक्रियेबाबत साशंकताच असल्याचे चित्र आहे.


राज्यभरात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शेकडो जागा रिक्त !!

Maharashtra Shikshak Bharti 2021 – शिक्षक भरती महाराष्ट्र 2021 जाहिरात – As the posts of 161 Zilla Parishad Heads, 181 Headmasters and 424 teachers are vacant in the district, the arithmetic of the number of teachers has deteriorated. This puts extra work stress on teachers and has an impact on quality. The Department of Education has been striving for the last few years for the academic progress of the students.

शिक्षक भरती महाराष्ट्र 2021 जाहिरात

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १६१ केंद्रप्रमुख, १८१ मुख्याध्यापक व ४२४ शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शिक्षक संख्येचे गणित बिघडले आहे. त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण शिक्षकांवर येत असून त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणिक प्रगतींसाठी शिक्षण विभाग मागील काही वर्षांपासून प्रयत्न करीत आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2021 -


राज्यभरात शिक्षण विभागातील शेकडो जागा रिक्त

Maharashtra Shikshak Bharti 2021 – Primary and secondary education in the state is being administered by the officers in charge. More than 65% of the posts of Group Education Officer, Deputy Education Officer and Lecturer are vacant in the state. In such a situation, with the start of the new academic year, the planning of the new academic year will be at twelve o’clock. Apart from this, it is hampering the process of controlling the arbitrariness of unsubsidized, private schools, which is increasing the problems of parents and teachers.

राज्यातील शैक्षणिक प्रशासनातील संचालक, उपसंचालक, सहसंचालक, शिक्षणाधिकारी यांची ८८५ पदे मंजूर असून, ३०० अधिकारी आज कार्यरत आहेत, म्हणजेच तब्बल ५५५ पदे रिक्त असल्याची माहिती राज्य शिक्षक परिषदेकडून देण्यात आली आहे. याशिवाय गटशिक्षणाधिकाऱ्यांची ६६९ पदे मंजूर असून, केवळ २२७ पदे भरली असून, त्यातील ४८२ पदे रिक्त आहेत. राज्यातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची, सहायक उपशिक्षणाधिकाऱ्यांची ८०० हून अधिक पदे कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. उपशिक्षणाधिकारी (वर्ग २) पदोन्नतीसाठी पात्र व्यक्तींच्या फाईल चाचपडण्याचे काम गेली ३ वर्षे झाली शिक्षण आयुक्तालयात सुरू असल्याचा दावा मुंबई राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केला. २०१७ ,२०१९, २०२० या वर्षांमध्ये शिक्षण आयुक्तालयाने केवळ माहिती मागविली मात्र, पात्र व्यक्तींची यादी मंत्रालयात पोहोचलीच नसल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग ३ चे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र असूनही त्यातही अद्याप केवळ दिरंगाईच सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई विभागाचा कारभार रामभरोसे

मुंबई विभागात एकूण 1804 खासगी शाळा असून अधिकारी वर्गाची मात्र वानवा आहे. त्यामुळे शाळांच्या फीसंदर्भातील तक्रारींचा निपटारादेखील होत नाही. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुंबई विभागीय शिक्षण मंडळात तर गेल्या कित्येक वर्षांपासून अध्यक्ष, सचिव, सहसचिव ही पदे रिक्तच असून या पदाचा कारभार प्रभारी आहे. मुंबई विभागात उपशिक्षणाधिकारी व सहाय्यक उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या 37 पैकी 31 पदे रिक्त आहेत.

  • मुंबई पश्चिम विभागात एक शिक्षण निरीक्षक पद मंजूर असून ते रिक्त आहे.
  • उपशिक्षणाधिकाऱ्यांची 6 पदे मंजूर असून एकाच पदावर अधिकारी कार्यरत आहे.
  • सहाय्याक शिक्षण उपनिरीक्षकांची 8 पदे मंजूर असून दोनच कार्यरत आहेत.
  • मुंबई उत्तर विभागात उपशिक्षणाधिकाऱ्यांची 6 पदे मंजूर असून यातील एकाही पदावर अधिकारी कार्यरत नाही.
  • सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षकांची सातही पदे रिक्त आहेत.
  • मुंबई दक्षिण विभागातही उपशिक्षणाधिकाऱ्यांची 5 पैकी एकच पद कार्यरत आहे.
  • सहाय्यक उपशिक्षणाधिकाऱ्यांची मंजूर 5 पैकी 2 पदेच कार्यरत आहेत.


जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार ४३५ जागा रिक्त

Maharashtra Shikshak Bharti 2021 – There are 23 thousand 435 vacancies for teachers in Zilla Parishad schools. This is having an effect on the Advanced Educational Maharashtra initiative. Check in which districts how much posts are vacant in Maharashtra Shikshak Bharti 2021

राज्यात एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाने गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार ४३५ जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमावर  होत आहे. शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेतही अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.

खासगी अनुदानित शाळांत अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेच्या शाळेतील रिक्त पदांवर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, त्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खासगी अनुदानित शाळांत अतिरिक्त झालेल्या शिक्षकाचे पद पुन्हा निर्माण झाल्यास त्या शिक्षकाचे समायोजन पुन्हा त्यांच्या मूळ शाळेत केले जाणार आहे.

राज्यातील हिंगोली, नांदेड, अकोला, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गाचे एकही पद रिक्त नाही. मात्र, सहावी ते आठवीच्या वर्गासाठी असलेल्या शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत.

चंद्रपूर ७८१, हिंगोली ७४०, अकोला ७२१, नागपूर ५९८, गडचिरोली ५४१, अमरावती जिल्हात गटशिक्षणाधिकारी १४, शिक्षण विस्तार अधिकारी ३५, केंद्रप्रमुख १००, उच्चश्रेणी मुख्याध्यापक १००, विषय शिक्षक २६० सहायक शिक्षक ४२० यांचा समावेश आहे.

झेडपीच्या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे एक हजारापेक्षा जादा पदे रिक्त असणारे जिल्हे
  • पहिली ते पाचवी : ८,२६१
  • सहावी ते आठवी : १४,९९५
  • नववी ते दहावी : १७९
  • पालघर : १,५१९
  • यवतमाळ : १,४०६
  • नाशिक : १,२८०
  • पुणे : १,२१५
  • नांदेड : १,१९७
  • जालना : १,१२५

Maharashtra Shikshak Bharti 2021 – Pavitra Portalt Shikshak Bharti 2021 Update : आताच प्राप्त बातमी नुसार पवित्र पोर्टलंतर्गत खासगी शाळांमधील मुलाखतीसह शिक्षक भरती एप्रिल-मेमध्ये होणार आहे. यात 950 खासगी शाळांमधील 3 हजार पदे भरण्यात येणार आहेत. या संदर्भातील पुढील अपडेट ल्व्क्रक उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्रात पवित्र  पोर्टलद्वारे (Pavitra Portal Bharti 2021) 12 हजार शिक्षकांची भरतीची घोषणा केली होती. उमेदवारांची बऱ्याचदा झालेली आंदोलने, पवित्र पोर्टलमधील तांत्रिक अडचणी, न्यायालयात दाखल झालेली प्रकरणे, धोरणात्मक बांबीवरील प्रलंबित निर्णय या अडथळ्यातून मार्ग काढत पाठपुरावा करत शिक्षण आयुक्‍त यांनी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू ठेवण्याला सतत प्राधान्य दिले आहे.

पहिल्या टप्प्यात मुलाखतीशिवायची गुणवत्तेवर आधारित शिक्षक भरती करण्यात आली. यात 5 हजार 970 उमेदवारांच्या शाळांमध्ये नियुक्‍त्यांसाठी शिफारस केल्या आहेत. यातील अपात्र, गैरहजर या कारणामुळे 1 हजार 500 उमेदवार प्रत्यक्षात शाळांमध्ये रुजू होऊ शकले नाहीत. माजी सैनिकांच्या जागांसाठी पुरेसे उमेदवार मिळालेच नाहीत. यामुळे या जागा कन्व्हर्ट करण्यात येणार आहेत.

सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणातून शिक्षकांच्या जागा भरण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने सामान्य प्रशासन विभागाला पाठवला आहे. मात्र, यावर अद्याप उत्तर आलेले नाही. त्यामुळे काही जागांच्या भरतीला अडचणी निर्माण झाल्या आहेत.
तसेच, दुसऱ्या टप्प्यात खासगी शाळांमधील शिक्षकांची भरती मुलाखती घेऊन करण्यात येणार आहे.


कोणी भरावे प्राधान्यक्रम

  • आता माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक पदासाठी प्राधान्यक्रम देता येईल.
  • ज्यांना यापूर्वी ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्याने उच्च माध्यमिकचे प्राधान्यक्रम आले नव्हते, परंतु त्यांनी पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण केली, त्यांना प्राधान्यक्रम भरता येईल.
  • तसेच माध्यमिक गटासाठी पदवीला ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्याने ज्यांना प्राधान्यक्रम आले नव्हते, त्यांनाही आता मुलाखतीसह पदाचे प्राधान्यक्रम भरता येणार आहे.
  • ज्यांनी यापूर्वीच मुलाखतीसह संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केले, त्यांना प्राधान्यक्रम देण्याची गरज नाही.

प्राथमिक शिक्षकांच्या १५६० जागा आता रिक्त आहेत. तर एकूण जाहीर केलेल्या १२ हजार १४० जागांपैकी पाच हजार ८२२ जागा अजून भरणे बाकी आहे.

6 thoughts on “Maharashtra Shikshak Bharti 2022”

Leave a Comment