CGST Bharti 2022

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अंतर्गत प्रशासकीय अधिकारी पदांची भरती सुरू

CGST Bharti 2022 – Central Goods and Service Tax Invites Application For Administrative Officer Posts. There Are Total of 05 Vacant Posts Under Central Goods and Service Tax Vacancy 2022. Eligible and Interested Candidates May Apply For CGST Bharti 2022. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested Candidates Can Send Their Application Into Mentioned Address Before The Last Date. The Last Date is 21st September 2022. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Central Goods and Service Tax Job 2022

CGST Recruitment 2022: केंद्रीय वस्तू आणि सेवा कर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे प्रशासकीय अधिकारी पदाच्या 05 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

CGST Recruitment 2022 Notification 

 • पदाचे नावप्रशासकीय अधिकारी
 • पद संख्या05 पदे
 • शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघा
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • नोकरी ठिकाणमुंबई
 • शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2022
 • अर्ज पाठविण्याचा पत्ताआयुक्त, CGST आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, रायगड, भूखंड क्रमांक 1, सेक्टर-17, खांदेश्वर, नवी मुंबई- 410206.
 • अधिकृत वेबसाईट – www.cbic.gov.in

How to Apply For Central Goods and Service Tax Vacancy 2022 :

 • Candidates Should Apply Offline For CGST Bharti 2022
 • Full Filled Application Form Properly
 • Attach All Required Or Relevant Documents Like CV, Certificates, Etc…
 • Mention Education, Qualification, Age, etc
 • Apply Before The Last date
 • Last Date : 21st September 2022
 • Address : The Commissioner, CGST & Central Excise, Raigad, Plot No. 1, Sector -17, Khandeshwar, Navi Mumbai- 410206.

रिक्त पदांचा तपशील – Central Goods and Service Tax Application 2022

Name of Post No. of Post Qualification
Administrative Officer 05 Posts General Central Service, Group ‘B’ Gazetted Ministerial

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Central Goods and Service Tax Bharti 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत संकेतस्थळ

 


राज्य वस्तू व सेवाकर विभागातील नागपूर विभागात तब्बल तीस टक्के पदे रिक्त !!

CGST Bharti 2022 :  CGST Nagpur Bharti 2022 : Thirty per cent posts are vacant in the Nagpur division of the State Goods and Services Tax (CSGT), which collects 65 per cent of the total revenue of the state. The increase in the incidence of corona over the last two years has led to a decline in revenue in the state. Increased work stress on employees, technical problems due to computer system. As a result, there is a rift among employees. It is learned that there are plans to expand this department. Know More about   CGST Nagpur Bharti 2022, CGST Bharti 2022 at below

राज्याच्या एकूण जमा महसुलापैकी ६५ टक्के महसूल संकलित करणाऱ्या राज्य वस्तू व सेवाकर विभागातील (सीएसजीटी) नागपूर विभागात तब्बल तीस टक्के पदे रिक्त आहेत. मागील दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील महसुलात घट झालेली आहे.

त्यात कर्मचाऱ्यांवर वाढलेला कामाचा ताण, संगणक प्रणालीमुळे तांत्रिक अडचणी येत आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांमध्ये खदखद आहे. असे असताना या विभागाचा विस्तार करण्याची योजनाही असल्याची माहिती पुढे आली आहे.

देशभरातील तब्बल १७ अप्रत्यक्ष कर व अन्य उपकर रद्द करून करसंकलनात व करप्रणालीत आमूलाग्र बदल घडविणाऱ्या ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीला एक जुलै २०१७ रोजी सुरवात झाली. तांत्रिक अडचणीवर मात करत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नवीन कर प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी केली. मात्र, त्याच वेळी वारंवार पाठपुरावा करूनही कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.

विभागात विविध संवर्गातील एकूण ११ हजार ७६९ मंजूर पदांपैकी तब्बल तीन हजार ८७२ पदे रिक्त आहेत. दुसरीकडे २००७ मध्ये साडेपाच लाखांहून अधिक व्यापाऱ्यांचे कर प्रशासन करणारा राज्य कर विभाग त्याच मनुष्यबळात सद्यःस्थितीत सुमारे १३ लाख व्यापाऱ्यांचे कर प्रशासन करीत आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

नागपूर विभागातही कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. या विभागासाठी ७२१ पदे मंजूर करण्यात आलेले आहे. त्यातील ५११ पदे भरलेली असून २१० पदे रिक्त आहेत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांकडे रिक्त पदाचे पदभार देण्यात आलेला आहे. परिणामी, त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा बोझा वाढलेला आहे.

सह आयुक्तांचे तीन पदे असून दोन पदे भरलेली असून एक पद रिक्त आहे. वर्ग ‘अ’ मध्ये ३६ पैकी २६ पदे भरलेली असून १० पदे रिक्त आहेत. तर वस्तू व सेवाकर निरिक्षकांचे २९९ पदे असून त्यातील २३२ पदे भरलेली आहेत. तर ६७ पदे रिक्त आहेत. कारकून २०१ असून त्यातील ३० पदे रिक्त असल्याची माहिती पुढे आलेली आहे.


