Arogya Vibhag Bharti 2021

Table of Contents

आरोग्य विभागातील रखडलेली मेगाभरतीची जाहिरात याच महिन्यात; लेखी परीक्षा ७ ऑगस्ट पासून 

Arogya Vibhag Bharti 2021 – Mega Bharti in the Health Department of the Zilla Parishads in the Maharashtra state is  resuming , it has been decided to fill the posts in the SEBC category for the Maratha community from the open or EWS category. The Rural Development Department issued the order on Monday. Read Below details on it

मार्च २०१९ मध्ये मेगाभरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्यात जिल्हा परिषदांमधील आरोग्य पर्यवेक्षक, औषधी निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची पदे भरण्यासाठीची ही जाहिरात होती. त्यासाठीची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाबाबतच्या अलीकडच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने हा नवा आदेश काढला आहे.

ग्रामविकास विभाग आदेशाबद्दल 

राज्यातील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागातील रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करताना मराठा समाजासाठीच्या एसईबीसी प्रवर्गातील पदे ही खुल्या वा ईडब्ल्यूएस प्रवर्गातून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाने सोमवारी याबाबतचा आदेश काढला.

कोण अर्ज करू शकतात 

या आदेशानुसार, ज्या उमेदवारांनी सदर पदाकरिता अर्ज भरलेला आहे ते सर्व भरतीसाठी पात्र असतील. एसईबीसी आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातून त्यांना संधी दिली जाईल. एसईबीसी आरक्षणामधून ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे त्यांनी १ जुलै २०२१ ते २१ जुलै २०२१ दरम्यान त्यांना त्यांचा अर्ज खुल्या प्रवर्गात ठेवायचा आहे की, आर्थिकदृष्ट्या मागास (ईडब्ल्यूएस) प्रवर्गात याचा पर्याय देणे आवश्यक राहील. जे पर्याय देणार नाहीत ते खुल्या प्रवर्गात असल्याचे समजले जाईल.

आरोग्य विभाग लेखी परीक्षेचे वेळापत्रक 

 • उमेदवारांना लेखी परीक्षा ओळखपत्र १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाइन दिले जाईल.
 • ७ ऑगस्ट २०२१ रोजी आरोग्य पर्यवेक्षक, औषधी निर्माण अधिकारी पदासाठी लेखी परीक्षा होईल.
 • ८ ऑगस्ट २०२१ रोजी आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी लेखी परीक्षा होईल.
 • ९ ऑगस्ट २०२१ ते २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती आदेश दिले जातील

दिव्यांगांसाठीचे आरक्षण २०१६च्या कायद्यानुसार  ३ टक्क्यांवरून ४ टक्के झालेले असल्याने सुधारित जाहिरात ही २९ किंवा ३० जून रोजी काढण्यात येणार आहे. नव्याने समाविष्ट पदांसाठी दिव्यांगांना १ जुलै ते २१ जुलै २०२१ दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येतील.


आरोग्य विभागात 2 हजार 226 पदांची भरती होणार !

Arogya Vibhag Bharti 2021  The 2,226 posts of Pharmaceutical Officer, Medical Officer, Health Assistant, Assistant Nurse, Multipurpose Health Worker, Assistant Nurse Maternity will be filled.

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागात 2 हजार २२६ पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नंदुरबार, बुलढाणा, वर्धा, नागपूर, गोंदिया, संभाजीनगर, जालना, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नगर, नांदेड, पालघर, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि कोल्हापूर येथे ही भरती होणार आहे. उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर युनिट या आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणार्‍या पदांची भरती करण्यात येणार आहे. औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य साहाय्यक, साहाय्यक परिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता, साहाय्यक परिचारिका प्रसविका अशी पदे भरण्यात येणार आहेत


राज्यात वैद्यकीय अधिकारी ते आरोग्य संचालकाची तब्ब्ल 2683 पदे रिक्त !!

Arogya Vibhag Bharti 2021 – राज्यात वैद्यकीय अधिकारी ते संचालक यांची वेगवेगळी सात पदे आहेत यात आरोग्य संचालकांसह, उपसंचालक , अतिरिक्त संचालक, सहायक, जिल्हा आरोग्य अधिकारी, विशेष तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक या सर्वच पदांच्या २ हजार सहाशे ८३ जागा रिक्त आहेत .मागील अनेक वर्षांपासून आरोग्य विभागाने पात्र असतानाही अधिकाऱ्यांना पदोन्नति दिलेली नाही. त्यातच सोमवारी एका आदेशाने जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील ३० अधिकाऱ्यांना पदोन्नती पदस्थापना दिली तसेच पदोन्नतीने भरावयाच्या आणखी ६० जागा रिक्त आहे ही पदे तातडीने भरावी अशी मागणी होत आहे..

 

रिक्त पदांचा तपशील ..

 1. आरोग्य संचालक २ पैकी १ रिक्त
 2. अतिरिक्त संचालक ३ पैकी २
 3. सहायक संचालक ११ पैकी ७
 4. उपसंचालक २३ पैकी ११
 5. जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग २८१ पैकी १४८
 6. जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग ६४३ पैकी ३९६
 7. विशेष तज्ज्ञ ६२७ पैकी ४७९
 8. वैद्यकीय अधिकारी गट अ ७७८९ पैकी १६३९

एकूण ९३७९ पैकी २६८३ रिक्त


आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती होणार

राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

संपूर्ण राज्यात कोरोनाचे संकट आहे, रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात ही भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. साधारणपणे भरतीच्या प्रक्रियेचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये होत असतो. पण यावेळी भरतीचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून हे भरतीचे लवकरच आदेश निघतील अशी माहिती आहे.


सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र अंतर्गत गट अ पदभरती जाहिरात प्रसिद्ध – एकूण ८९९ पदे 

Arogya Vibhag Bharti 2021899 vacancies has been issued By Maharashtra Arogya Vibhag. Candidates awaiting for Group A can check all details given here. Under Public Health Department Maharashtra, there is a vacancy for Medical Officer Group A. Candidates who wants to be a part of Arogya Vibhag Maharashtra Bharti 2021 can apply here. For this recruitment candidates need to forward their application at mentioned address. The last date for applying is 20th April 2021. Additional details about Arogya Vibhag Bharti 2021 are as given below

Arogya Vibhag Recruitment 2021  -सार्वजनिक आरोग्य विभाग  द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे  “वैद्यकीय अधिकारी गट-अ” पदाच्या 899 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदाप्रमाणे ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी गट-अ
 • पद संख्या – 899 पदे 
 • शैक्षणिक पात्रता –MBBS, Post Graduate Degree/Diploma in Statutory University in faculty given
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • वेतन – सातवा वेतन आयोग, वेतनस्तर एस २०, ५६१०००-१७७५००
 • वयोमर्यादा – 38 वर्ष
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य सेवा आयुक्तालय, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, आरोग्य भवन, मुंबई
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2021

How To Apply For Health Department Maharashtra Recruitment 2021

 • Eligible applicants to the posts can apply by submitting application to given address
 • For this applicants need to send their applications at following mention address
 • Send applications duly filled with all require information
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to send their all documents & certificates as necessary to the posts
 • Submit application from before last date
 • Application Address : The Director, Commissinorate of Health Services, Saint Georges Hospital Premises, Arogya Bhavan Mumbai – 400 001.

रिक्त पदांचा तपशील – Maha Arogya Vibhag Bharti 2021

Maha Arogya Vibhag Bharti 2021

Maharashtra Arogya Vibhag Education Qualification

 • FOR MEDICAL OFFICER (MBBS post): The MBBS Degree of a statutory University or any
  other equivalent qualification as specified in the First or Second Schedule appended to the Indian Medical
  Council Act, 1956 (102 of 1956);
 •  FOR MEDICAL OFFICER (specialist posts): The Post Graduate Degree/Diploma in Statutory
  University in faculty

Maharashtra Public Health Department Selection Process:

CriteriaWeightage for MBBS Degree holdersWeightage for Post Graduate Diploma/ Degree holders
The aggregate of marks obtained in all the years in the Degree exam60% (Maximum 60 marks)Not Applicable
The aggregate of marks obtained in Post Graduate diploma or degree examNot Applicable60% (Maximum 60 marks)
Service rendered in government as Medical Officer either on a bonded basis or on contract basis4 marks per 6 months in the tribal area and 3 marks per 6 months in the non-tribal area. Maximum up to 20 marks4 marks per 6 months in the tribal area and 3 marks per 6 months in the nontribal area. Maximum up to 20 marks
No. of total years after completion of Degree (If not in Government Service)Each year 2 marks (Maximum 20 Marks)Each year 2 marks (Maximum 20 Marks)

Applictaion Fee For Arogya Vibhag Bharti 2021:

 • For Open category candidates – Rs.1000/-
 • For Backward Class candidates – Rs.500/-

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Arogya Vibhag  Recruitment 2021 

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत वर्ग १ ते वर्ग ४ या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

Arogya Vibhag Bharti 2021 – Medical Education Minister Amit Deshmukh directed to take immediate action regarding the recruitment process for the vacant posts from Class 1 to Class 4 under the Department of Medical Education and Medicines.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत वर्ग १ ते वर्ग ४ या रिक्त पदांसाठी भरती

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत वर्ग १ ते वर्ग ४ या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेसंदर्भातील कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

जाहिरात कालबध्द वेळेत प्रसिद्ध करुन या भरती प्रक्रियेला गती द्यावी -वैद्यकीय शिक्षण मंत्री

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, वर्ग 1 मध्ये प्राध्यापक, वर्ग  2 मध्ये सहयोगी प्राध्यापक, आणि वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील रिक्त पदे सध्या 50 टक्क्यांपर्यंत भरण्याबाबतची मंजुरी मिळालेली आहे. तर वर्ग 4 मधील पदे वैद्यकीय शिक्षण विभागच्या अखत्यारित येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांना कंत्राटी पध्दतीने भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी याबाबत कार्यवाही करुन ही पदे तातडीने भरावी. तसेच वर्ग-3 संदर्भात मंजूर पदापैकी 50 टक्के पदे भरण्याची परवानगी राज्य शासनाची असल्याने याबाबतची जाहिरात कालबध्द वेळेत प्रसिद्ध करुन या भरती प्रक्रियेला गती द्यावी, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

राज्यात अजूनही कोविडचा धोका टळलेला नसून शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयांमध्ये सतत वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत असते. वेळेत वर्ग 3 आणि वर्ग 4 ची पदभरती झाल्यास इतर कर्मचाऱ्यांवर त्याचा ताण येणार नाही. याशिवाय तदर्थ पदोन्नतीसारखे विषय विभागीय निवड समितीसमोर मांडून वेळेत त्याबाबत निर्णय घेण्याला गती देण्यात यावी, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.


येत्या दोन महिन्यात आरोग्य विभागातली ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातली पदंभरण्याची आरोग्यमंत्री यांची विधानपरिषदेत ग्वाही

Arogya Vibhag Bharti 2021 – The ‘C’ and ‘D’ posts in the public health department in the state will be filled in the next two months, Health Minister Rajesh Tope said during Question Hour in the Legislative Council yesterday. Read below update on Arogya Vibhag Jobs 2021

जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत तडजोड करून चालणार नाही, त्यामुळे राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागातली ‘क’ आणि ‘ड’  संवर्गातली पदं येत्या दोन महिन्यात भरली जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

कोविड काळात आरोग्य सेवेत तात्पुरते भरती झालेल्या लोकांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याबाबत आणि आरोग्य विभागातल्या रिक्त जागा भरण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.

कोविड काळात आरोग्य विभागात २६ हजार ४८६  कंत्राटी पदं भरली

कोविड काळात सेवा देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागात २६ हजार ४८६  कंत्राटी पदं भरली. तात्पुरती नियुक्ती दिलेल्या कोरोना योद्ध्यांनी जीवावर उदार होऊन आरोग्य सेवा दिली, या सगळ्यांबद्दल सहानुभूती आहे मात्र या तात्पुरती नियुक्ती दिलेल्यांना कायमस्वरुपी नियुक्ती देणं नियमानुसार शक्य नाही , यातून मार्ग काढला जाईल, तसंच यांचा भर्तीच्या वेळी तात्पुरती नियुक्ती दिलेल्यांना अनुभवाच्या अनुषंगानं प्राधान्य दिलं जाईल, असं टोपे यांनी सांगितलं.


गडचिरोली येथील  प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत गट अ व ब ची निम्म्याहून अधिक पदे रिक्त..!

Arogya Vibhag Bharti 2021 – In Gadchiroli District There are so many Vacant Posts of Grop A and Group B in Primary Health Center which is the most imporatant departmet. Read below vacancy update in Health Department Gadchiroli Bharti 2021

अनेक आराेग्य कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशावर्कर आराेग्य सेवा देत असतात . या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी डाॅक्टरांची राहते. तसेच आराेग्य केंद्रांत दाखल झालेल्या रुग्णाला तपासून त्याच्यावर उपचारही करावे लागतात. परंतु  गडचिरोली येथील  प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत गट अ ची ७५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६६ पदे भरली असून नऊ पदे रिक्त आहेत. भरलेल्या एकूण ६६ पदांमध्ये ५१ नियमित, १३ कंत्राटी तर दोन एक वर्षाच्या करारावर आहेत. तसेच ६६ पैकी ४८ डाॅक्टर एमबीबीएस आहेत. तर, १८ डाॅक्टर बीएएमएस आहेत. गट ब ची ७५ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये २९ पदे भरली असून ४६ पदे रिक्त आहेत. गट ब ची निम्म्याहून अधिक पदे रिक्त..!


पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून ‘वर्ग १’ ते ‘वर्ग ४’ मधील 1600+ पदे रिक्त

Arogya Vibhag Bharti 2021 The entire administration is working to combat Corona. In such a critical situation, the local administration is facing difficulties due to vacancies in the health department which has the highest work stress. According to the available information, 5251 posts have been sanctioned from ‘District 1’ to ‘Class 4’ in six districts of East Vidarbha. Out of this 3584 posts have been filled and 1667 posts are vacant. Most of the vacancies are in ‘Class 1’. Out of 260 posts, 137 or 53 per cent have not been filled. There are 25 per cent vacancies in Group B, 37 per cent vacancies in Class 3 and 29 per cent vacancies in Class 4. Read below information in brief

आरोग्य क्षेत्रातील रिक्त पदांचा तिढा कायम 

कोरोनाला पुढील महिन्यात एक वर्षाचा कालावधी होत असताना आरोग्य क्षेत्रातील रिक्त पदांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. पूर्व विदर्भातील नागपूरसह, भंडारा, गडचिरोली, वर्धा, गोंदिया व चंद्रपूर जिल्हा मिळून ३१ टक्के पदे रिक्त आहेत. याचा फटका रुग्णसेवेवर बसत आहे. यातून भंडारा उपजिल्हा रुग्णालयातील अग्निकांडासारखे प्रकरण घडत असल्याचे बोलले जात आहे.

Vidarbh Arogya Vibhag Bharti 2021 करोनाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. अशा निर्णायक स्थितीत ज्या विभागावर सर्वाधिक कामाचा ताण आहे त्याच आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे स्थानिक प्रशासन अडचणीत येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून ‘वर्ग १’ ते ‘वर्ग ४’ मिळून ५२५१ पदे मंजूर आहेत. यातील ३५८४ पदे भरली असून १६६७ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक रिक्त पदे ‘वर्ग १’ मधील आहेत. २६० पैकी १३७ पदे म्हणजे ५३ टक्के पदे भरलेलीच नाही. ‘वर्ग २’ मधीलच ‘गट ब’मध्ये २५ टक्के पदे, ‘वर्ग ३’मधील ३७ टक्के, तर ‘वर्ग ४’मधील २९ टक्के पदे रिक्त आहेत.

-गोंदियात ७५ टक्के पदांवर वरिष्ठ अधिकारीच नाहीत

सहा जिल्ह्यांच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यात ‘वर्ग १’चे सर्वाधिक पदे रिक्त आहेत. येथे ४० पदे मंजूर असताना १० भरली असून ३० पदे रिक्त आहेत. तब्बल ७५ टक्के पदांवर वरिष्ठ अधिकारीच नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यात या संवर्गातील ६४ टक्के, वर्धा जिल्ह्यात ५० टक्के, गडचिरोली जिल्ह्यात ४९ टक्के, भंडारा जिल्ह्यात ४६ टक्के तर सर्वांत कमी नागपूर जिल्ह्यात ३९ टक्के पदे रिक्त आहेत.

-‘वर्ग ३’ची ३७ टक्के पदे रिक्त

‘वर्ग ३’चा कोट्यातील मंजूर पदांपैकी रिक्त पदे सरळसेवा भरती करण्याचे आदेश असतानाही सहा जिल्ह्यांत ३७ टक्के पदे रिक्त आहेत. २२६७ पैकी ८८८ पदे भरलेलीच नाहीत. नागपूर जिल्ह्यात ४७१ पैकी ७२, वर्धा जिल्ह्यात ३१६ पैकी ७०, भंडारा जिल्ह्यात ३६७ पैकी १३४, गोंदिया जिल्ह्यात ३६७ पैकी २०४, चंद्रपूर जिल्ह्यात ४६६ पैकी २६२, तर गडचिरोली जिल्ह्यात ३८० पैकी १४६ पदे रिक्त आहेत.

-नागपूर जिल्ह्यात ‘वर्ग ४’ची सर्वाधिक पदे रिक्त

सहा जिल्हे मिळून ‘वर्ग ४’ची १७५५ पदे मंजूर असताना ५२१ पदे रिक्त आहेत. यात नागपूर जिल्ह्यातील ३९५ पैकी सर्वाधिक, १३२ पदे रिक्त आहेत. भंडारा जिल्ह्यात ३०९ पैकी ७८, गडचिरोली जिल्ह्यात २४९ पैकी ६३, वर्धा जिल्ह्यात २२५ पैकी ६०, गोंदिया जिल्ह्यात २७६ पैकी ८५ तर चंद्रपूर जिल्ह्यात ३०१ पैकी १०३ पदे रिक्त आहेत.

-पूर्व विदर्भातील एकूण पदांची स्थिती

‘वर्ग १’ पदे

मंजूरभरलेलीरिक्त
260123137

‘वर्ग २’ पदे

मंजूरभरलेलीरिक्त
53649838
‘वर्ग २’मधील ‘गट ब’पदे
मंजूरभरलेलीरिक्त
33325083

‘वर्ग ३’ पदे

मंजूरभरलेलीरिक्त
23671479888
‘वर्ग ४’ पदे
मंजूरभरलेलीरिक्त
17551234521

राज्यात विशेषज्ञ डॉक्टरांची ५० टक्के पदे भरली जाणार

Arogya Vibhag Bharti 2021 -कोरोनामुळे आरोग्याकडे पाहण्याचा  बदलला आहे. साध्या आजारावरील उपचारासाठी स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जाण्याचा कल वाढला आहे. असे असताना, आरोग्य विभागाकडे स्पेशालिस्ट डॉक्टरांची अवघी ६८० पदे मंजूर आहेत. यातही १७२ पदे भरली असून तब्बल ५०८ पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा लंगडी होत चालल्याचे धक्कादायक चित्र आहे.

राज्यात आरोग्य विभागाचे उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये यासारखी शासकीय रुग्णालये जवळपास कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जिवावर चालली आहेत. अत्यल्प वेतनावर या विभागात डॉक्टरांपासून ते परिचारिका व कर्मचारी काम करत आहेत. बहुतेक ठिकाणी ‘एमबीबीएस’ डॉक्टरांची शेकडो पदे रिक्त आहेत. विशेषज्ञ डॉक्टरांची पदे केवळ नावालाच आहेत. परिणामी, आरोग्य विभागाचे बहुतेक उपक्रम हे ताकदीनिशी राबविणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात रिक्त असलेल्या स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या रिक्त पदांची विषयावर माहिती उपलब्ध झाली नाही; परंतु या क्षेत्रातील तज्ज्ञानुसार, जनरल सर्जन, अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, ईएनटीतज्ज्ञ, पॅथोलॉजीतज्ज्ञ, रेडिओलॉजीतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञांच्या मंजूर पदांपैकी जवळपास ९० टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. फिजिशियन, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, बधिरीकरणतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञांची सुमारे ४० टक्केही पदे भरलेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

-पूर्व विदर्भात ग्रामीण रुग्णालयांची स्थिती बिकट

पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या सहा जिल्ह्यांतील रुग्णालयात विविध विषयांतील विशेषज्ञांची पदे रिक्त असल्याने बिकट स्थिती निर्माण झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, फिजिशियनची २८ पैकी सुमारे ११ पदे, बालरोगतज्ज्ञांची १०५ पैकी ४० पदे, जनरल सर्जनची २७ पैकी ६ पदे, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञांची १०९ पैकी ५० पदे, बधिरीकरणतज्ज्ञांची १०७ पैकी ५६ पदे, अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञांची २२ पैकी ४ पदे, नेत्ररोगतज्ज्ञांची २० पैकी ४ पदे, त्वचारोगतज्ज्ञांची दोन्ही पदे, ईएनटीतज्ज्ञांची सहाही पदे, पॅथोलॉजीतज्ज्ञांची सातही पदे, रेडिओलॉजीतज्ज्ञांची आठपैकी २ पदे, मानसोपचारतज्ज्ञांची पाचही पदे, रक्तसंक्रमण अधिकारीची (बीटीओ) ६ पैकी पाच पदे तर तर पीएसएमतज्ज्ञांची १७ पैकी ७ पदे अशी एकूण सुमारे २२२ पदे रिक्त आहेत.

-विशेषज्ञ डॉक्टरांची ५० टक्के पदे भरली जाणार

राज्यात विशेषज्ञ डॉक्टरांची मोठ्या संख्येत पदे रिक्त आहेत. यातील ५० टक्के पदे भरण्याला मंजुरी मिळाली आहे. लवकरच ही पदे भरली जाणार आहेत.

12 thoughts on “Arogya Vibhag Bharti 2021”

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..