हायकोर्टानं रद्द केली 11th प्रवेश परीक्षा रद्द- CET Exam Cancelled

राज्यात 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा महत्वाचा निकाल दिला. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.राज्य सरकारनं अकरावी सीईटी परीक्षेसाठी काढलेला अध्यादेश मुंबई हायकोर्टानं रद्द केला आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल वाचून पुढील निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी प्रस्तावित सीईटी (अकरावी सीईटी )उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली. अकरावी सीईटी न घेता इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा दणका मिळाला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आयसीएसई बोर्डाच्या एका विद्यार्थिनीनं सीईटी परीक्षेसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती.

सीईटी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित होता. त्यामुळे आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची अडचण होण्याची शक्यता होती. आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाची माहिती नाही. त्यामुळे परीक्षेत त्यांना कमी गुण मिळण्याचा आक्षेप उपस्थित करण्यात आला होता.


11th CET Exam 2021 -There was a lot of confusion among students and parents as to how the 11th admission would take place. Finally, the school education department has announced its decision to conduct a separate CET examination for the eleventh admission process. The examination for the eleventh admission will be completely optional. The school education department has given information about this.

Application For Common Entrance Test for 11th std Admission Year 2021

Students should note that, for SSC State Board students who have appeared in 2021 will be allowed to submit their CET application from 3:00 PM today (26-07-2021). Other Board students and SSC State Board students who have appeared before 2021 will be allowed from Wednesday (28-07-2021), 03:00 PM onwards

 राज्य मंडळाच्या नव्या वेबसाइटवर आजपासून (२६ जुलै) दुपारी ३ वाजल्यापासून अकरावी सीईटीची नोंदणीला सुरुवात होणार आहे. याआधी २० जुलै सकाळी ११.३० पासून ही नोंदणी करता येत होती. पण तांत्रिक अडचणींमुळे दुसऱ्या दिवशीच वेबसाइट बंद करण्यात आली. आज देण्यात येणारी नवी लिंक २ ऑगस्ट रात्री ११.५९ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.

खालील स्टेप्स फॉलो करुन तुम्ही अकरावी सीईटीची नोंदणी करु शकता. याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.

स्टेप १- सर्वप्रथम मंडळाची अधिकृत वेबसाइट http://cet.11thadmission.org.in वर लॉगिन करा
स्टेप २- ईमेल आयडी (असल्यास) टाका
स्टेप ३- आधीचा मोबाईल क्रमांक अपडेट करा किंवा नव्याने नोंदवा
स्टेप ४- परीक्षेचे माध्यम निवडा. सेमी इंग्रजीचा पर्याय निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांच्या प्रश्नासाठी इंग्रजी माध्यम असणार आहे. तसेच सामाजिक शास्त्र (इतिहास आणि राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यांना एक माध्यम निवडावे लागेल.
स्टेप ५- परीक्षा केंद्र निवडण्यासाठी तात्पुरत्या किंवा कायमच्या राहण्याच्या पत्त्यावरुन जिल्हा आणि तालुका त्यानंतर शहराचा विभाग (WARD)निवडा.
स्टेप ६- दहावीचा अर्ज भरताना SEBC प्रवर्गाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना सुधारित तरतुदीनुलाप खुला प्रवर्ग निवडावा लागेल.

ज्या विद्यार्थ्यांनी २० जुलै ते २१ जुलै या कालावधीमध्ये अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली असेल त्यांना वेबसाइटवर अर्ज क्रमांक टाकून पूर्वीचा अर्ज पाहता येईल. अशावेळी विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नसल्याचे राज्य शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण ही वेबसाइटवर अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली नसले तर विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार आहे.

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तर सीईबीएसई, आयसीएसई आणि इंतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना १७८ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या विद्यार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया २८ जुलैला दुपारी ३ वाजल्यापासून सुरु होईल. याची माहिती त्यांना स्वतंत्रपणे देण्यात येईल.

