आरोग्य विभागा भरती परीक्षा – महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा !!
Arogya Vibhag Exam Imporatnt Things – महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी उद्या लेखी परीक्षा होणार आहे. आरोग्य विभागाची गट क परीक्षा राज्यभरातील विविध केंद्रांवर उद्या घेण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात हा परीक्षा घेण्यात येणार आहे. कोरोना काळात आरोग्य विभागाची गट क परीक्षा होत असल्यानं परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी काळजी घेणं गरजेचे आहे. परीक्षा देण्यासाठी जाण्यापासून परीक्षा केंद्रात परीक्षा देताना काय परीक्षार्थींनीकाही काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहे.
-
आरोग्य विभाग भरती परीक्षेत गोंधळ; या या केंद्रावरील विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त वेळ…
-
महाराष्ट्र सार्वजनीक आरोग्य विभाग ग्रुप ड, क व अ पदभरती साठी परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम डाउनलोड करा
प्रवेशपत्र आणि ओळखीच्या पुराव्याच्या प्रती
आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांच्या परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींनी वेबसाईटवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन प्रिंटआऊट काढून सोबत ठेवावी. त्यासोबतच आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड आणि फोटोसह राष्ट्रीयीकृत बँक पासबुक इत्यादी मुळ ओळखपत्र सोबत असणं आवश्यक आहे.
वेळेपूर्वीचं परीक्षा केंद्रावर पोहोचा
कोरोना विषाणू संसर्ग असल्यानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा खासगी रिक्षा, जीप यांच्या वेळांमध्ये बदल झालेला आहे. एसटीसह इतर वाहनांच्या फेऱ्या पूर्ण क्षमतेनं सुरु नाहीत त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी सकाळी लवकरच घरातून निघून परीक्षा सुरु व्हायच्या किमान 1 तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचावं. परीक्षा केंद्रावर जाताना तुमचं जेवण, अतिरिक्त मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बाटली, ब्लॅक पेन या गोष्टी सोबत घेऊन जावा.
परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर काय काळजी घ्यावी
परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर तिथं तुमच्याकडून कोरोनासंदर्भातील नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाईल याची खबरदारी घ्या. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा.
परीक्षा कक्षात पोहोचल्यावर काय कराल?
परीक्षार्थींनी परीक्षा कक्षात पोहोचल्यानंतर बैठक व्यवस्था पाहून घ्या. तुमची बसण्याची जागा स्वच्छ आहे का पाहावं. तुम्ही ती जागा सॅनिटायझरचा वापर करुन स्वच्छ करुन घ्यावी. परीक्षा कक्षातील स्वच्छेतेची परिस्थिती खूपच खराब असल्यास तेथील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्या. पर्यवेक्षकाकडून उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका घेताना सुरक्षित अंतर राहिल याची काळजी घ्या. पेपर संपल्यानंतर व्यवस्थितपणे तो परत करा.
जेवण
दुपारच्या सत्रात परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी घरुन जेवणाचा डबा आणला असल्यास स्वच्छ ठिकाणी बसून खावा. दुसऱ्या मित्रांचा डबा खाणं किंवा पाणी पिणं टाळावं.
पेपर संपल्यानंतर
आरोग्य विभागाची परीक्षा संपल्यानंतर तुम्ही कोरोना संपलेला नाही हे विसरु नका. परीक्षा संपल्यानंतर अनेकदा ताण कमी झाल्याच्या भावनेनं हॉटेलमध्ये जाणं, चहा पिणं, आईस्क्रीम खाणं या गोष्टी करत असतो. मात्र, यावेळी या गोष्टी टाळा. पेपर संपल्यानंतर जसं परीक्षा केंद्रावर पोहोचला त्याचप्रमाणं घरी परत जा.
अफवांवर विश्वास ठेवू नका
आरोग्य विभागातील भरतीच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांनी प्रवेश पत्राबरोबरच आपले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
आरोग्य विभागानं दिलेल्या सूचना पाळा
परीक्षेबाबत वेळोवेळी संकेतस्थळावर दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याबाबत आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आवाहन केले आहे त्याचं पालन करा.
हेल्पलाईनवर संपर्क साधा
परीक्षेच्या अनुषंगाने काही गैरप्रकारांची माहिती मिळाल्यावर तात्काळ ०२०-२६१२२२५६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचबरोबर नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी. याबाबत arogyabharti2021@gmail.com वर माहिती देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.