WRD Maharashtra Bharti 2021

जायकवाडी पाटबंधारे विभागात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त

WRD Maharashtra Bharti 2021 – The Jayakwadi Irrigation Department, currently has a large number of vacancies for officers and employees. Therefore, despite the presence of water, it is not being planned properly. Read below Update:

मराठवाड्याची भाग्य रेषा म्हणून परिचित असलेल्या जायकवाडी पाटबंधारे विभागात सध्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. त्यामुळे पाणी असूनही त्याचे योग्य पध्दतीने नियोजन होत नसल्याचे दिसून येत आहे.

उन्हाळी पिकांसाठी पाण्याच्या मागणीमध्ये मोठी वाढ होणार आहे. त्यासाठी पुरेशा प्रमाणात कर्मचारी वर्गाची आवश्यकता भासणार आहे. म्हणूनच परभणी या ठिकाणी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, परभणी पाटबंधारे मंडळ कार्यालयाची स्थापना करावी. पुरेशा प्रमाणात कर्मचाऱ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात यावी, ही आमची मागणी आहे. – अभिजित जोशी-धानोरकर, भागीरथ पाणी परिषद, परभणी

जायकवाडी पाटबंधारे प्रकल्प बुधवारी (ता. 24) फेब्रुवारी रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आला. जायकवाडी प्रकल्पानंतर मराठवाड्याचे हरीत सुजल सुफलाम मराठवाड्याचे स्वप्न जायकवाडी प्रकल्पावरच अवलंबून आहे. यावर्षी महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस झालेला आहे. जायकवाडी प्रकल्पात देखील समाधानकारक पाणीसाठी असून यापुढे देखील उन्हाळी पिकांसाठी अजून पाच पाणी पाळ्या देण्याचे सिंचन विभागाने निश्चित केले आहे. जायकवाडीचे सर्वाधिक लाभक्षेत्र परभणी जिल्ह्यात आहे. यासाठी पूर्वीच आपल्याकडे परभणी येथे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अथवा परभणी पाटबंधारे मंडळ स्थापन करावे, अशी मागणी भागीरथ पाणी परिषदेचे अभिजित जोशी- धानोरकर यांनी केली होती.

मंजुर पदांची संख्या 840 असून त्यापैकी 646 पदे सध्या रिक्त

सर्वाधिक लाभक्षेत्र असलेल्या परभणी जिल्ह्यात जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोन येथे सिंचन व्यवस्थापन आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या सुधारीत आकृती बंधानुसार जानेवारी 2021 अखेर आकृतीबंधानुसार मंजुर पदांची संख्या 840 असून त्यापैकी 646 पदे सध्या रिक्त आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नवीन सिंचन व्यवस्थापनाचे कंत्राटीकरण करून सिंचन क्षमतेत वाढ करण्याचे धोरण आखण्यात आले होते. पंरतू त्या दृष्टीने देखील अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

सिंचन क्षमतेवर रिक्त पदांचा विपरित परिणाम

97 हजार 400 हेक्टर सिंचन क्षमता असणाऱ्या लाभक्षेत्रासाठी केवळ प्रत्यक्ष कार्यरत पदसंख्या 194 असून त्यात देखील कार्यकारी अभियंता 1, उप कार्यकारी अभियंता 1, उपविभागीय अभियंता 5, शाखा अभियंता 25, कालवा निरीक्षक 232, मोजणीदार 106, स्थानिक अभियांत्रिक सहाय्यक 30 इतकी पदे रिक्त आहेत. त्यामुळे सिंचन क्षमतेवर याचा विपरित परिणाम दिसून येत आहे.


जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागात अनेक पदे रिक्त

WRD Maharashtra Bharti 2021 – There are 104 vacancies in the technical category from Deputy Chief Executive Officer to Assistant Applicant in the district. On the one hand, there are signs of water scarcity in the District. More update on WRD Maharashtra Bharti 2021  are as given below:

तांत्रिक संवर्गातील तब्बल १०४ पदे रिक्त

एकीकडे पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे पाणी टंचाईवर उपाययोजना करणाऱ्या विभागांमध्येच रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे.  जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी ते सहायक आवेदक अशी तांत्रिक संवर्गातील तब्बल १०४ पदे रिक्त आहेत.या रिक्त पदांमुळेच रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाईवर कायमची मात्रा मिळविण्यात आणि पाणी योजना राबविण्यात रायगड जिल्हा परिषद प्रशासनाला जंग पछाडावे लागत आहे.

लघू पाटबंधारे विभागाची अवस्था बिकट

जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाची अवस्था बिकट आहे. या विभागासाठी ६४ पदे मंजूर आहेत. या पदांपैकी एकही पद भरलेले नाही. या रिक्त पदांमध्ये कार्यकारी अभियंता १, उपकार्यकारी अभियंता १, उप अभियंता स्थापत्य ८, कनिष्ठ अभियंता स्थापत्य मुख्यालय ४, कनिष्ठ अभियंता स्थापत्य जिल्हा परिषद उपविभाग ४०, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक उपविभाग ८, आरेखक १ आणि कनिष्ठ आरेखक १ यांचा समावेश आहे.

रा. जि. प.च्या ग्रामीण पुरवठा विभागामध्ये ४० पदे रिक्त

रा. जि. प.च्या ग्रामीण पुरवठा विभागामध्ये ७५ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी केवळ ३५ पदे भरण्यात आली आहेत. ४० पदे रिक्त आहेत. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी १, कार्यकारी अभियंता १, उपअभियंता स्थापत्य ४, उपअभियंता यांत्रिकी १, सहायक भूवैज्ञानिक १, कनिष्ठ भूवैज्ञानिक २, कनिष्ठ अभियंता स्थापत्य मुख्यालय ३, कनिष्ठ अभियंता स्थापत्य जिल्हा परिषद उपविभाग १५, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ३, आरेखक १, संगणक १, वायू सांपडिक चालक २, रिंगमन १, जॅक हॅमर ड्रिलर २ आणि सहाय्यक आवेदक २ यांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार करून जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे आणि विज्ञानावरील जनतेची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे.


WRD Maharashtra Bharti 2021 Quality Control Board, Pune has issued new notification under Water Resources Department Maharashtra. WRD Invites applications for the post of Branch Engineer. The required number of candidates for this post is 10 under Jalsampada Vibhag Maharashtra Bharti 2021. Candidates who are retired from Government/Semi Government Organization as Brach Engineer in Civil are eligible to apply. For this they have to send their application at mentioned address on or before 12th February 2021. Additional details about WRD Maharashtra Bharti 2021 are as given below:

WRD Maharashtra Recruitment 2021 – गुण नियंत्रण मंडळ, पुणे द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे शाखा अभियंता (स्थापत्य) पदाच्या एकूण 10 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – शाखा अभियंता (स्थापत्य)
  • शैक्षणिक पात्रता – शासकीय / निम शासकीय सेवेतून सेवानिवृत्त
  • रिक्त पदे – 10 पदे
  • शैक्षणिक पात्रता –
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण –पुणे
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ, गुणवत्ता भवन, बंगला नं २, जेल रोड पुणे -411006
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2021
  • अधिकृत वेबसाईट https://wrd.maharashtra.gov.in/

रिक्त पदांचा तपश%5ल – WRD Maharashtra Vacancy 2021

WRD Maharashtra Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Quality Control Board Pune Vacancy 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..