Maharashtra 11th CET 2021

The application process for the CET will start on July 19, for which a separate portal will be set up, the board said. A link to the portal will be made available on the board’s official website, and students will be able to decide whether to take the CET Or NOT

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील विद्यार्थी ज्याची वाट पाहत होते त्या ११ वीच्या सीईटी परीक्षेची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरात ही परीक्षा २१ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २० जुलै सकाळी ११.३० वाजल्यापासून ते २६ जुलै पर्यंत अर्ज भरता येणार आहे. हा अर्ज ऑनलाइन माध्यमातून भरायचा आहे.

अकरावी प्रवेशांसाठी यंदा प्रथमच घेण्यात येणारी सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) २१ ऑगस्टपर्यंत घेणार असल्याचे सूतोवाच राज्य माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी केले. सीईटीसाठी अर्ज प्रक्रिया १९ जुलैला सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. या पोर्टलची लिंक मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येणार असून, सीईटी द्यायची की नाही, हे विद्यार्थ्यांना ठरवता येणार आहे.

‘सीईटी’ दृष्टीक्षेपात

 • १९ जुलैला अर्ज प्रक्रिया सुरू होणार.
 •  राज्य माध्यमिक मंडळाच्या वेबसाइटद्वारे ‘सीईटी’साठी स्वतंत्र पोर्टल.
 •  २१ ऑगस्ट पर्यंत परीक्षा घेण्यात येईल.
 • सीईटीसाठी वेगळा अभ्यासक्रम देणार.
 •  सीईटी देणे बंधनकारक नाही.
 •  सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश दुसऱ्या टप्प्यात.
 • सीईटी ऑफलाइन पद्धतीने होणार.

२१ ऑगस्ट २०२१ रोजी परीक्षा -maharashtra 11th cet 2021

राज्यभराताली विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या इयत्ता ११ वीच्या सीईटी परीक्षेची तारखी अखेर आज जाहीर झाली आहे. २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत ही परीक्षा राज्यभरात पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना २० जुलै सकाळी ११.३० वाजेपासून २६ जुलैपर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी असेल?

 •  अकरावीची प्रवेशासाठी CET परीक्षा
 • इयत्ता 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षा
 • प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
 • गुण – 100
 • बहुपर्यायी प्रश्न
 • परीक्षा OMR पद्धतीने
 • परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी
 • कॉलेजमध्ये प्रवेशाचे निकष काय?
 • CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश
 • CET परीक्षा देणाऱ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य
 • त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश
 • CET परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता 10 वीच्या पद्धतीनुसार

The CET exam will be held in the last week of July or the first week of August. Know More About 11th CET OCR Format, 11th CET Exam Pattern 2021, 11th CET Syllabus 2021 at below

11th CET Exam 2021

11th CET Exam Pattern – 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ परीक्षा परिषदेमार्फत आयोजित होणाऱ्याअकारावी सामाईक प्रवेश परीक्षेचे (CET) स्वरुप जाहीर झाले आहे. अकरावी प्रवेशासाठी होणारी परीक्षा पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. सामाईक प्रवेश परीक्षा ही राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे. या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेत इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. ही परीक्षा ऑफलाईन स्वरुपात घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Multiple Choice Objective Type Question)स्वरुपाचे असणार आहे

11th CET Exam Pattern

या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. आणि परीक्षेचा कालावधी २ तासांचा असणार आहे. परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ/परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येईल.

11th CET Exam Dates

इयत्ता 10 वी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता इयत्ता 11वी प्रवेशासाठी एकवाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक(optional) सामाईक प्रवेश परीक्षा(CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवड्यात आयोजित केली जाईल.

फीस भरावी लागणार का ? 11th CET Exam Fee

दहावीची परीक्षा फी भरलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी सामाईक परीक्षेसाठी कोणते शुल्क भरावे लागणार नाही. असे असले तरी CBSE, ISCE आणि सर्व आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

 

जाहिरात वाचा - CET Advt

? अर्ज करा

Leave a Comment