CGST Bharti 2021 -There are 42246 vacancies across the country in the GST and Customs Department, which generates revenue of thousands of crores to the Central Government every year. There are 8451 vacancies in Maharashtra and 713 vacancies in Nagpur zone. The number of vacancies is increasing every year. It is natural for the officers and employees to have work stress due to vacancy. Read below Update On CGST Bharti 2021 :

CGST Recruitment 2021– केंद्र सरकारने देशात वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) लागू केल्यानंतर केंद्रीय जीएसटी आणि कस्टम विभागात कनिष्ठापासून वरिष्ठांपर्यंत तर मुख्य आयुक्त, प्रधान आयुक्त आणि आयुक्तांची पदे रिक्त आहेत. गेल्या वर्षी रिक्त पदांची ३७ हजार असलेली संख्या आता ४२,२४६ वर गेली आहे. अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर रिक्त पदे भरण्यासाठी विभागातर्फे कुठलाही पुढाकार घेण्यात येत नाही. संपूर्ण देशात सीजीएसटी विभागात ९१,७०० पदे मंजूर आहेत, हे विशेष.

रिक्त पदांची माहिती मानव संसाधन विकास महासंचालनालयाने विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कस्टम, सेंट्रल एक्साईज अ‍ॅण्ड जीएसटी एससी, एसटी एम्प्लॉईज वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष संजय थूल म्हणाले, रिक्त जागा भरण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीमारामन आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व कस्टम बोर्डाकडे पत्र पाठविले आहे. सध्या अनेक कार्यालयात दोन पदाचा कार्यभार एकाच अधिकाऱ्यावर आहे. काही चूक झाल्यास चार्जशीट देऊन कारवाई करण्यात येते. कामाच्या वाढत्या तणावामुळे अनेकांनी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग निवडला आहे.

देशात ए वर्गातील राजपत्रित अधिकाऱ्यांमध्ये ६,३८१ पदांपैकी २,८७५ पदे तर, बी वर्गातील राजपत्रित अधिकाऱ्यांमध्ये २२,२१७ मंजूर पदांपैकी ४,५७७ पदे रिक्त आहेत. विभागात अधिकारीचे नव्हे तर कर्मचाऱ्यांवरही कामाचा जास्त ताण येत आहे. यातच मुख्य आयुक्त, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त आणि सहायक आयुक्तांची अनेक पदे रिक्त आहेत.

महाराष्ट्रात ८,४५१ तर नागपूर झोनमध्ये ७१३ पदे रिक्त (Maharashtra GST Bharti 2021)

केंद्रीय नागपूर सीजीएसटी विभागाच्या कार्यक्षेत्रात नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक विभाग येतो. नागपूर झोनमध्ये जीएसटी व कस्टम विभागात एकूण ७१३ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्राची आकडेवारी पाहिल्यास जीएसटी विभागात मुंबई झोनमध्ये ५,७७३ मंजूर पदांच्या तुलनेत ३,०६२ कार्यरत तर २,६९१ पदे रिक्त आहेत. याशिवाय नागपूर झोनमध्ये १४९२ मंजूर पदांच्या तुलनेत ८७७ कार्यरत व ६१५ पदे रिक्त, पुणे झोनमध्ये २,०६९ पदे मंजूर तर १२०० पदे रिक्त आणि ८६९ पदे रिक्त आहेत. उपरोक्त आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण ९,३३४ मंजूर पदांच्या तुलनेत ५,१५९ कार्यरत तर ४,१७५ पदे रिक्त आहेत. याशिवाय कस्टम विभागात मुंबई-१ मध्ये १८७९ मंजूर पदांच्या तुलनेत ८९९ कार्यरत पदांच्या तुलनेत ९७१ रिक्त, मुंबई-२ मध्ये २,६९९ मंजूर पदांच्या तुलनेत १२५० कार्यरत व १४२९ रिक्त, मुंबई-३ मध्ये २,९५८ मंजूर पदांच्या तुलनेत १५३१ कार्यरत व १४२७ रिक्त, पुणे येथे ७८८ मंजूर पदांच्या तुलनेत ४३२ कार्यरत व ३५१ पदे रिक्त आणि नागपुरात २१७ मंजूर पदांच्या तुलनेत ११९ कार्यरत तर ९८ पदे रिक्त आहेत. याची एकूण आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्रात जीएसटी आणि कस्टम विभागात १७,८४१ मंजूर पदांपैकी ९,३९० पदांवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून, तब्बल ८,४५१ पदे रिक्त आहेत.

देशात मंजूर, कार्यरत व रिक्त पदांची संख्या
वर्गमंजूर पदे कार्यरत रिक्त
ए ६,३८१ ३,५०६ २,८७५
बी २२,२१७ १७,६४० ४,५७७
(राजपत्रित)
बी ३२,३६२ १५,६१० १६,७५२
(अराजपत्रित)
सी ३०,७४० १२,६९८ १८,०४२
एकूण ९१,७०० ४९,४५४ ४२,२४६
अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला
अपुरे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बळावर काम कसे करायचे, हा गंभीर प्रश्न आहे. रिक्त पदाची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यानंतरही संबंधित विभाग भरतीसाठी कुठलेही पाऊल उचलत नाही. युवक-युवतींना रोजगार संधी देण्यासाठी विभागाने तातडीने पदभरती करावी.

Leave a Comment