राज्यातील पात्र इच्छूकांनी टुरिस्ट गाईड होण्यासाठी येथे करा अर्ज
Tourist Guide Recruitment 2021 – Free online tourist guide training will be imparted to the youth of the state. As per news Published before a training will be given to 1000 candidates. As of now 700 candidates has been enrolled, if you wanted to become a part of Maharashtra Tourist Department Bharti 2021 can apply here by online mode.
महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक (पर्यटन मार्गदर्शक) ऑनलाईन प्रशिक्षणात आतापर्यंत राज्यातील 700 हून अधिक युवक – युवतींनी सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणात सहभागाची संधी अजूनही उपलब्ध असून पात्र इच्छूकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी केले आहे.
यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन प्रमाणित, परवानाधारक मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील कोणत्याही पर्यटनस्थळांवर (पुरातत्व विभागाची सर्व पर्यटनस्थळे वगळता) मार्गदर्शक सेवा देण्याची परवानगी दिली जाईल. अधिक माहितीसाठी http://iitf.gov.in पोर्टलवर भेट द्यावी किंवा योगेश निरगुडे, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्याशी 022-62948817 या क्रमांकावर किंवा diot@maharashtratourism.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने तयार केलेला मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम पर्यटन संचालनालयाने स्वीकारला आहे. http://www.iitf.gov.in पोर्टलवर मूळ ऑनलाइन कोर्स हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये विविध पर्यटन पैलूंचे सात मॉड्यूल आहेत. एकूण कार्यक्रम नोंदणी शुल्क 2 हजार रुपये आहे. एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवार तसेच नंदुरबार, वाशिम, गडचिरोली व उस्मानाबाद या आकांक्षीत जिल्ह्यांचे अधिवासित रहिवाशांना नोंदणी शुल्कातून सूट देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क 500 रुपये इतके आहे.
उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि 18 ते 40 वयोगटातील असावा. उमेदवार 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल तर त्याने किमान दहावी उत्तीर्ण असावे, अशा काही अटी या प्रशिक्षणासाठी आहेत, असे डॉ. सावळकर यांनी सांगितले.
एक हजार युवक युवतींना राज्यात टुरिस्ट गाईड होण्याची संधी !
Tourist Guide Recruitment 2021 – Candidates who are interested in tourism, here is a great news for them. As State Government is Planning to Recruit 1000 tourist guides in the state. Under this scheme, free online tourist guide training will be imparted to the youth of the state. After the training, a certificate will be given to the Government of Maharashtra as a tourist guide and also an opportunity to work as a tourist guide in a tourist destination. Read How to Register For Tourist Guide Bharti 2021, Age Limit, Educational Criteria for Tourist Guide Recruitment 2021 are as given below:
Tourist Guide Recruitment 2021
राज्याच्या विविध भागातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने तयार केलेल्या ऑनलाईन आयआयटीएफ टुरिजम फॅसिलिटेटर सर्टिफिकेशन प्रोग्रामअंतर्गत (Online IITF Tourism Facilitator Certification Program) मोफत पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Incredible India Tourist Facilitator (IITF) Certification Programme
प्रशिक्षणानंतर महाराष्ट्र शासनाचं टुरीस्ट गाईड म्हणून प्रमाणपत्र दिलं जाईल तसंच पर्यटनस्थळी टुरीस्ट गाईड म्हणून काम करण्याची संधी मिळेल, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.
विद्यार्थी तथा उमेदवारांना त्यांच्या वेळेनुसार आणि ते ज्या ठिकाणी असतील तेथून, आपल्या सवडीनुसार हे ऑनलाइन शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. http://iitf.gov.in या पोर्टलवर हिंदी आणि इंग्रजी भाषेत विविध पर्यटन विषयाच्या महत्त्वाच्या काही अभ्यासक्रमांसोबत सात मॉड्युल्ससह मूलभूत ऑनलाइन कोर्स उपलब्ध आहे.
नोंदणी शुल्क (Registration Fee For IITG)
- एकूण कार्यक्रम नोंदणी शुल्क दोन हजार रुपये असून परीक्षा शुल्क 500 रुपये आहे
मूल्यांकन प्रशिक्षण व पर्यटनस्थळांना सेवा देण्याची संधी (IITF Online Registration 2021)
आयआयटीएफचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राज्याच्या पर्यटन संचालनालयामार्फत एक दिवसाचे मूल्यांकन प्रशिक्षण घेतले जाईल आणि त्यानंतर “महाराष्ट्र पर्यटन परवानाकृत मार्गदर्शक” अशा स्वरूपात या उमेदवारास अंतिम प्रमाणपत्र देण्यात येईल. यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्रातील सर्व पर्यटनस्थळे (केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखालील पर्यटनस्थळे वगळता) कोणत्याही पर्यटनस्थळांना सेवा देण्याची परवानगी दिली जाईल
जाणून घ्या काय असेल पात्रात ?Tourist Guide Bharti 2021
यामध्ये सहभागासाठी 18 ते 40 वयोगटातील उमेदवारांनी किमान बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या उमेदवाराचे किमान दहावी श्रेणी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents