CBSE Bharti 2021

CBSE बोर्डातर्फे टीजीटी, पीजीटीसह विविध पदे भरणार

CBSE Bharti 2021 – There is an urgent need for the services of TGTs, PGTs and IT Assistants/DEOs deployed for #COVID19 duty in view of CBSE Board’s 10th & 12th examinations from 16th November and Class 9th and 11th mid term examinations from 1st December.

सीबीएसई बोर्ड टर्म १ च्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. याअंतर्गत सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. सीबीएसई बोर्डातर्फे लवकरच नववी आणि दहावीच्या परीक्षा देखील सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या शिक्षण विभागातर्फे सीबीएसई बोर्ड परीक्षांसाठी विविध पदांची भरती केली जाणार आहे. सीबीएसई टर्म १ परीक्षेसाठी टीजीटी, पीजीटी सह आयटी सहाय्यक/डिईओ ही पदे भरली जाणार आहेत.

CBSE Bharti 2021

एएनआय या वृत्तसंस्थेनेही यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यानुसार सीबीएसई दहावी-बारावीची परीक्षा १६ नोव्हेंबरपासून आणि नववी-अकरावीच्या परीक्षा १ डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. इयत्ता नववी आणि अकरावीच्या होणाऱ्या परीक्षा लक्षात घेऊन करोना ड्युटीसाठी टीजीटी, पीजीटी आणि आयटी सहाय्यक/डीईओची परीक्षा नियंत्रक पदाची भरती केली जाणार आहे.

Leave a Comment