UNANI Vibhag Bharti 2021

युनानी विभागातील रिक्त पदे तातडीने भरा, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे निर्देश !

UNANI Vibhag Bharti 2021 -Minister of State for Revenue and Rural Development Abdul Sattar directed to fill up the vacancies immediately. As Class-3 posts have been vacant in 18 places for many years. Read Further details about UNANI Vibhag Bharti 2021 at below

मराठवाड्यातील शासकीय युनानीचे २६ दवाखाने आहेत. मात्र अनेक वर्षांपासून १८ ठिकाणी वर्ग-३ ची पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे त्वरित भरून इमारतीच्या नूतनीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. गुरुवारी (दि.५) मंत्रालयातील त्यांच्या दालनात घेतलेल्या बैठकीदरम्यान ते बोलत होते. बैठकीला ग्रामविकास विभागाचे अधिकारी तसेच ऑल इंडिया युनानी तिब्बि काँग्रेसचे अध्यक्ष डाॅ. शकील अहमद खान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

UNANI Vibhag Bharti 2021

मराठवाड्यातील दुर्गम भागात तसेच इतर ठिकाणी २६ शासकीय दवाखाने आहेत. या दवाखान्यात युनानी वर्ग ३, औषध निर्माते, परिचारिका आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. ही पदे भरण्याची संघटनांचे अनेक दिवसांपासूनची मागणी होती. त्या अनुषंगाने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी अधिकारी आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. रिक्तपदे तात्काळ भरण्याचे आश्वासन राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी दिले.

UNANI Vibhag Recruitment 2021

मराठवाड्यातील दुर्गम भागात तसेच इतर ठिकाणी शासकीय युनानी दवाखान्यांच्या इमारतींची अवस्था दयनीय झाली आहे. यासंदर्भात तत्काळ माहिती घेऊन इमारतीच्या नूतनीकरणा संदर्भात दहा दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्‍यमंत्री सत्तार यांनी ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रामीण भागातील तसेच इतर ठिकाणी डॉक्टर उपचार करण्यास नकार देत होते. मात्र खाजगी यूनानी हकीम यांनी या काळात अतिशय उत्कृष्ट काम केले. त्यामुळे दुर्गम भागातील अनेकांचे प्राण वाचविण्याचे चांगले काम त्यांनी केले असल्याचे राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. मालेगाव काढा हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे युनानी दवाखान्यांना नवसंजीवनी देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment