SSC CHSL 2021 Admit Card

SSC अंतर्गत ‘या’ महत्वाच्या जागांसाठी एप्रिलमध्ये होणार परीक्षा; डाउनलोड करा प्रवेश पत्र

SSC CHSL 2021 Admit Card – Admission card of CHSL Tier-1 (SSC CHSL Tier I Admit Card 2020) conducted by F Selection Commission has been announced. Candidates applying for this recruitment can download the Admit Card from the official website of the Staff Selection Commission ssc.nic.in. A total of 4726 candidates will be selected through this recruitment. (SSC CHSL tier one admit card 2020 released download from here ssc.nic.in)

SSC CHSL 2021 Admit Card – स्टाफ सिलेक्शन कमिशनच्यावतीने आयोजित सीएचएसएल टियर -1  परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे.

12 ते 27 एप्रिल दरम्यान परीक्षा

स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे सीएचएसएल (Combined Higher Secondary (10+2) Level) परीक्षेचं नोटिफिकेशन 06 नोव्हेंबर 2020 ला जारी करण्यात आलं होते. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 डिसेंबरपर्यंत सुरू होती. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना टियर -1 आणि टियर -2 परीक्षेमध्ये सहभागी व्हावं लागणार आहे. टियर -1 परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे वेबसाईटवर अपलोड करण्यात आलं आहे. ही परीक्षा 12 एप्रिल ते 27 एप्रिल घेण्यात येणार आहे.

अ‌ॅडमिट कार्ड कसं डाऊनलोड करायचं?

  •  स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ssc.nic.in या वेबसाईटला भेट द्या.
  • तिथे “STATUS / DOWNLOAD ADMIT CARD FOR COMBINED HIGHER SECONDARY LEVEL (10+2) EXAMINATION – 2020 (TIER-
  • TO BE HELD FROM 12/04/2021 TO 26/04/2021” यावर क्लिक करा
  • नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉगीन करा
  • अ‌ॅडमिट कार्ड ओपन होईल ते डाऊनलोड करुन प्रिंटआऊट घ्या.

एसएससी सीएचएल टीयर-2 आणि 3

एसएससी सीएचएसएल टियर 1 मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना एसएससी सीएचएल टियर -2 द्यावी लागेल. टीयर -2 परीक्षा हा वर्णनात्मक प्रकारचा पेपर असेल. याच्या पात्रतेवर टीयर-3 असेल, ज्यामध्ये टाइपिंग टेस्ट / स्किल टेस्ट होईल. संपूर्ण प्रक्रियेनंतर पात्र उमेदवारांना भारत सरकारकडून त्यांच्या संलग्न आणि अधीनस्थ कार्यालयात नोकरी दिली जाईल.

SSC CHSL Tier 1 Admit Card  – Download Here

1 thought on “SSC CHSL 2021 Admit Card”

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..