नवीन वर्षात येणार भरपूर नोकरी संधी !

2021-New Job Opportunities  – भारतीय कॉर्पोरेट जगतात सुधारणा होण्याचे मजबूत संकेत दिसत आहेत. एका सर्वेक्षणामुळे याला आणखी बळ मिळालं आहे. या सर्वेक्षणानुसार, नवीन वर्ष २०२१ च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च दरम्यान कंपन्यांनी आधीच्या तिमाहीच्या तुलनेत अधिक नियुक्त्यांची शक्यता वर्तवली आहे.

मॅनपॉवर ग्रुपच्या रोजगार सर्वेक्षणात देशभरातील १,५१८ कंपनी मालकांचे विचार घेतले गेले. सर्वेक्षणात असं म्हटलंय की २०२१ च्या पहिल्या तिमाहीत रोजगाराचे चित्र चांगले राहील. पहिल्या तिमाहीत वित्त, विमा, रिअल इस्टेट किंवा खाण, बांधकाम क्षेत्रांमुळे रोजगाराच्या शक्यता वाढणार आहेत. मात्र अन्य सर्व क्षेत्रांमध्ये नोकऱ्या वाढणार नाहीत, असं हा सर्व्हे सांगतो.

मॅनपॉवर ग्रुप इंडियाचे समूह प्रोजेक्ट डायरेक्टर संदीप गुलाटी म्हणाले, ‘कॉर्पोरेट भारतात मजबूत सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत आणि मार्केटमधील एकूण चित्र सकारात्मक आहे.’ सरकार करत असलेल्या उपाययोजना आणि धोरणांकडे लक्ष दिल्याने खासगी क्षेत्रालादेखील प्रोत्साहन मिळत आहे. आत्मनिर्भर भारत अभियान क्षेत्रालादेखील प्रोत्साहन दिले जात आहे, असेही ते म्हणाले.

सणासुदींच्या वातावरणानंतर हळूहळू अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे. कंपन्या पुढील सहा ते नऊ महिन्यांमध्ये काम देण्यासंदर्भात आशावादी दृष्टिकोन दाखवत आहेत.

3 thoughts on “नवीन वर्षात येणार भरपूर नोकरी संधी !”

Leave a Comment