State Government Pending Payment issued 2021-2022

राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम व्याजासह मिळणार !!

State Government Pending Payment issue 2021-2022: Orders have been issued by the state government to provide the third installment of the 7th pay commission with interest to all government and other eligible employees and retired employees in the state on 01st July 2021. All government and other eligible employees in the state and All other subsidized school staff will be paid the third installment of the 7th Pay Commission along with the salary payment for the month of June 2022. Retirement payments will also be made in cash along with the pension for the month of June 2022.

राज्य सरकार पेमेंट प्रलंबित २०२१ – २०२२

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी आली आहे . ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम दि.01 जुलै 2021 पासुन व्याजासह मिळणार आहे . याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन दि.09 मे 2022 रोजी शासन निर्गमित झाला आहे .

या शासन निर्णयान्वये , राज्यातील सर्व शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दि.01 जुलै 2021 रोजी देय असलेला सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता व्याजासह प्रदान करण्याचे आदेश राज्य शासनाकडुन देण्यात आले आहेत.राज्यातील सर्व शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना तसेच राज्यातील सर्व जिल्हा परिषदा , शासन अनुदानित शाळा व इतर सर्व अनुदानित शाळेमधील कर्मचाऱ्यांना माहे जुन 2022 च्या वेतन देयकासोबत 7 वा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता  प्रदान करण्यात येणार आहे . तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना देखिल माहे जुन 2022 च्या निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे .ज्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागु आहे अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम GPF खात्यात जमा करण्यात येणार आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना NPS योजना लागू आहे .अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात येणार आहे .भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणारी थकबाकी रक्कमेवर दि.01 जुलै 2021 पासुन व्याज लागु राहील . व व्याजासह रक्कम GPF खात्यात जमा करण्यात येणार आहे .परंतु ही रक्कम दि.30 जून 2023 पर्यंत GPF खात्यातुन काढता येणार नाही .याबाबतचा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करा .

Leave a Comment