Advertisement

Hingoli Police Bharti 2021

हिंगोली जिल्ह्यात २६० पोलीस पाटलांची पदे रिक्त

Hingoli Police Bharti 2021 -At present in Hingoli District, there are vacancies for police Patil in 260 villages and the villagers are facing a lot of difficulties. Read this important Update on Hingoli Police Bharti 2021 at below

गावकीच्या भांडणतंट्यात पोलीस पाटलाची भूमिका ही समन्वयाची असते. त्यामुळे त्यांच्या मध्यस्थीने बहुतांश प्रकरणे गावपातळीवर मिटवण्यासाठी यश मिळत असते; परंतु सद्य:स्थितीत २६० गावांतील पोलीस पाटलांची पदे रिक्त असल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील कायदा-सुव्यवस्था चांगली ठेवणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पुरविणे, गावांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना कळविणे, पोलिसांना गुन्ह्याच्या चौकशीत मदत करणे, नैसर्गिक आपत्तीची माहिती तहसीलदारांना कळविणे, तसेच संसर्गजन्य रोगांची साथ असल्यास त्याची माहिती देणे, गावच्या हद्दीत कोणी विनापरवाना शस्त्र बाळगल्यास ते काढून घेणे, आदी कामे पोलीस पाटलांमार्फत होत असतात; परंतु सध्या ही पदे रिक्त असल्याने २६० गावांत कामे विस्कळीत झाली आहेत.

हिंगोली उपविभागांतर्गत हिंगोली व सेनगाव, या दोन तालुक्यांचा समावेश आहे. पोलीस पाटीलपदाचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. शासनस्तरावरून सूचना आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. रिक्त असलेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेकरिता वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी घेणे गरजेचे आहे. मात्र, तशी कोणतीही प्रकिया होताना दिसून येत नाही.

हिंगोली तालुका : पोलीस पाटीलपद रिक्त असलेली ४७ गावे

अंधारवाडी, एकांबा, कारवाडी, कलगाव, कापूरखेडा, कडती, केसापूर, कनका, खांबाळा, खेड, खानापूर चिता, खेर्डा, खडकद (बु.), गणेशवाडी, गाडीबोरी, घोटा, चिंचपुरी, जांभरून (जहां.), दुर्गसावंगी, धानापूर, धोत्रा, नांदुरा, नांदुसा, टाकळीतर्फे नांदापूर, पहेणी, पारडा, पेडगाव, पेडगाववाडी, बळसोंड, ब्रह्मपुरी, बोरजा, भटसावंगी तांडा, मोप, राहोली (खुर्द), लोहगाव, लिंबाळा मक्ता, लोहरा, वाढोणा प्र.वा., वैजापूर, वराडी, सवड, समगा, सावरगाव (बं.), सागद, सांडसतर्फे बासंबा, हानवतखेडा, हिंगणी, हिरडी आदी गावांचा समावेश आहे.

सेनगाव तालुका : पोलीस पाटीलपद रिक्त असलेली ४१ गावे

आमदारी, उमरदरी, कवरदरी, कोळसा, कापडसिंगी, खैरी (घुमट), खडकी, चोंढी (बु.), चिंचखेडा राजीनामा, जाम आंध, जामदया, डोंगरगाव, तांदूळवाडी, दाताडा (खु.), धोत्रा, नानसी, पार्डी (पोहकर), बेलखेडा, ब्राह्मणवाडा, बोरखेडी (जी.), बोडखा, मकोडी, मनास पिंपरी, माहेरखेडा, रिधोरा, लिंगदरी, लिंग पिंपरी, लिंबाळा- आमदरी, वटकळी, वाघजळी, वायचाळ पिंपरी, वड हिवरा, वझर खुर्द, शेगाव (खो.), लिंबाळा तांडा, साबलखेडा, सावरखेडा, सोनसावंगी, हिवरखेडा, होलगिरा, हत्ता आदी गावांचा समावेश आहे.

Leave a Comment