भारतीय विमानतळ प्रधिकरणात ४९० पदांची मोठी भर्ती सुरु – AAI Recruitment 2024

भारतीय विमानतळ प्रधिकरणात ४९० पदांची मोठी भर्ती सुरु –

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरी करण्याची संधी आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरतीची नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. त्या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये एकूण 490 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये आर्किटेक्चर, सिव्हिल इलेक्ट्रिकल, इलेक्टॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील ज्युनिअर एक्झिक्युटिव पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी पात्रतेनुसार दिनांक 2 एप्रिल 2024 पासून एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.

विमान प्राधिकरणाच्या या विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवार हा ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर) पदासाठी आर्किटेक्चर (Architecture) इंजिनिअरिंग पदवी प्राप्त असावी, तर ज्युनियर एक्झिक्युटिव सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल पदसाठी B.E./B.Tech Civil & Electrical उत्तीर्ण असावा. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स विभागातील एक्झिक्युटिव पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता Electronics/ Telecommunications / Electrical विषयातून B.E./B.Tech उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर कॉप्युटर विभागासाठीComputer Science/ Computer Engineering/ IT/ Electronics मधून B.E./B.Tech किंवा MCA झालेले असावे, तसेच चारही पदासाठी उमेदवाराने GATE 2024 परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

या भरतीसाठी उमेदवारांचे वय हे दिनांक 01 मे 2024 रोजी 27 वर्षांपर्यंत असावे. यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे अधिकच्या वयाची सूट देण्यात आली आहे. तर OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे. तसेच या भरतीसाठी जनरल आणि ओबीसी गटातील उमेदवारांकडून 300 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 01 मे 2024 पर्यंत आहे.

या भरतीची निवड प्रक्रिया, आरक्षण, यासह इतर निकष जाणून घेण्यासाठी AAI च्या अधिकृत संकेतस्थळास (https://www.aai.aero/) भेट द्यावी.

Leave a Comment