Zilla Purvatha Adhikari Bharti 2022

Zilla Purvatha Adhikari Bharti 2022 : Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal told the assembly that the process of filling up the vacancies in the district supply officer cadre is underway and more follow up will be done in this regard. The starred question regarding the missing ration card from Beed District Public Distribution Supply Department was raised by Assembly members Sandeep Kshirsagar, Prashant Bamba and Prakash Solanke.

जिल्हा पुरवठा अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु असून याबाबत अधिक पाठपुरावा करण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी विधानसभेत सांगितले.

बीड जिल्हा सार्वजनिक वितरण पुरवठा विभागाकडून शिधापत्रिका गहाळ झाल्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य संदीप क्षीरसागर, प्रशांत बंब आणि प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला होता.

श्री. छगन भुजबळ Chhagan Bhujbal म्हणाले की, बीड तहसील कार्यालयामधून 5 हजार 498 शिधापत्रिका विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता वितरित झाल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी बीड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दोषी असलेल्या तत्कालिन सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार, तत्कालिन अव्वल कारकून यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे देण्यात आला आहे. त्याशिवाय बीड जिल्हा पुरवठा अधिकारी हे रिक्त पद भरण्याची कार्यवाही देखील सुरु आहे.

Leave a Comment