१० वी पास असणाऱ्यांना नोकरीची मोठी संधी, SSC मार्फत निघाल्या 25 हजार जागा!

SSC GD Bharti 2021 Details – सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया शनिवार, 17 जुलै 2021 सुरु झाली आहे. कोरोना महामारीमुळे आलेल्या मंदीच्या काळातही तब्बल 25 हजार 271 जागांसाठी भरती होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासांठी 22 हजार 424 तर महिला उमेदवारांसाठी 2847 जागा राखीव आहेत. काँस्टेबल (जीडी) ,केंद्रीय सशस्त्र पोलिस बल (CAPF), NIA, SAF आणि रायफल मॅन अशा विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 23 यादरम्यान असावे. उमेदवाराचा जन्म 2/08/1998 ते 01/08/2003 यादरम्यान असावा.

कसा कराल अर्ज?

पात्र उमेदवारांनी ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज प्रक्रिया दिनांक – 17 जुलै 2021
  • अर्ज करण्याचीची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021
  • ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख – 2 सप्टेंबर 2021
  • शुल्क भरण्याची शेवटची तारीख – 7 सप्टेंबर 2021

कर्मचारी निवड आयोगामध्ये नोकरीची मोठी संधी, त्वरित ऑनलाईन अर्ज करा 

Leave a Comment