Advertisement

HDFC Bank Bharti 2021

देशातील खासगी क्षेत्रातील मोठी बँक HDFC मध्ये होणार भरती.

HDFC Bank Bharti 2021 – HDFC, the country’s largest private sector lender, has decided to expand the scope of MSMEs. The bank will appoint 500 additional Relationship Managers in the current financial year. Following these appointments, the number of employees in the bank’s micro, small and medium enterprises (MSMEs) will increase to 2,500. Read More about HDFC Bank Bharti 2021, HDFC Recruitment 2021

HDFC Recruitment 2021

देशातील खासगी क्षेत्रातील मोठी कर्जदाता बँक एचडीएफनं MSME ची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात बँक ५०० अतिरिक्त Relationship Managers ची नियुक्ती करणार आहे. या नियुक्तींनंतर बँकेच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (MSME) शाखेतील कर्मचाऱ्यांची संख्या २,५०० होणार आहे.

सध्या बँकेच्या एमएमई शाखेचा विस्तार ५४५जिल्ह्यांपर्यंत आहे. या ठिकाणी बँकेचे व्यवस्थापक आणि निरिक्षकही आहेत. चालू आर्थिक वर्षात बँकेचा अधिक विस्तार करण्याचा मानस असून ५७५ जिल्ह्यांपर्यंत बँक पोहोचणार आहे. बँकिंग व्यवसाय वित्त विभागाचे वरिष्ट कार्यकारी उपाध्यक्ष सुमंत रामपाय यांनी पीटीआयशी यासंदर्भात भाष्य केलं. “आम्ही आमचा विस्तार ५४५ जिल्ह्यांवरून ५७५ जिल्ह्यांपर्यंत करत आहोत. चालू आर्थिक वर्षात आम्ही एमएसएमई शाखेत ५०० पेक्षा अधिक लोकांची नियुक्ती करणार आहोत,” असं ते म्हणाले.  ५०० जणांच्या नियुक्तीनंतर या विभागातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २५०० किंवा त्यापेक्षा थोडी अधिक होईल, असंही रामपाल यांनी स्पष्ट केलं.

HDFC Bank Bharti 2021

MSME अंतर्गत घाऊक आणि किरकोळ कर्जाचा समावेश केल्यानंतर, मार्च २०२१ च्या तिमाहीत बँकेचे MSME कर्ज खाते थोडं वाढून २,०१,८३३ कोटी रुपये झाले, जे डिसेंबर २०२० मध्ये २,०१,७५८ कोटी रुपये होते. बँकेचा MSME पोर्टफोलिओ कापड, बांधकाम, कृषी-प्रक्रिया, रसायने, ग्राहकोपयोगी वस्तू, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, ऑटो पार्ट्स, फार्मा आणि पेपर उद्योग यासारख्या क्षेत्रांमध्ये पसरलेला असल्याची माहिती रामपाल यांनी दिली.  त्यात घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, वितरक आणि स्टॉकिस्ट यांचा समावेश आहे. बँक गेल्या दोन वर्षांपासून या क्षेत्राकडे विशेष लक्ष देत आहे आणि साथीच्या आजारानंतर सरकारने छोट्या व्यापाऱ्यांसाठी कर्ज सुविधा वाढवल्याने या क्षेत्राच्या वाढीला गती मिळाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Leave a Comment