District Hospital Sindhudurg Bharti 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच आरोग्य विभागाची रिक्त पदे भरणार

District Hospital Sindhudurg Bharti 2021 – Arogya Vibhag Sindhudurg Recruitment Process is going to start Soon. As per latest news Order has been given to fill vacant posts in arogya vibhag in coming days..

Sidhudurg Arogya Vibhag Bharti 2021– सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा येत्या काळात अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील. तसेच कुडाळ येथील स्वतंत्र महिला हॉस्पिटल येत्या दोन महिन्यात रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज होईल, अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली, असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर यांनी दिली. बाळ कनयाळकर, भास्कर परब, बाळा सातार्डेकर आदी उपस्थित होते.

कुडाळकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आरोग्यमंत्री टोपे यांची भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने बाबतच्या समस्या, रिक्त पदे, कुडाळ येथील महिला रुग्णालय याकडे आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा इतर जिल्ह्याच्या मनाने खूप दुबळी असून ती अधिक सक्षम व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने टोपे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन आरोग्य यंत्रणेची पाहणी करण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. कुडाळ येथील महिला रुग्णालयाची इमारत पूर्ण होवून अनेक वर्षे झाल्याने ही इमारत जनतेच्या सेवेत दाखल करण्यात यावी, याकडेही त्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी हे रुग्णालय येत्या दोन महिन्यात नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होईल अशी ग्वाही आरोग्य मंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाला दिली आहे.

महिला रुग्णालय सुरू करताना सुरुवातीला कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचा स्टाफ वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी या रुग्णालयासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग देण्यात यावा, याकडेही त्यांचे लक्ष वेधण्यात आले. आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांचेही लक्ष वेधण्यात आले असून या रुग्णालयासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. कुडाळ ग्रामीण रुग्णालय वगळता अन्य ठिकाणी डायलिसिस सेवा सुरू आहे; मात्र कुडाळ ग्रामीण रुग्णालयात जागा अपुरी असल्याचे कारण देत ही सेवा सुरू केली जात नाही; मात्र नागरिकांची मागणी पाहता येथे ही सेवा सुरू करण्यात यावी, याकडे जिल्हा शक्‍य चिकित्सक यांचे लक्ष वेधण्यात आले असल्याचे कुडाळकर यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालय हे हायवेनजीक असावे. जेणेकरून रुग्णांना जास्त लांब जावे लागू नये, अशी मागणी असताना मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यावेळी जिल्हा रुग्णालय हे हायवेपासून २ ते ३ किमी अंतरावर बांधण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना रुग्णालयात येण्यासाठी वाहतूक खर्च सहन करावा लागतो. त्यामुळे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधताना ती चूक होऊ नये.

जिल्हा निर्मितीच्या वेळी जिल्हा रुग्णालय एका कोपऱ्यात बांधण्यात आले ती चूक आता सुधारली जावू शकते. त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय हायवेनजिक बांधण्यात यावे जेणेकरून रुग्णांना सोयीस्कर असेल याकडेही आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे कुडाळकर यांनी सांगितले.


District Hospital Sindhudurg Bharti 2021 – The Government has sanctioned the  filling up of the required posts for the Medical College at District General Hospital at Sindhudurg. A total of 524 posts have been sanctioned in four categories from Group A to Group D. Read Below detailed information about District Hospital Sindhudurg Bharti 2021  :

District Hospital Sindhudurg Recruitment 2021  – सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयनजीक (District General Hospital Sindhudurg Bharti 2021) राज्यशासनाने मंजूर केलेल्या 100 विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्‍यक पद निर्मिती करण्यास व ती भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. गट अ ते गट ड या चार श्रेणीतील मिळून 524 पदे मंजूर केली आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

मंजूर झालेल्या 524 पदांपैकी गट अ ते गट क मधील नियमित 287 पदे असून विद्यार्थी पदे (अध्यापनाशी संबंधित) 118 आहेत. गट क मधील 58 व गट ड मधील 61 पदे ही काल्पनिक असून ती बाह्यस्त्रोताने भरली जाणार आहेत. यासाठी शासनाने 118 कोटी 55 लाख रुपये एवढ्या अंदाजीत खर्चास मान्यता दिली आहे. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात होत आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. 500 खाटांचे हॉस्पिटल करण्यात आले आहे. पहिल्या वर्षासाठी लागणारी पदे तत्काळ भरली जाणार आहेत. उर्वरित पदे टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहेत. या वर्षी भरण्यात येणाऱ्या पदांसाठी आवश्‍यक निधीची तरतूद केली आहे. दुसऱ्या टप्प्यापासून लागणाऱ्या निधीची मागणी संस्था वार्षिक आराखड्यात करणार आहे.

पहिल्या टप्प्यात ही पदे भरणार 

अधिष्ठाता एक, प्राध्यापक सहा, सहयोगी प्राध्यापक 17, मुख्य प्रशासकीय अधिकारी 1 अशी गट अ ची 25 पदे मंजूर करण्यात आली आहेत. गट ब मध्ये सहायक प्राध्यापक 23, प्रशासन अधिकारी 1, मुख्य ग्रंथपाल 1 या 25 पदांचा समावेश आहे. गट ड मधील कार्यालयीन अधीक्षक 1, लघु लेखक 1, वरिष्ठ सहाय्यक 4, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 10, क्ष-किरण तंत्रज्ञ 4, ई सी जी तंत्रज्ञ 2, सहायक ग्रंथपाल 1, वरिष्ठ लिपिक 15, लघु टंकलेखक 1, प्रयोगशाळा सहायक 6, ग्रंथपाल सहायक 1, कनिष्ठ लिपिक 16, वाहनचालक 1, भांडारपाल 2 अशी 66 पदे नियमित भरली जाणार आहेत. काल्पनिक असलेली बाह्यस्त्रोताची वर्ग 3 मधील 20 तर वर्ग 4 मधील 23 पदे भरली जाणार आहेत. 58 विद्यार्थ्यांशी संबंधित पदे भरली जाणार आहेत. ही सर्व पदे 2020-21 साठी भरली जाणार आहेत.

1 thought on “District Hospital Sindhudurg Bharti 2021”

Leave a Comment